बचत गटातील महिलांसाठी ड्रोन दिदी योजना

ड्रोन दीदी योजना

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्या देशात वेगवेगळ्या शेती विषयी योजना राबवल्या जातात तुझ्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असतात शेतकऱ्यांची प्रगती व्हावी त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी असा या सरकारचा विचार आहे त्यामुळे या विषयावर मोठ्या योजना राबवल्या जात आहेत शेती विषयी तर तशीच आज आपण एक नवीन योजना पाहणार आहोत त्या योजनेचे नाव ड्रोन दीदी योजना आहे ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये या योजनेची घोषणा केलेली आहे. या ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडवणे, डेटा  विशलेषण आणि ड्रोन ची दुरुस्ती या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या ड्रोन च्या साह्याने पिकाची निगराणी, कीटनाशके, युरियाची फवारणी आणि पिकांची पेरणी हे सर्व या ड्रोन च्या साह्याने करता येणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठी मदत होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लागणारे मजूर कमी होणार आहे आणि कमी कालावधीमध्ये जास्त काम होणार आहे. त्यासाठी अगोदर या ड्रोनचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. म्हणजे या ड्रोन चा पिकांसाठी कसा वापर करायचा, ड्रोन ची wexदुरुस्ती, या ड्रोन चा कसा वापर करायचा याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ड्रोन दीदी योजना

ड्रोन दीदी योजना

योजनेचे नाव

ड्रोन दीदी योजना

कोणामार्फत राबवली जाते

केंद्र सरकार

विभाग

महिला व ग्रामविकास विभाग

अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन

योजनेची सुरुवात

नोव्हेंबर 2023 मध्ये

लाभ

8 लाख रुपये

लाभार्थी

स्वयं सहाय्यता समूहा गटातील महिला

अधिकृत संकेतस्थळ

अजून उपलब्ध नाही

ड्रोन दीदी योजना माहिती

ही योजना पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी 28 नोव्हेंबर 2023 रोजी योजनेची  घोषणा केलेली आहे.

या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच आहे. ज्या महिला बचत गटात आणि कृषी क्षेत्राशी संबंधित आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल. हे ड्रोन महिला बचत गटांना सरकार पुरवणार आहे याचा वापर खत फवारनी आणि इतर कृषी कामासाठी केला जाईल. या योजनेची माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, 2024 – 25 ते 2025 – 2026 या कालावधीत शेतकऱ्यापर्यंत कृषी उद्योगासाठी भाड्याने सेवा देण्यासाठी 15,000 निवड महिला स्वयंसहाय्यता गटांना ड्रोन प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट.

      ड्रोन योजना महिलांसाठीच आहे या योजनेअंतर्गत 15 ,000 बचत गटांना शाश्वत व्यवसाय आणि उपजीविकेसाठी मदत करेल. यामुळे महिलांना वर्षाला 1,00,000 रुपयाचे उत्पन्न मिळू शकेल. एवढेच नाही तर शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना दोन भाड्याने उपलब्ध करून दिले जाणार आहे यासाठी शेतकऱ्यांना खूप मोठी आर्थिक मदत होणार आहे. या योजनेवर सरकारने पुढील चार वर्षात अंदाजे 1,261 कोटी रुपये खर्च करणार आहे.

ड्रोन दीदी योजना उद्दिष्टे

  • ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे महिला स्वयं  सहाय्यता समूह ड्रोन योजना हा मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेचा मुख्य उद्देश देशातील शेतकऱ्यांना शेतीसाठी तंत्रज्ञान पद्धतीने शेती करण्यासाठी आहे.
  •  ड्रोन दीदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतामध्ये खत फवारण्या इत्यादी कामासाठी आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • छोट्या मोठ्या गावांमध्ये कमी खर्चामध्ये उत्पन्नात वाढ व्हायला मदत होईल.
  •  या देशांमध्ये जवळपास दहा करोड महिला स्वयं सहाय्य समूहात काम करतात तर 15,000 महिलांना स्वयं सहाय्यता चालकांना ड्रोन मिळेल.

ड्रोन दीदी योजनेअंतर्गत आर्थिक मदत कशी मिळणार

  • या योजनेअंतर्गत ड्रोन आणि त्या संबंधित उपकरणाच्या खरेदीसाठी एकूण रकमेच्या 80 टक्के किंवा जास्तीत जास्त 8 लाख रुपये एवढी आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे.
  • ड्रोन चा वापर आर्थिक दृष्ट्या जिथे शक्य असेल त्या भागातल्या महिला बचत गटाशी आधी निवड केली जाईल आणि मग त्यांना ड्रोन पुरवले जातील. या देशातल्या वेगवेगळ्या राज्यात एकूण 15000 बचत गटांना दोन पुरवले जातील.
  • ज्या महिला बचत गटामध्ये सामील आहे त्या गटातील योग्य सदस्य ज्याचं वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल अशा सदस्याची 15 दिवसांच्या ड्रोन प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल.
  • या ड्रोन पायलटच पाच दिवसाचे प्रशिक्षण असेल आणि शेतीच्या कामासाठी दहा दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती आहे शेतीच्या कामासाठी म्हणजे (खत ,कीटनाशके, फवारणी, इ.)
ड्रोन दीदी योजना

