ऊस तोडणी यंत्र अनुदान

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशामध्ये अनेक शेतकरी हे शेतीवर अवलंबून असतात आणि जास्तीत जास्त शेतीमध्ये प्रामुख्याने ऊस हे पीक घेतले जातात . आपल्या देशात सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील अनेक कारखाने आहेत आणि उसाचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात पिक घेण्यात येते.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ज्यावेळेस ऊस आपण तोडणी चालू करतो त्यावेळेस अनेकदा असे होते की ऊस तोडी कामगार हे  वाढीव भाव मागतात . या कारणामुळे शेतामध्ये बऱ्याच दिवस ऊस राहतो. त्यामुळे उसाचे वजन कमी होते आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते. यावर पर्याय म्हणून आपल्या राज्य सरकारने ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना सुरू केलेली आहे.

आपल्या महाराष्ट्र राज्य सर्वात जास्त ऊस अहमदनगर जिल्ह्यामध्ये लावला जातो. अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ऊसाचे  कारखान्याचे प्रमाण आढळून येतात, परंतु ऊस तोडणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते. या सर्वावर पर्याय म्हणून आपले राज्य सरकार ऊस तोडणी यंत्र अनुदान देत आहे. ऊस तोडणी यंत्र योजनेअंतर्गत 35 लाख रुपये अनुदान दिले जात आहे. म्हणजे एकूण रकमेच्या 40% अनुदान शेतकऱ्यांना आपले राज्य सरकार देत आहे. ऊस तोडणी यंत्र ही योजना आपल्या राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणार आहे. तसेच योग्य वेळी ऊस तोडणी झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. योग्य प्रमाणात वजन आल्यामुळे त्यांची आर्थिक उत्पन्न वाढ होणार आहे. शेतकऱ्यांचा माल देखील कारखान्यापर्यंत योग्य वेळी पोहोचणार आहे.

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना या योजनेमध्ये आम्ही तुम्हाला सर्व माहिती या लेखाद्वारे देणार आहोत. ऊस तोडणी यंत्रासाठी किती टक्के अनुदान दिले जाते, यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, यामध्ये कोण कोण पात्रता आहे, योजनेच्या अटी व नियम, अर्ज करण्याची पद्धत या सर्वांची माहिती आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे देणार आहोत हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा.

ऊस तोडणी यंत्र अनुदान

योजनेचे नाव

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना

राज्य

महाराष्ट्र

विभाग

कृषि विभाग महाराष्ट्र राज्य

अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन /ऑफलाइन

लाभ

ऊस तोडणी यंत्र घेण्यासाठी 40 टक्के अनुदान.

लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी,उद्योजक, सरकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सरकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO).

 

योजनेचा उद्देश

गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मुलींना शिक्षणासाठी  देणे प्रोत्साहन देणे..

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना उद्देश

  • राज्यातील उद्योजक, शेतकरी, सरकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सरकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांना ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक सहाय्यता करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  •  शेतकऱ्यांना ऊस तोडणी कमी खर्चात करणे शक्य व्हावे म्हणून हाय या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  •  ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी व आर्थिक विकास करून त्यांची सहशक्त व आत्मनिर्भर बनवणे.
  •  शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
  •  ऊस तोडणी यंत्र खरेदी  करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज शेतकऱ्यांना भासू नये.तसेच कोणाकडून व्याजदर ने  पैसे घेण्याची गरज लागणार नाही.
  •  शेती क्षेत्राचा औद्योगिक विकास करणे.
  •  या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहित करणे व इतर नागरिकांना शेतीकडे आकर्षित करणे.
ऊस तोडणी यंत्र अनुदान

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना वैशिष्ट्ये

  • ही योजना राज्यस्तरीय असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना, उद्योजकांना, सरकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सरकारी संस्था या सर्वांना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहे.
  • या योजनेची राज्याच्या कृषी विभागाद्वारे सुरुवात करण्यात आलेली आहे.
  •  ऊस पिकाशी संबंधित सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  •  लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (PFMS) च्या साह्याने जमा केली जाते.

