ladki bahin yojana last date अर्ज करण्यासाठी हे आहे अंतिम तारीख.

ladki bahin yojana last date महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी महत्त्वकांक्षी योजना अमलात आणली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे अंतर्गत प्रति महिना 1500 रुपये लाभ देण्याचे शासनाने घोषित केलं. त्याचप्रमाणे महिलांना जुलै महिन्यापासून हा निधी वितरित करण्यात देखील सुरुवात केली. यामध्ये ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये एकूण पाच महिन्याचे 7500 जमा देखील करण्यात आले आहेत. परंतु अजून देखील बऱ्याच महिलांनी या योजनेत काही कागदपत्रांचे अभावामुळे अर्ज सादर केले नाहीत त्या महिलांना अर्ज सादर करण्याकरिता अंतिम तारीख काय असणार आहे आणि कधीपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत याबद्दलची माहिती पाहुयात.

ladki bahin yojana last date अंतिम तारीख

ladki bahin yojana last date मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूवातीला जुलै महिन्यात अर्ज करण्यासाठी 15 जुलै तारीख देण्यात आली. त्यानंतर ही तारीख वाढवून 31 ऑगस्ट करण्यात आली त्यानंतरही राज्यातील बऱ्याच महिलांचे अर्ज बाकी असल्यामुळे शासनाकडून अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर ही तारीख अंतिम ठेवण्यात आली. परंतु तरीदेखील राज्यातील पात्र महिलांचे पूर्णतः अर्ज भरले नसल्यामुळे शासनाकडून परत अर्ज करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. परंतु निर्णय घेतल्यानंतर देखील हे अर्ज सुरू नव्हते.

अर्ज स्वीकारणे बाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आलेल्या नव्हत्या. 10 ऑक्टोंबर रोजी प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या पद्धतीच्या सूचना दिल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करता येतील अशा सूचना देण्यात आल्या. त्यासोबतच ज्या महिलांना अर्ज सादर करायचे आहेत त्या महिलांनी 10 ऑक्टोबर पर्यंत आपले अर्ज सादर करावेत या पद्धतीचे आव्हान देखील महिला व ग्रामविकास विभागाच्या मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांच्यामार्फत करण्यात आले.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
UPI Transaction Charges UPI Transaction Charges: UPI व्यवहार महागणार? खासगी बँकांनी सुरू केले शुल्क आकारणे, तुमच्या खिशावर परिणाम होणार का?

महिलांना येत्या 15 ऑक्टोबर पर्यन्त अर्ज करता येतील.

अर्ज कोठे सादर करावा

ladki bahin yojana last date ज्या महिलांचे अर्ज करणे बाकी आहे त्या महिलांनी 15 ऑक्टोबर च्या आत आपले अर्ज सादर करावेत, अर्ज करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळील अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत झालेल्या काही गैर प्रकारामुळे सरकार कडून फक्त अंगणवाडी सेविकेंच्या माध्यमातून अर्ज स्वीकारणे चालू आहे.

अर्ज अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज भरून दिल्या नंतर त्या सोबत सर्व कागदपत्रे जोडून देणे आवश्यक आहे. अर्ज अंगणवाडी सेविका यांच्याकडे सादर केल्या नंतर आपला अर्ज अंगणवाडी सेविका यांच्याकडून ऑनलाइन करण्यात येईल. अर्ज ऑनलाइन झाल्या नंतर अर्ज प्राप्त झाल्याचा मेसेज देखील अर्जदारच्या मोबाइल वर पाठवण्यात येईल.

हे पण वाचा:
student st pass आता एसटी बस पास मिळणार थेट शाळेतच student st pass

लाडकी बहीण योजना पात्रता

  • महिलेचे वय 21 ते 65 दरम्यान असावे.
  • मागील पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्यात रहिवासी असावी.
  • महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावे
  • महिला इतर कोणत्याही शासकीय योजनेची लाभ घेत नसावी.
  • महिला कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय कंत्राटी कर्मचारी म्हणून नियुक्ती नसावी
  • महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय कर्मचारी नसावा.

(ladki bahin yojana last date) लागणारे कागदपत्रे

  • लाडकी बहीण योजना अर्ज
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड / शाळा सोडलेले प्रमाणपत्र / निर्गम उतारा.
  • केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड / उत्पन्न प्रमाणपत्र
  • सहमति पत्र.
  • पासपोर्ट फोटो
  • मोबाइल क्रमांक.

Leave a comment