women name new rules : महिलांना नाव लिहिण्याबाबत सरकार आणणार नवीन नियम.

women name new rules : मागील वर्षी राज्य शासनाकडून एक नवीन नियम लागू करण्यात आला. या नियमाच्या अंतर्गत राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आपले नाव लिहिताना आपल्या आईचे नाव लिहिणे बंधनकारक असेल असा शासन निर्णय निर्गमित केला. या शासन निर्णयाच्या माध्यमातून व्यक्तीचे पहिले नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव या प्रमाणात नाव लिहिण्याची अट घालण्यात आली.

women name new rules

women name new rules आईचे नाव लिहिणे बंधनकारक या नियमानुसार पुरुषांना नावे लिहिण्यास सोयीस्कर झाले; परंतु विवाहित महिलांना नाव लिहिण्यामध्ये विविध अडचणींचा सामना करावा लागला. या अडचणींना कुठेतरी पर्याय म्हणून राज्य सरकार या नियमांमध्ये विवाहित महिलांना नाव लिहिण्याबाबत नवीन नियमावली जाहीर करणार आहे. ही नियमावली काय असणार नेमकी महिलांना नाव लिहिण्यासाठी काय अडचण निर्माण होते, याची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

काय आहे आईच्या नावाबाबत नियम

राज्य शासनाने मागील वर्षी म्हणजे 2024 मध्ये. आईचे नाव आपल्या नावापुढे लिहिणे बंधनकारक केले. यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या नावाच्या पुढे आपल्या आईचे नाव लिहिणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये व्यक्तीचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव या प्रमाणात नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आलेले  आहे.

महिलांना काय झाली अडचण

शासनाने तयार केलेल्या नवीन धोरणानुसार राज्यातील विवाहित महिलांना आपले नाव लिहिण्यासाठी खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विवाहित महिलेच्या नावाच्या पुढे आईचे नाव पतीचे नाव आणि महिलेचे विवाह नंतरचे आडनाव जोडले जाते. मग अशा परिस्थितीत महिलेने आपल्या आईचे नाव जोडणे उचित राहील का? किंवा जोडलेल्या नावाला काही अर्थ उरतो का? असा प्रश्न महिलांनी निर्माण केला.

हे वाचा: सरकारचा मोठा निर्णय ! लवकरच होऊ शकते घोषणा, सातबारा आईचे नाव बंधनकारक

विवाह नंतरच्या नाव या विषयावर आमदार सना मलिक यांनी विधानसभेत प्रश्न विचारला या प्रश्नावर राज्य सरकारने देखील विचार करून पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.


महिलेचा विवाह झाल्यानंतर महिलेच्या नावांमध्ये बदल केला जातो. विवाहपूर्वी महिलेच्या नावाची रचना महिलेचे नाव वडिलांचे नाव व आडनाव या प्रमाणात असते; परंतु महिलेचे विवाह नंतर महिलेचे नाव तिच्या पतीचे नाव व पतीचे आडनाव या नवीन नावाची निर्मिती विवाह नंतर महिलांच्या बाबत तयार केली जाते.

आता शासनाच्या नवीन नियमानुसार महिलांचे विवाह नंतरच्या नावांमध्ये महिलेच्या आईचे नाव जोडण हे अनेक अडचणी निर्माण करत असल्याच्या तक्रारी सादर झाल्या होत्या. यामध्ये महिलेचे नाव महिलेच्या आईचे नाव महिलेच्या पतीचे नाव आणि महिलेच्या पतीकडील कडील आडनाव या नावाची नवीन नियमानुसार रचना होत आहे. या नावाला कोणताही अर्थ राहत नाही अशी भूमिका महिलांच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली होती.


थोडक्यात पाहिलं तर महिलेचे नाव त्यानंतर महिलेच्या आईचे नाव आणि त्यानंतर महिलेच्या पतीचे नाव हा नाव लिहिण्याचा प्रकार योग्य नसल्याची माहिती देखील आमदार सना मलिक यांनी विधान सभेत मांडली. women name new rules

नवीन नियम काय असणार women name new rules

महिला नावाबाबतच्या या अडचणीचा विचार करत राज्य शासन यामध्ये लवकरच नवीन बदल आणणार आहे. विधानसभेत या प्रश्नावर चर्चा झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी देखील हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असल्याची माहिती दिली. यावर शासनाने लवकरात लवकर चर्चा करून नवीन अधिसूचना जाहीर करण्याबाबतच्या सूचना देखील विधानसभा अध्यक्ष यांनी सरकारला दिले आहेत.


women name new rules यावर सरकार नवीन शासन निर्णय जारी करत महिलांना विवाहपूर्वीचे नाव आणि विवाह नंतरचे नाव अशा पद्धतीचे दोन नावे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिलांना प्रत्येक ठिकाणी लग्न पूर्वीचे नाव आणि लग्ना नंतरचे नाव असे दोन नावे लिहावी लागतील. असा नवीन नियम किंवा नवीन बदल लवकरच राज्य शासन अधिसूचनेच्या माध्यमातून सादर करणार आहे.

women name new rules

Leave a comment

Close Visit Batmya360