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना अंतर्गत दिले जाणारे अनुदान

 

* लाभार्थ्यांना ऊस तोडणी यंत्राच्या एकूण किमतीच्या 40% अथवा रुपये 35 लाख यापैकी जी रक्कम कमी असेल  इतके अनुदान देण्यात येईल.

* ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेअंतर्गत मजूर निधीपैकी केंद्र शासनाचा हिस्सा 60 टक्के व राज्य शासनाचा हिस्सा 40 टक्के राहील.

अर्ज शुल्क

  •  या योजनेचा अर्ज ऑनलाईन पोर्टलवर करताना अर्जदारांना 23/- रुपये अर्ज शुल्क म्हणून ऑनलाईन भरायचा आहे
ऊस तोडणी यंत्र अनुदान

ऊस तोडणी यंत्र सबसिडी योजना चे लाभार्थी

  • या योजनेचे लाभार्थी राज्यातील शेतकरी, सरकारी साखर कारखाने, वैयक्तिक अथवा त्यांचा समूह गट स्वयंसहायता गट(SHG )हे या योजना अंतर्गत लाभार्थी राहतील.

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना फायदे

या योजनेअंतर्गत शेतकरी, उद्योजक, सरकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सरकारी संस्था, उत्पादन संस्था, या सर्वांना ऊस  तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान दिले जाईल.

* मोफत ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात त कोणी शक्य होईल आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडेल.

* शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर शेतात करणे शक्य होईल.

* या यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही आणि त्यांना कोणाकडून कर्ज घेण्याची गरज लागणार नाही.

* या योजनेअंतर्गत इतर नागरिक शेतीकडे आकर्षित होतील आणि शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी प्रोत्साहित होतील.

* ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्याचे जीवनमान सुधारेल आणि त्यांचा आर्थिक विकास देखील होईल.

* या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना ऊस तोडणी साठी मजुरावर  अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

* ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना अंतर्गत राज्याचा औद्योगिक विकास होईल.

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना पात्रता

या योजनेसाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

* या योजनेअंतर्गत अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे.

*  या योजनेचा कुटुंबातील एकाच व्यक्तींना फाय दा घेता येणार आहे.

* अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती हा केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या नोकरीत नसावा.

* खाजगी कारखाने किंवा सरकारी  क्षेत्रातील कारखाने यांना जास्तीत जास्त तीन अर्ज या योजनेद्वारे करता येणार आहे.

* या योजनेसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असेल तर जातीचा दाखला सादर करणे गरजेचे आहे.

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना अटी व शर्ती

या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल.

* महाराष्ट्र बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

* या योजनेअंतर्गत ज्या कारखान्याचे कार्यक्षेत्रात ऊस तोडणी काम केले जाणार आहे. अर्जासोबत त्या कारखान्याचे संमती पत्र असणे आवश्यक आहे.

* तपासणी झालेल्या ऊस तोडणी यंत्रासाठी केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त तपासणी संस्थाकडून  यंत्रासाठीच अनुदान देण्यात येईल.

* यंत्राची निवड करण्याची जबाबदारी लाभार्थ्याची अथवा साखर कारखान्याची असेल.

* या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या ऊस तोडणी यंत्राचा वापर फक्त महाराष्ट्रातच करता येईल महाराष्ट्र राज्य बाहेर लाभार्थ्याला ऊस तोडणी यंत्राचा वापर करता येणार नाही.

* महाराष्ट्र या योजनेअंतर्गत दिले जाणाऱ्या ऊस तोडणी यंत्राचा वापर महाराष्ट्र बाहेर केल्यास कारवाई केली जाईल व अनुदानाची राशी वसुल  केली जाईल.

