महिला उद्योगिनी योजना (Loan)
महिला उद्योगिनी योजना (loan)
मित्र आणि मैत्रिणींनो मी तुम्हाला आज सरकारची एक अशीच योजना आहे जी महिलांसाठी आहे. आपल्या या राज्यांमध्ये किंवा देशांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या खूप सार्या योजना राबवल्या जातात जास्तीत जास्त योजना तर मुलींसाठी ,महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी, शैक्षणिक अशा आहेत. तर आपण आज अशाच एक योजना पाहणार आहोत जी महिलांसाठी आहे .महिलांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही. तर काही महिला अशा असतात की त्यांना काहीतरी करायची इच्छा असते तर खूप इच्छुक असतात पण पैशाची अडचण येते त्यामुळे त्या काही करू शकत नाही. तर अशाच महिलांसाठी सरकारने महिला उद्योगिनी कर्ज योजना अमलात आणलेले आहे. जेणेकरून या योजनेचा लाभ महिला घेऊ शकते आणि कमी व्याजदरामध्ये आपल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकेल. चला तर आपण आज या लेखांमध्ये महिला उद्योगिनी कर्ज योजना म्हणजे काय, याचा लाभ कोणाला दिला जाईल, पात्रता, उद्देश , लागणारे आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत, या सर्वांची माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.
योजनेचे नाव | महिला उद्योगिनी योजना (Loan) |
कोणा द्वारे सुरू केली | केंद्र सरकारद्वारे |
लाभ | तीन लाख रुपये पर्यंत |
योजनेची सुरुवात | 2020 पासून |
महिला उद्योगिनी योजना माहिती
हि योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ज्या महिला काहीतरी करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला उद्योगिनी योजना सुरू करण्यात आली. या योजनेची सुरुवात 2020 मध्ये उद्योगिनी योजना म्हणून राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत महिला 88 प्रकारचे उद्योग सुरू करू. काही वेळा असे होते की महिलांना काहीतरी करण्याची इच्छा असते पण त्यासाठी त्या महिलेची आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे त्या महिलाला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी पुरेसे पैसे नसतात तर अशा महिलांना या योजनेचा खूप फायदा होणार आहे कमी व्याजदरात महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी पैसे दिले जातील. महिलाला कर्जाच्या रकमेवर 10 टक्के ते 12 टक्के व्याज द्यावी लागेल. हे कर्ज महिलांना बँकेकडून दिली. या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाईल.
ही योजना देशातील सरकारच्या महिला विकास महामंडळामार्फत उद्योगिनी योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत महिलांना कुटुंबाचे उत्पन्न वाढण्यास मदत करता येईल.
महिला उद्योग योजनेचे फायदे
- या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना तीन लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकेल.
- या योजनेद्वारे 88 लघु उद्योग अंतर्गत वर्गीकृत व्यवसाय सुरू करू शकतात.
- उद्योगिनी योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यास संधी मिळणार आहे.
- या योजनेअंतर्गत व्यवसाय नियोजन, किंमत, व्यवहार, खर्च आणि बरेच काही याबद्दल महिलांना कार्यक्षमता कौशल्य पोहोचवणे या योजनेचा उद्देश आहे.
- महिलांना त्यांच्या कर्जाचे परतफेड करताना मदत करण्यासाठी या योजनेअंतर्गत कर्जावर 30 टक्के सबसिडी देते.
- जर कोणाला कृषी क्षेत्रात व्यवसाय सुरू करायचा असेल तर बिनव्याजी कर्ज उपलब्ध आहे.
- या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या महिलाच्या कुटुंबाला दैनंदिन खर्चामध्ये हातभार लागेल
महिला उद्योगिनी योजना पात्रता
- महिला उद्योगिनी योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदार ही फक्त महिलाच असावी.
- अर्जदार महिलाही भारतीय नागरिक असायला हवी.
- या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी महिलेचे वय 18 ते 55 दरम्यान असावे.
- लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.
- लाभार्थी कोणत्याही वित्तीय संस्थेच्या मागील कर्जत चूक केलेली नसावी
- या योजनेमध्ये विधवा, अपंग महिला, तसेच SC ST महिला देखील या योजना व्याजमुक्त कर्ज मिळविण्यास पात्र आहे.
महिला उद्योगिनी कर्ज योजनेचे उद्दिष्टे
- या योजनेची असे उद्दिष्टे आहेत की अनुसूचित जाती जमाती गरीब आर्थिक दृष्ट्या दुर्गा असणाऱ्या कुटुंबातील महिलांना कमी व्याजदर प्रदान करणे.
- EDP कार्यक्रमाद्वारे महिलांना प्राप्तकत्याचे यश सुनिश्चित करणे.
- या योजनेअंतर्गत उपजीविकेसाठी बँक आणि इतर वित्तीय संस्थाकडून महिलांना कर्ज घेण्याची मुभा देणे
महिला उद्योगिनी योजना वैशिष्ट्ये
- या योजनेच्या माध्यमातून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.
- महिला उद्योग योजनेच्या माध्यमातून 88 लघुउद्योग अंतर्गत वर्गीकृत व्यवसाय सुरू करू शकतात.
- या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 3 लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाईल.
महिला उद्योगिनी योजना अंतर्गत समर्थित व्यवसायाची यादी (business list )
1 अगरबत्ती उत्पादन
2 खाद्यतेला व्यापारी
3 लायब्ररी
4 रेडिओ आणि टीव्ही सेवा
5 बेकरी
6 बेडशीट आणि टॉवेल mfg.
7 फेअर ट्रेड दुकान
8 लिफ mfg.
