श्रावण बाळ योजना : shravan bal yojana

     महाराष्ट्र  राज्य हे सर्वांगाणे संपन्न असे राज्य आहे. महाराष्ट्र राज्य शासन नागरिकांच्या फायद्याच्या योजना ज्या मधून नागरिकांना नेहमीच काही ना काही फायदा होईल अशा योजना राबविण्यास कटिबद्ध आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

   अश्याच एक श्रावण बाळ योजना अमलात आणलेली आहे. आपण आज या लेखात श्रावण बाळ सेवा राज्य निवृती वेतन योजना sharvan bal yojna  या योजने विषयीची  आवश्यक पात्रता काय आहे ,अर्ज कसा सादर करावा ,कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

   श्रावण बाळ सेवा राज्य निवृती वेतन योजना sharvan bal yojna अंतर्गत वय वर्ष 65 वर्ष  व 65 वर्षावरील गरजू, गरीब, आर्थिक दृष्टा कमजोर,निराधार वृद्ध लाभयार्थ्याना महाराष्ट्र राज्य शासना तर्फे प्रतिमहा 1500 रुपये बँक खात्यावर वितरित केले जातात… 

 

योजनेचे नाव

श्रावण बाळ सेवा राज्य निवृती वेतन योजना

राज्य

महाराष्ट्र

विभाग

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील 65 व 65 वर्षावरील जेष्ट नागरिक

लाभ

1500 रुपये प्रती महिना

योजना कधी सुरवात झाली

2016 साली

योजनेचे उदिष्ट

जेष्ट नागरिकांना आर्थिक सहाय्य करणे

श्रावण बाळ योजना

श्रावण बाळ योजणेचा उद्देश

  •     या योजनेतून जेष्ट व्यक्तिना त्यांच्या रोजच्या गरजेसाठी कोणावर अवलंबून न राहता दैनंदिन खर्चासाठी आर्थिक सहाय्य देणे हा श्रावण बाळ योजनेचा मुख्य उद्देश आहे
  • महाराष्ट्रातील जेष्ट व्यक्तिना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे
  • जेष्ट नागरिकांचा आर्थिक विकास सुधारणे.

श्रावण बाळ योजनेचे वैशिष्ट

  • महाराष्ट्रातील वयोवृद्ध जेष्ट व्यक्तीनां जे आर्थिक दृष्ट्या मागासलेले आहेत अश्या नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची योजना आहे
  • श्रावण बाळ योजनेत अर्ज करण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे
  • श्रावण बाळ योजने अंतर्गत मिळणारी रक्कम लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात dbt च्या मदतीने जमा केली जाते.
  • या योजणेमुळे वय वर्ष 65 व 65 वर्षावरील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरज भागवण्यासाठी मदत मिळते.

श्रावण बाळ योजना साठी पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा
  • त्याने वयाचे 65 वर्ष पूर्ण केलेल असावे
  • लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे
  • लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21000 रुपये पेक्षा कमी असावे
  • अर्जदार केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याची पेन्शन योजनेचा लाभ घेत नसावा.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ति सरकारी कर्मचारी नसावा.

श्रावण बाळ योजना आवश्यक कागदपत्रे

  • वयाचा दाखला (आधार कार्ड / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडलेला दाखला) या पैकी एक
  • महाराष्ट्रात मागील 15 वर्षापासून वास्तव्यास असलेला पुरावा (डोमसाइल प्रमाणपत्र/ ग्रामपंचायत दाखला / नगरसेवक दाखला)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न 21000 रुपये पेक्षा जास्त नसावे)
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • BPL रेशन कार्ड
  • पासपोर्ट फोटो
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असलेले प्रमाणपत्र
  • मतदान कार्ड
  • बँक पासबूक झेरॉक्स
  • मोबाइल क्रमांक

    इत्यादि कागदपत्रे आपणास नोंदणी साठी आवश्यक आहेत 

श्रावण बाळ योजनेत अर्ज करण्याची प्रक्रिया

     श्रावण बाळ योजने मध्ये 1 ऑनलाइन 2 ऑफलाइन अश्या दोन्ही पद्धतीने अर्ज दाखल करता येतो, आपण दोन्ही पद्धतीने कसा अर्ज सादर करायचा या विषयी माहिती घेऊयात.