* ऊस तोडणी यंत्राची खरेदी केल्यानंतर, काम मिळण्याची संपूर्ण जबाबदारी हे यंत्र खरेदी करणाऱ्यांची असेल. त्यासाठी राज्य शासनाद्वारे कुठलीही प्रकारची मदत केली जाणार नाही.

अर्जदाराने या अगोदर एखाद्या राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत ऊस तोडणी  यंत्राच्या खरेदीवर अनुदान मिळवले असल्यास अशा अर्जदार व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

* ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना लाभ मिळण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

ऊस तोडणी यंत्र अनुदान

आवश्यक लागणारे कागदपत्रे

  1. रहिवासी प्रमाणपत्र
  2. आधार कार्ड
  3. आधार लिंक असलेल्या बँक क्रमांक.
  4. राशन कार्ड.
  5. मोबाईल नंबर.
  6. पासपोर्ट आकाराचे फोटो.
  7. ईमेल आयडी .
  8. जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा.
  9. ऊस तोडी यंत्राचे कोटेशन.
  10. सरकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सरकारी संस्था , शेतकरी उत्पन्न संस्था,(FPO). यांच्याबाबतीचे नोंदणी प्रमाणपत्र व संस्थेचे नाव आणि बँक पासबुकची प्रत.
  11. स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र.
  12. जातीचा प्रमाणपत्र.

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना अर्ज करण्याची प्रक्रिया

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.

* वेबसाईटवर गेल्यावर होम  पेजवर अर्जदाराला स्वतःची नोंदणी करायची आहे.

* आपल्याला एक युजरनेम आणि पासवर्ड क्रिएट होईल.

* आपल्याला आता युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.

* यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.

* कृषी यांत्रिकीकरण या ॲप्शन वर जाऊन आपल्याला विचारलेल्या सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे भरायची आहे वरती दिलेली सर्व कागदपत्रे त्यासोबत अपलोड करायची आहेत.

* आता आपल्याला हा अर्ज सबमिट बटन वर क्लिक करून आपला अर्ज पूर्ण भरलेला आहे हे तपासून बघायचे आहेत.

* आणि अशाप्रकारे हा अर्ज सबमिट करायचा आहे.

निष्कर्ष

मित्रांनो आम्ही तुम्हाला ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना विषय सर्व माहिती या लेखाद्वारे दिलेली आहे. या ऊस तोडणी यंत्रासाठी 35 लाख रुपये अनुदान दिले जाते. म्हणजे एकूण शेतकऱ्यांना आपले राज्य सरकार रकमेच्या चाळीस टक्के अनुदान देत आहे. या अनुदानाची अर्ज करण्याची पद्धत, याचा लाभ कोणाला मिळेल, याचे उद्देश काय या सर्वाची माहिती आम्ही या लेखांमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला कोणाला किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये एखाद्या शेतकऱ्याला ऊस तोडणी यंत्र खरेदी करायचे असेल तर या योजने विषयी माहिती सांगा.

सतत विचारले जाणारे प्रश्न

  1. ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना अंतर्गत किती अनुदान दिले जाते?
  •  ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना याअंतर्गत यंत्राच्या एकूण किमतीच्या 40% अनुदान किंवा 35 लाख रुपये ज्याची रक्कम कमी असेल तितके अनुदान दिले जाते.
  1. ऊस तोडणी यंत्राची किंमत काय आहे?
  •  ऊस तोडणी यंत्राची किंमत त्याच्या एचपी अनुसार कमी जास्त म्हणजे 35 लाख ते 75 लाखापर्यंत आहे.
  1. ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी कोण पात्रता आहे?
  •  ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी राज्यातील शेतकरी, उद्योजक, सरकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सरकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था या सर्वांना या योजनेसाठी पात्रता आहे.
  1. ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना ही कोणत्या राज्यात लागू आहे?
  •  ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनाही महाराष्ट्र  राज्यामध्ये लागू आहे.

2 thoughts on “ऊस तोडणी यंत्र अनुदान”

Leave a comment