ड्रोन दीदी योजना फायदे आणि वैशिष्ट्ये

  •  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला स्वयंसहाय्यता समूह ड्रोन योजना सुरू केली.
  •  या योजनेच्या माध्यमातून 15000 महिलांना स्वयंसहाय्यता कंपन्या ड्रोन मिळतील.
  • या योजनेच्या आधारे महिलांना स्वतःचा व्यवसाय करायला मदत मिळेल आणि त्यांना वर्षाला कमीत कमी या व्यवसायातून एक लाख रुपये अतिरिक्त मिळू शकतील.
  •  या योजनेअंतर्गत 80 टक्के आणि आठ लाख रुपये केंद्र सरकार ड्रोन खरेदी करण्यासाठी महिलाला स्वयंसहायता समूहाला दिले जाणार आहे.
  • ड्रोन दीदी योजनेमध्ये महिलाला ड्रोन पायलेटलाही ही पंधरा दिवसाचे प्रशिक्षण दिले जाईल.
  •  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करायला मदत मिळेल.
  •  या योजनेअंतर्गत उर्वरित रक्कम 3 टक्के व्याज दराने घेतली जाईल.
  • ड्रोन दीदी योजनेअंतर्गत शेतकरी बचत गटांकडून भाड्याने ड्रोन घेऊ शकतात ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल आणि शेतामध्ये मजुर कमी लागेल.

दोन दीदी योजना पात्रता

  • ड्रोन दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा भारतातला नागरिक असणे अनिवार्य आहे.
  •  या योजनेअंतर्गत 15000 गटांना सरकारकडून ड्रोन दिले जाणार आहे.
  •  ड्रोन दीदी योजना ही फक्त महिलांसाठीच आहे.
  • या योजनेचा लाभ फक्त बचत गटातील महिलाच घेऊ शकतात
  • तसेच या योजनेअंतर्गत अर्जदार कृषी कार्याशी संबंधित असणे आवश्यक आहे अशीच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल.
  • ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिलाला ड्रोन चालवण्यासाठी 15 दिवसाचे प्रशिक्षण दिले जाईल.
  •   बचत गटामध्ये सामील असलेल्या महिलांपैकी एक सदस्य ज्याचं वय 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असेल अशाच महिलेला पंधरा दिवसाच्या प्रशिक्षणासाठी निवडले जाईल .
  • दोन दीदी योजना मध्ये सहभागी होण्यासाठी महिला बचत गटामध्ये असणे आवश्यक आहे आणि त्या महिलेचे वय 18 ते 37 वर्ष वयातील महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल

ड्रोन दीदी योजना आवश्यक लागणारे कागदपत्रे

* आधार कार्ड

* पॅन कार्ड

*  पासपोर्ट साईज फोटो

*  बँक पासबुक

* मोबाईल क्रमांक

* ई-मेल आयडी

* स्वयंसेवा संस्थेची ओळखपत्र

ड्रोन दीदी योजना अर्ज करण्याची पद्धत

    या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजना सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे या योजनेचा अर्ज तुम्ही सध्या करू शकत नाही. पण ज्या महिलाला स्वयं सहाय्यता समूह ड्रोन योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी काही दिवसांची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्जासाठी अधिकृत वेबसाईट ची माहिती सध्या उपलब्ध नाही. ज्यावेळी शासनाचे मान्यता मिळेल, अर्ज आणि ऑनलाइन पोर्टल सुरू होताच आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे अपडेट ठेवू.

निष्कर्ष

      आजच्या या लेखांमध्ये आपण प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली योजना पाहिली आहे ती योजना म्हणजे ड्रोन दीदी योजना आहे या योजनेचा लाभ बचत गटाशी संबंधित असलेला महिलांना घेता येऊ शकतो. या योजनेमार्फत आपण शेतीशी निगडित असलेले काम करू शकतो ते म्हणजे (खत कीटनाशके फवारणी इत्यादी) या ड्रोन च्या साह्याने करू शकतो. या योजनेचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे ज्यामुळे शेतामध्ये लागणारे मजूर कमी होणार आहे आणि कमी वेळेत जास्त काम होणार आहे आणि उत्पन्नात वाढ ही होईल. जर तुम्हाला कोणाला किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये बचत गटांमध्ये असलेल्या महिला त्यांना या ड्रोन योजनेविषयी माहिती सांगा जेणेकरून त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

विचारले जाणारे प्रश्न

  1. ड्रोन दीदी योजनेची घोषणा कधी करण्यात आली?
  •  दोन दिनी योजनेची सुरुवात नोव्हेंबर 2023 मध्ये घोषणा करण्यात आली.
  1. या योजनेचे लाभार्थी कोण आहेत?
  •  या योजनेचे लाभार्थी  स्वयंसहायता समूह गटातील  आणि शेतीशी निगडित असलेल्या महिला या योजनेसाठी लाभार्थी आहेत.
  1. या योजनेसाठी पात्र कोण असतील?
  • या योजनेस सहभागी होण्यासाठी भारतातल्या लाभार्थी असणे आवश्यक आहे आणि या योजनेमध्ये  पात्रता फक्त महिलाच असतील
  1. या योजनेअंतर्गत किती लाभ दिला जाऊ शकतो?
  • या योजनेअंतर्गत 80 टक्के आणि आठ लाख रुपये केंद्र सरकारकडून खरेदी करण्यासाठी महिला स्वयंसहायता समूहाला लाभ दिला जाणार आहे.  या योजनेअंतर्गत उर्वरित रक्कम 3 टक्के व्याज दराने घेतली जाईल.

5 thoughts on “बचत गटातील महिलांसाठी ड्रोन दिदी योजना”

  1. सर, मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत
    जय भवानी महिला स्वयंसहाय्यता समुह रांजणगाव देवी, ता. नेवासा, जि. अहमदनगर
    या बचत गटाची अध्यक्ष म्हणून काम करत आहे.
    तरी मला Dron प्रशिक्षण घ्यायचे आहे, मला ते कुठे आणि कधी मिळेल याची सविस्तर माहिती माझ्या मोबाईलवर पाठवा.
    माझा मोबाईल नंबर

    Reply

Leave a comment