9 रियल इनस्टेट एजन्सी
10 ब्युटी पार्लर
11 बॉटल कॅपmft.
12 माशांचे स्टॉल
13 मॅच बॉक्स mfg.
14 लेकरांच्या कपड्याचे उत्पादन
15ओले पीसने
16 भाजीपाला विक्री
17 टायपिंग संस्था
18 शिकवण्या
19 ट्रॅव्हल एजन्सी
20 पप्पा
21 टेलरिंग
22 मिठाई चे दुकाने
23 STD भूत
24 स्टेशनरी दुकान
25 साबण तेल, केक उत्पादन
26 रेशीम – आळी संगोपन
27 रेशीम धाग्याचे उत्पादन
28 दुकाने आणि आस्थापना
29 रेशीम विणकाम
30 शिकाकाई पावडर निर्मिती
31 सुरक्षा सेवा
32 साडी आणि भरत काम
33 रिबन उत्पादन
34 तयार कपडे
35 नाचणी पावडर चे दुकान
36 रेडिओ आणि टीव्ही सेवा
37 रजाई आणि बेड उत्पादन
38 छपाई आणि रंगारी
39 प्लास्टिक वस्तू दुकान
40 फिनाईल आणि नॅप्थालीन
41 फोटो स्टुडिओ
42 पापड निर्मिती
43 पान मसाला दुकान
44 पान आणि सिगारेट चे दुकान
45 जुने पेपर मार्ट
46 नायलॉन बटन उत्पादन
47 मटणाचे स्टॉल
48 दुधाचे मंडपण
49 चटई विकणे
50 टायपिंग आणि फोटोकॉपी
51 जॅम, जेली आणि लोणचे उत्पादन
52 शाही उत्पादन
53 आईस्क्रीम पार्लर
54 हस्तकला उत्पादन
55 जिम केंद्र
56 भेटवस्तू
57 पादत्राणे उत्पादन
58 इंधनाचे लाकूड
59 पिठाची गिरणी
60 फुलाचे दुकाने
61 फॉक्स पेपर उत्पादन
62 ऊर्जा अत्र
63 दूध व्यवसाय आणि कुक्कुटपालन
64 बाहेर खा
65 सुक्या मासळीचा व्यापार
66 कोरडी स्वच्छता
67 डायग्रो सिस्टीक लॅब
68 कपड्याचा व्यापार
69 कॉफी आणि चहा पावडर
70 पन्हाळी बॉक्स उत्पादन
71 साफसफाई चे पावडर
72 खडू क्रिया उत्पादन
73 नारळाचे दुकान
74 चप्पल निर्मिती
75 मसाले
76 चिकित्साल्य
77 क्रेचे
78 कॅन्टीन आणि केटरिंग
79 बांबू आर्टिकल् मॅच्युफॅक्चरिंग
80 पुस्तके आणि नोटबुक बंधनकारण
81 बांगड्या
82 केळीच्या पानाचे उत्पादन
83 चिनी माती पासून बनणारे वस्तू उत्पादन
84 मातीची भांडी
85 एनर्जी फूड
86 चहा हॉटेल
87 घरगुती वस्तू किरकोळ
88 जनरल स्टोअर्स
महिला उद्योगिनी कर्ज योजना अटी व नियम
- या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी अर्जदार फक्त महिलाच असली पाहिजे या व्यतिरिक्त दुसरे कोणाला लाभ दिला जाणार नाही.
- महिला उद्योगिनी कर्ज योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी महिलाही भारतीय नागरिक असायला हवी.
- ज्या महिलेचे वय 18 ते 55 दरम्यान आहे तीच महिला या योजनेसाठी लाभार्थी असेल.
- ज्या महिलेचे वय 18 पेक्षा कमी आणि 55 पेक्षा जास्त असल्यास त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये पेक्षा जास्त नसावी जर त्या महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न दीड लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेमध्ये विधवा अपंग महिलांना तसेच SC ST महिला देखील या योजना व्याज मुक्त कर्ज मिळू शकते.
- विधवा आणि विकलांग महिलांसाठी वार्षिक उत्पन्न कोणतीही अट नाही. त्या महिलांचे कितीही उत्पन्न असेल तरी त्या महिलांना या योजनेसाठी अर्ज करू शकतील
महिला उद्योगिनी कर्ज (Loan) योजना आवश्यक लागणारे कागदपत्रे
- लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
- महिलांचे पॅन कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- ती महिला विधवा असल्यास तीच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
- राशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खाते क्रमांक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचे फोटो
महिला उद्योगिनी कर्ज योजना अर्ज करण्याची पद्धत
महिला उद्योगिनी योजना या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिला ऑफलाइन ऑनलाईन आशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल.
ऑफलाइन
ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणतेही बँकेत जाऊन महिला उद्योगिनी योजना फॉर्म घ्यावा लागेल.
तो फॉर्म व्यवस्थित वाचून त्यामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थित भरावी. आवश्यक लागणारे कागदपत्र सर्व जोडावे. आणि तो अर्ज बँकेकडे जमा करायचा आहे. तसेच खाजगी वित्तीय संस्था मधून देखील तुम्ही अर्ज भरू शकतात.
ऑनलाइन
जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा असेल तर बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तेथून देखील तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकतात. त्यानंतर तुम्हाला एक Mail येतो त्यानंतर तुम्ही Loan घेऊ शकतात
अशाप्रकारे ऑफलाइन ऑनलाइन दोन्ही पद्धतीने या योजनेचा अर्ज करू शकतात.
4 thoughts on “महिला उद्योगिनी कर्ज योजना व्यवसाय कर्ज वितरण”