पिक विमा 2024 बाबत मोठी अपडेट

पिक विमा 2024 बाबत मोठी अपडेट

खरीप पीक विमा 2024 साठी लवकरच अर्ज सुरू होत आहेत. परंतु या वर्षी पीक विमा 2024 साठी विमा कंपनी कडून काही नियम बदलण्यात आलेले आहेत. आपल्याला त्या बदललेल्या नियमा विषयी माहिती असणे आवश्यक आहे. खरीप  पीक विमा 2024 साठी विमा कंपनी कडून काही नियमावली आखण्यात आलेली आहे. त्या नियमावलीचे पालन केले तरच आपणास पीक विमा मिळू शकतो अन्यथा आपण या योजनेपासून वंचित राहणार यात तिळ मात्र शंका नाही. 

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पिक विमा 2024 बाबत काय आहेत नवीन नियम

पिक विमा 2024 साठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या अनुषंगाने कंपनी कडून आपल्या सात बारा , आधार कार्ड , आणि बँक पाससबूक या बाबत मोठी उडेट देण्यात आलेली आहे. 

सातबारा आधार कार्ड आणि बँक पाससबूक या वर आपले नाव समान नसेल तर आपला पीक विमा अर्ज आता कंपनी ग्राह्य धरणार नाही या सर्व शेतकरी बंधुणी नोंद घेणे आवश्यक आहे. 

समान नाव म्हणजे नेमक काय

बऱ्याच शेतकऱ्यांच्या आधार कार्ड बँक पाससबूक आणि सातबारा या वरील नावात बदल दिसून येत आहे. या बदलामुळे शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज कंपनी कडून रीजेक्ट करण्यात येणार आहेत अशी माहिती कंपनी कडून देण्यात आलेली आहे. 

काय असू शकतो नावात बदल

बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार कार्ड वर असणारे नाव सातबारा किंवा बँक पाससबूक या वार वेगळे दिसत आहे. हे नाव खालील प्रमाणे असेल तरी देखील आपला अर्ज रीजेक्ट होणार आहे. 

मधुकर – मधू 

सखू – सखुबाई 

रामहारी – राम 

चंपा – चंपाबाई/चंफा

गंगा – गंगाबाई 

दत्ता – दत्तात्रय 

ज्ञानदेव – ज्ञानेश्वर /ज्ञानोबा 

बद्रीनाथ – भद्रीनाथ 

बाबू – बाबुराव 

बालाजी –  बालासाहेब 

बाळू – बाळासाहेब

सरूबाई – सरस्वती 

प्रभू – प्रभाकर 

अश्या विविध चुका असू शकतात आपल्याला समजण्यासाठी आम्ही काही उदाहरण दिलेली आहेत. या व अश्या कोणत्याही चुका आपल्या आधार पासबुक किंवा सातबारा वर असतील तर आपण त्या तत्काळ दुरुस्त करून घ्याव्यात तरच आपणास पिक विमा 2024 चा लाभ घेता येणारा आहे. 

 

 

 

 

 

असे बदला नाव

आपल्या ज्या कागदपत्रावर नाव चुकीचे आहे ते कागदपत्र आपणास दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे.

आधार कार्ड वरील नाव बदलण्यासाठी

जर आपल्या सातबारा व पाससबूक वरील नाव बरोबर असेल आणि आपल्या आधार वरील नाव चुकीचे असेल तर आपण आपल्या जवळील  आधार सेंटर वर जाऊन आपले आधार वरील नाव बदलून घेऊ शकता. आपल्या जवळील आधार सेंटर शोधण्यासाठी येथे क्लिक करा. 

पाससबूक वरील नाव बदलण्यासाठी

जर आपल्या पाससबूक वरील नाव चुकीचे असेल तर आपण आपल्या बँक मध्ये जाऊन रीतसर अर्ज करा व त्या अर्जा सोबत आपले आवश्यक असणारे कागदपत्रे जोडा. उदा. आधार कार्ड / पॅन कार्ड / ड्रायव्हिंग परवाना जोडून आपला अर्ज बँक मध्ये सादर करा आपले नाव बदलले जाईल आणि आपणास नवीन पाससबूक दिले जाईल. 

सातबारा वरील नाव बदलण्यासाठी

आपल्याला आपला तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. त्या अर्जा सोबत आवश्यक असणारे कागदपत्रे तसेच आपणास त्या ठिकाणी बॉन्ड वर नोटरी करून देणे सुद्धा आवश्यक आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर आपले सातबारा वरील नाव बदलले जाईल. 

1 thought on “पिक विमा 2024 बाबत मोठी अपडेट”

Leave a comment