लाडकी बहीण योजना फक्त याच महिलांना मिळणार लाभ. ladki bahin yojana first beneficiary

ladki bahin yojana first beneficiary फक्त याच महिलांना मिळणार लाभ

    महाराष्ट्रातील जनतेला वेड लावलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल एक महत्वाची बाब समोर आली आहे. 17 ऑगस्ट ला मिळणारा हप्ता राज्यातील सर्व महिलांना मिळणार नसून फक्त त्याच महिलांना मिळणार ज्यांचे अर्ज या तारखेच्या आत मंजूर झाले आहेत. 

    महाराष्ट्र राज्यातील महिलांना राज्य सरकार कडून प्रती महिना 1500 रुपये लाभ देण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवण्यात आली आहे. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

    लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलानी आपले अर्ज सादर केले आहेत तसेच अजून देखील पात्र लाभार्थी महिला आपले अर्ज सादर करत आहेत.  

फक्त याच महिलांना मिळणार पहिला हप्ता.

    राज्यातील ज्या आपले अर्ज सादर केले आहेत त्यातील बहुतांश महिलांचे अर्ज तपासणी करून मंजूर करण्यात आले आहेत. परंतु ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले नाहीत अश्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे अर्ज 14 ऑगस्ट पूर्वी मंजूर होतील अश्याच महिलांना 17 ऑगस्ट रोजी या योजनेची रक्कम मिळणार आहे. ज्या महिलांचे अर्ज  अजून मंजूर झाले नाहीत किंवा 14 ऑगस्ट नंतर मंजूर होतील अश्या महिलांना 17 ऑगस्ट रोजी लाभ दिला जाणार नाही. अशी माहिती सरकार कडून देण्यात आली आहे. फक्त याच महिलांना मिळणार लाभ

3 thoughts on “लाडकी बहीण योजना फक्त याच महिलांना मिळणार लाभ. ladki bahin yojana first beneficiary”

Leave a comment

Close Visit Batmya360