TET Exam Timetable 2024 राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी स्टेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 संदर्भात परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे या परिपत्रकामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेचे वेळापत्रक दिलेले आहे या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दुपारच्या सत्रात हे परीक्षेचे नियोजन करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेली आहे.
TET Exam Timetable 2024 महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळी, माध्यम अनुदानित किंवा विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्ती होण्यासाठी उमेदवारांना सर्वात प्रथम ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असते ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ या आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत या परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार असून या परीक्षेची संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
TET Exam Timetable 2024 टीईटी परीक्षेचे वेळापत्रक :
TET Exam Timetable 2024 या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याचा कालावधी 9 सप्टेंबर 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू होणार आहे या परीक्षेचे वेळापत्रक किंवा प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने प्रिंट काढून घेण्यासाठी दिनांक 28 ऑक्टोबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत कालावधी दिला जाणार आहे 10 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10:30 ते एक दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक होणार आहे यानंतर दुपारच्या सत्रामध्ये दोन ते साडेचार दरम्यान पेपर क्रमांक दोन होणार आहे.
मुख्यमंत्री योजना दूत ऑनलाइन अर्ज
TET Exam Timetable 2024 परिषदेकडून परीक्षेबद्दल महत्त्वाच्या सूचना :
- TET Exam Timetable 2024 परीक्षा बद्दल सर्व जसे आवेदन पत्र भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन आणि निकाल विषयक सविस्तर माहिती आणि शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईट वरती उपलब्ध करून देण्यात आले आहे यामध्ये प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासून अर्ज भरणे आवश्यक आहे
- अर्ज भरत असताना परीक्षा अर्थांनी इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12वी शैक्षणिक इत्यादी बद्दलची माहिती मूळ प्रमाणपत्रात भरावी स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो स्कॅन केलेली उमेदवाराची स्वाक्षरी स्वयंघोषणापत्र आणि स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदन पत्रामध्ये अपलोड करायचे असल्यामुळे सोबत ठेवणे आवश्यक आहे
- या परीक्षेमध्ये प्रविष्ट होऊ शकणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ई-मेल किंवा एसएमएस सुविधा या द्वारे होऊ शकणार आहे त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर अचूक द्यावा आणि जतन करून ठेवावा पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन दोन्ही प्रश्नपत्रिका साठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी असा विकल्प निवडा व जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल प्रत्येक सरासरी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही
- अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक पर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने यशस्वीरित्या स्वीकारला जाणार आहे विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय उमेदवाराचा अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
- ऑनलाइन पद्धतीने आवेदन पत्रा सोबतच कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही तसेच आवेदन पत्र किंवा कागदपत्रे आवश्यक आहेत
- गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही
- मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी आधीन राहून उमेदवारांना परीक्षेसाठी तात्पुरता प्रवेश दिला जाणार आहे आणि निकाल घोषित केला जाईल परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक आणि व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल ऑनलाइन पद्धतीने आवेदन पत्रा मध्ये भरलेल्या माहितीमध्ये आणि मूळ कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द केली जाईल
- एकापेक्षा जास्त आवेदन पत्र भरले असतील तर अंतिम भरलेले आवेदन पत्र ग्राह्य धरण्यात येईल आणि आधी सादर केलेल्या आवेदन पत्राचे शुल्क परत केले जाणार नाही
- सन 2018 आणि 2019 च्या टीईटी गैर प्रकारांमध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध केलेली आहे प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याबद्दल खात्री करून वस्तुनिष्ठ माहितआवेदन पत्रा मध्ये भरायचे आहे आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादणूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे असणार आहे तसेच या 2018 आणि 2019 यावर्षीच्या यादीमध्ये समाविष्ट असून सुद्धा खोटी आणि चुकीची माहिती भरून परीक्षेसाठी प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल आणि उमेदवारांनी गांभीर्याने याची नोंद घेणे आवश्यक आहे
- या परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर ती वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासणे आवश्यक आहे TET Exam Timetable 2024
1 thought on “टीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या सविस्तर माहिती : TET Exam Timeble 2024”