शेतजमीन मोजणी नियम
शेतजमीन मोजणी नियम
या योजनेमध्ये भूमी अभिलेख विभाग ऑनलाइन पद्धतीने जमीन मोजण्याची प्रक्रिया राबवत आहे, तर आपण आज शेत जमीन मोजणी, त्याचे नियम काय, जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा ते आपण आज थोडक्यात माहिती करून घेऊ या. त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचवा.
अनेकदा असे होते की आपल्या सातबारावर जितकी जमीन एखाद्या व्यक्तीच्या नावावर आहे, तितकी जमीन प्रत्यक्षात दिसत का नाही, असा प्रशन शेतकऱ्यांना किंवा जमीन नावावर असणाऱ्याव्यक्तीच्या मनात येतो त्यामुळे मग आपल्या जमिनीवर शेजारच्या शेतकऱ्यांना अतिक्रमण केले की काय, अशी शंका त्यांच्या मनात येते. शेजाऱ्या मुळे, तर भाऊ भावामुळे, होणाऱ्या बांधाविषयी वाद मिटवण्यासाठी शेत जामीन मोजने हा पर्याय सर्वात उत्तम मानला जातो.
तर तसेच आज आपण शेत जमीन मोजणी नियम पाहणार आहोत, आणि या होणाऱ्या वादामुळे जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा ते आपण आज बघूया.
ऑनलाइन पद्धतीने जमीन मोजणीसाठी आता ऑफिसला जायची गरज नाही, त्यासाठी शेतकऱ्यांना आता घरात बसल्यात ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
Mahabhumilekh.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही तुमच्याजमिनीचा सातबारा पाहू शकतात, तुम्हाला तुमच्या सातबारावर किती जमीन आहे ते समजेल. अनेकदा सातबारावर असणारी जमीन आणि प्रत्यक्षात असणारी जमीन यामध्ये खूप मोठा फरक आढळतो, अशावेळी शासकीय पद्धतीने मोजणी करून घेणे हा खूप चांगला पर्याय आहे त्यासाठी शेत जमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो.
जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा.
शेतजमीन मोजणी अर्ज करण्याची पध्दत
- सर्वप्रथम तुम्हाला गुगलला ई मोजणी भूमी अभिलेख असे तुम्हाला सर्च करावं लागेल.
- https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ ही वेबसाईट ओपन करा.
- त्या नंतर तुम्हाला नागरिकांसाठी या पर्याय वर. क्लिक करा. नवीन नागरिक नोंदणी म्हणुन पर्याय दिसतील
- या ठिकाणी तुम्ही जामीन मोजणी साठी नोंदणी करु शकतात.
जामीन मोजणीचे तीन प्रकार आहेत
- साधी मोजणी
साहा महिन्याच्या कालवधीत ही मोजणी केली जाते.
- तातडीची मोजणी
तीन महिन्यापर्यंत तातडीची मोजणी ही करावी लागते
- अति तातडीची मोजणी
दोन महिन्याच्या आत अति तातडी मोजणी ही केली जाते.
जमीन मोजणी फी
- साधी मोजणी
1000 रु. प्रति हेक्टर फी.
- तातडीची मोजणी
2000रू. प्रती हेक्टर फी.
- अति तातडीची मोजणी
3000रू. प्रती हेक्टर फी.
सरकारी जमिनी मोजणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
ज्या व्यक्तीला ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्या जमिनीचा चालू महिन्यातील सातबारा उतारा.
- लाभार्थी व्यक्तीच्या जमिनीच्या चतु: तलाठी कार्यालयाकडून दिला गेलेला दाखला, जमिनी मोजणी ही साधी मोजणी, तातडीची मोजणी किंवा अति तातडीची मोजणी यापैकीची मोजणी तुम्हाला करायची आहे, त्याचा उल्लेख अर्जामध्ये व त्यानुसार मोजणी फी भरेल बँक चलन.
- जमिनीच्या बाजूला वाद आहे, त्याबाबत नोंदणी
- ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्या जमिनीचा कच्चा नकाशा.
- जमिनीचे हात कायम करणे, जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज, वहिवाटीप्रमाणे क्षेत्रदर्शनी अथवा अतिक्रमण मोजणी नकाशा साठी अर्ज करायचा आहे नमूद करणे
1 thought on “शेतजमीन मोजणी नियम काय आहे प्रक्रिया व अर्ज पद्धत.”