Gharkul survey: घरकुल योजना 2025 नवीन नाव नोंदणी सुरू. अशी करा नोंदणी.

Gharkul survey : केंद्र शासन तसेच राज्य शासनाकडून देशातील हक्काचे घर नसणाऱ्या नागरिकांसाठी घरकुल योजना राबवल्या जातात. या योजनेअंतर्गत ज्या व्यक्तीने अर्ज सादर केलेले आहे किंवा ज्या व्यक्तींचे याआधी नाव ड यादीमध्ये समाविष्ट आहे अशाच व्यक्तींना हा लाभ दिला जातो. यामध्ये ज्या व्यक्तींचे ड यादीमध्ये नाव नसतील त्या व्यक्तींना नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया किंवा त्यांचा सर्वे (Gharkul survey) आता सुरू झालेला आहे. या सर्वे (Gharkul survey) च्या माध्यमातून आपल्याला आपली नाव नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. घरकुल योजनेमध्ये नाव नोंदणी प्रक्रिया कशी पूर्ण करायची याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

याआधी 2018 मध्ये सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते. बऱ्याच नागरिकांना पात्र असताना देखील या सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवता आला नव्हता. ज्यामुळे अशा नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जात नव्हता. आता या नवीन सर्वेक्षणाच्या माध्यमातून या नागरिकांना आपले नाव नोंदवता येणार आहे. ज्या नागरिकांचे जुन्या यादीतील नाव रद्द करण्यात आले होते त्या नागरिकांना देखील आता संरक्षणाच्या माध्यमातून आपले नाव परत यादीमध्ये समाविष्ट करता येणार आहे.Gharkul survey

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Gharkul survey

कशी असेल प्रक्रिया

या सर्व क्षणांमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी आणि आपले नाव घरकुल यादीमध्ये जोडण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी एका पर्यायाच्या माध्यमातून आपण स्वतः देखील आपला सेल्फ सर्व करून आपले नाव नोंदवू शकतात. यामध्ये नोंदणी करण्यासाठी आपण आपल्या ग्रामसेवक यांनी केलेल्या सर्व च्या माध्यमातून देखील आपले नाव नोंदवू शकता. ज्या ठिकाणी ग्रामसेवक यांच्या माध्यमातून सर्वे पूर्ण केले जातील त्या सर्वेची (Gharkul survey) देखील नावे यादीमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. काही ठिकाणी ग्रामसेवकाच्या माध्यमातून सर्व पूर्ण केले जात नाहीत अशा ठिकाणी स्वतः लाभार्थी देखील आपले सर्वे पूर्ण करून आपले नाव नोंदवू शकतात.

हे वाचा : महाडीबीटी पोर्टलवर अशी पहा… कृषी योजनांची लाभार्थी यादी !

सर्वे कसा कारावा

आवास प्लस 2024 सर्वे या नावाचे ॲप प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. ॲपच्या माध्यमातूनच ग्रामसेवक यांच्या माध्यमातून देखील आणि स्वतः लाभार्थी यांचे माध्यमातून देखील नाव नोंदणी सर्वे पूर्ण करता येणार आहे. जर आपल्याला आपली स्वतः नाव नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायचे असेल तर आपल्या मोबाईल मध्ये हे ॲप इंस्टॉल करणे आवश्यक आहे. त्यासोबतच आधार फेस आरडी हे ॲप देखील आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. या दोन ॲपच्या माध्यमातून आपण आपला सेल्फ सर्वे पूर्ण करू शकता.Gharkul survey

सर्व्हे करुन नाव नोंदणी पुर्ण

सर्वे पूर्ण केल्यानंतर आपले नाव आपल्या ड यादीमध्ये समाविष्ट केले जाईल. द यादीमध्ये नाव समाविष्ट झाल्यानंतर या यादीतील लाभार्थ्यांना बाकीच्या कागदपत्राची पूर्तता करून व तपासणी करून यांना घरकुलाचा लाभ दिला जातो. जर सेल्स सर्वे पूर्ण केल्यानंतर देखील या अर्जदारांची फेर तपासणी केली जाते. फेर तपासणी दरम्यान अर्जदार घरकुल योजनेसाठी पात्र असेल तरच त्याला लाभार्थ्याला घरकुला योजनेचा लाभ दिला जातो. परंतु जर ड यादीमध्येच नाव नसेल तर या लाभार्थ्यांना पात्र असून देखील कोणताही लाभ दिला जात नाही. त्यामुळे असे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहतात. म्हणून चे लाभार्थी घरकुल योजनेसाठी पात्र आहेत त्या लाभार्थ्यांनी ग्रामसेवक यांच्या माध्यमातून किंवा आपण स्वतः आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सेल्फ सर्वे पूर्ण करणे आवश्यक आहे. Gharkul survey

Leave a comment