1. ऑफलाइन

     या योजनेत सहभागी होयचे असल्यास आपण सर्व प्रथम आपल्या ग्रामपंचायत कार्यालय / तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क करून विहित नमुन्यात मिळणार अर्ज व्यवस्थित भरून सोबत वर दिलेली सर्व कागदपत्रे जोडून कार्यालयात जमा करावी. जमा केल्या नंतर संबंधित कर्मचाऱ्याकडून पोहच पावती घ्यावी. 

   वरील प्रमाणे कार्यवाही करून आपण आपला ऑफलाइन अर्ज सादर करू शकता. आपण अर्ज सादर केल्या नंतर आपणास आपला अर्ज सादर झाल्याची पोहोच दिली जाईल तसेच आपला अर्ज प्राप्त झाल्याचा संदेश देखील आपल्या मोबाइल क्रमांकावर पाठवण्यात येईल. 

श्रावण बाळ योजना फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा Shravan-Bal-Yojana-form-pdf

2. ऑनलाइन

  •      ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम आपण https://aaplesarkar.mahaonline.gov.in/mr/Registration/Register या संकेतस्थळावर जा. 
  • येथे आपणास नवीन यूजर नोंदणी पर्यायांचा वापर करा.
  • आपली नोंदणी पूर्ण करून आपण एक यूजर आयडी व पासवर्ड तयार करता येईल.
  • आपला आयडी व पासवर्ड टाकून आपण लॉगिन करू शकता. 
  • लॉगिन केल्यानंतर आपल्या समोर एक शोधा असा टॅब दिसेल त्या मध्ये आपण श्रावण बाळ असे नाव शोधा.
  • आपल्या समोर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग असा पर्याय दिसेल. 
  • त्या मध्ये आपणास संजय गांधी निराधार योजना / श्रावण बाळ योजने अंतर्गत प्राप्त अर्जदार निर्णय घेणे असा पर्याय दिसेल.
  • आपण संजय गांधी निराधार योजना / श्रावण बाळ योजने अंतर्गत प्राप्त अर्जदार निर्णय घेणे या पर्यायावर क्लिक करून आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरावी
  • शेवटी आपला अर्ज सबमीट करावा.

श्रावण बाळ योजना लाभार्थी यादी पाहणे

  • सर्व प्रथम आपणास शासकीय संकेतस्थळावर जावे लागेल.
  • लाभार्थी यादी या पर्यायावर क्लिक करावे.
  • त्या ठिकाणी आपला जिल्हा , आपला तालुका , आपली ग्रामपंचायत निवडावी लागेल.
  • श्रावण बाळ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी यादी आपल्या समोर दिसेल.

निष्कर्ष

      आपण किंवा आपल्या जवळील एखादी व्यक्ति या योजनेसाठी वरील पात्रतेनुसार  पात्र असेल तर आपण त्यांचा अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने भरू शकता.

         आम्ही अशी आशा करतो की वरील सर्व माहिती आपणास समजली असेल. तरी देखील आपणास काही शंका असल्यास आपण आमच्या ईमेल किंवा व्हाटअप वर संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता. आम्ही नक्कीच आपल्या शंकेचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू. जर आपल्या जवळील कोणाला या योजनेचा लाभ घेयचा असेल तर आपण त्यांना ही माहिती शेयर करा जेणे करून आपल्या जवळील व्यक्ति या योजनेचा लाभ घेऊ शकेल

FAQ

    1   श्रावण बाळ योजना आवश्यक कागदपत्रे कोणती ?

  • अर्ज,आधार कार्ड, मतदान कार्ड ,बँक पासबूक, उत्पन्न प्रमाणपत्र, BPL प्रमाणपत्र, डोमसाईल, पॅन कार्ड, मोबाइल क्रमांक इत्यादि

    2 श्रावण बाळ योजना अंतर्गत लाभार्थ्याला किती रक्कम दिली जाते?

  • श्रावण बाळ योजने अंतर्गत लाभार्थ्याला प्रतिमहा 1500 रुपये दिले जातात.

   3 श्रावण बाळ योजना अंतर्गत ऑनलाइन अर्ज करता येतो का ?

    4 श्रावण बाळ योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी वय मर्यादा किती आहे ?

  • अर्जदाराचे वय 65 वर्ष किंवा 65 वर्षा पेक्षा अधिक असावे.

   5 श्रावण बाळ योजना अंतर्गत कोठे अर्ज करू शकतो ?

  • आपण ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.