Satbara durusti: सातबारावर चूक आहे अशी करा दुरुस्त.. ऑनलाईन पद्धतीने…

satbara durusti: शेती म्हटलं की आपल्या समोर दिसतो तो शेतकरी शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार कागदपत्र म्हणजे सातबारा. आपल्या सातबारा बद्दलची माहिती आपण बऱ्याच वेळा पाहिलेली आहे. सातबारा हे कागदपत्र कशासाठी वापरले जाते किंवा हे काय आहे? याची संपूर्ण माहिती माहित असेलच.

परंतु बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या सातबारावर खूप मोठ्या प्रमाणावर चुका देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागील काही वर्षांमध्ये या चुकांना एवढं महत्त्व दिल जात नव्हतं. प्रत्येक गोष्ट डिजिटल स्वरूपात उपलब्ध होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या सातबारावर चूक असेल तर ही चूक शेतकऱ्यांना महागात पडू शकते. मग सातबारावर असणारी ही चूक दुरुस्त कशी करायची ते दुरुस्त करता येते का याची संपूर्ण माहिती आजच्या लेकाच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करूया. सातबारा चूक दुरुस्ती.

Satbara durusti

शेतकऱ्याच्या सातबारावर कोणतीही चूक असेल ज्यामध्ये नावात चूक असू शकते, क्षेत्रामध्ये चूक असू शकते, पोट खराब क्षेत्र मध्ये चूक असू शकते, अन्य कोणतीही चूक आपल्या सातबारावर झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. झालेली चूक दुरुस्त कशी करता येते हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होतो? सातबारावर झालेली ही चूक आधी आपण ऑफलाईन पद्धतीने दुरुस्त करत होतो. परंतु आता शासनाच्या नवीन नियमानुसार सातबारावरील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ऑनलाइन पद्धतीने सातबारा वरील दुरुस्ती कशी करायची याची माहिती घेऊया.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
UPI Transaction Charges UPI Transaction Charges: UPI व्यवहार महागणार? खासगी बँकांनी सुरू केले शुल्क आकारणे, तुमच्या खिशावर परिणाम होणार का?

अशी करा ऑनलाइन सातबारा वरील चूक दुरुस्त Satbara durusti

शेतकऱ्यांच्या सातबारावरील झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी राज्य शासनाने ई हक्क प्रणाली लागू केलेली आहे. या ई हक्क प्रणालीच्या माध्यमातून आपण आपली सातबारा दुरुस्त करण्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी आपल्याला https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जावे लागेल. संकेतस्थळावर सर्वप्रथम आपल्याला आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. आपल्याला आपला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल. नोंदणी करण्यासाठी संपूर्ण नाव, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, पासवर्ड आणि मोबाईलवर येणारा ओटीपी इत्यादी माहिती भरून आपण आपली नोंदणी पूर्ण करू शकता. ई प्रणाली नोंदणी साठी येथे क्लिक करा.

नोंदणी केल्यानंतर लॉगिन या पर्यायाचा अवलंब करून आपण लॉगिन करू शकता. सातबारा या पर्यावरण क्लिक करून दुरुस्ती करावयाच्या बाबी भराव्या लागतील. आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा लागेल. अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्याला अर्जाची पोस्ट पावती मिळेल या पोस्ट पावती प्रिंट काढून आपल्याला पुढील प्रक्रिया तलाठी कार्यालयात करावी लागणार आहे.

तलाठी कार्यालयात करावयाची प्रक्रिया

Satbara durusti ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर मिळालेली प्रिंट तलाठी कार्यालयात जमा करावी लागते. तलाठी कार्यालयाकडून अर्जाची संपूर्ण तपासणी प्रक्रिया पूर्ण केली जाते. तपासणी प्रक्रिया पूर्ण करून ई हक्क प्रणाली पुढील कारवाईसाठी मंडळ अधिकारी यांच्या लॉगिन वर पाठवली जाते. मंडळ अधिकारी यांच्याकडून अर्ज आणि सादर केलेली कागदपत्रे यांची पडताळणी केली जाते. अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तहसीलदार यांच्या माध्यमातून चूक दुरुस्ती करण्याचे आदेश निर्गमित केले जातात. या आदेशानंतर चूक दुरुस्तीची प्रक्रिया सुरू केली जाते.

हे पण वाचा:
student st pass आता एसटी बस पास मिळणार थेट शाळेतच student st pass

सातबारा चूक दुरुस्ती प्रक्रिये दरम्यान संबंधित खातेदारांना तहसील कार्यालयाकडून नोटीस पाठवण्यात येते. ही नोटीस पाठवण्याचा उद्देश म्हणजे कोणत्याही चुकीच्या किंवा फसवणुकीच्या नोंदी मंजूर करण्यात येऊ नयेत किंवा ऑनलाईन अर्ज सादर केलेला लाभार्थी हा स्वतः त्या जमिनीचा मालक आहे? याची खात्री करून फसवणूक होणार नाही हा उद्देश आहे. यावर कोणाचा आक्षेप असेल तर तहसीलदार स्वतः याची तपासणी करतात आणि योग्य वाटणारी कारवाई करून सातबारा अपडेट करतात.

Satbara durusti

Satbara durusti जर जुन्या सातबारा वरील नोंदी मधील माहिती नवीन सातबारा वर घेताना चूक होऊन माहिती चुकीची प्रसिद्ध झाली असेल तर? महसूल कलम अधिनियम 155 अंतर्गत चूक दुरुस्ती अर्ज सादर करून झालेली चूक दुरुस्त करून दिली जाते.

सातबारा चुक दुरूस्त करण्याचे फायदे

शेतकऱ्यांच्या सातबारावर झालेल्या चुका वेळीच दुरुस्त करणे आवश्यक असते. अन्यथा भविष्यात विविध अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागू शकतो. यामध्ये प्रामुख्याने शेत जमिनीचा व्यवहार, बँकेकडून घेतले जाणारे कर्ज, पिक विमा योजना, नैसर्गिक आपत्ती पासून मिळणारे अनुदान यासारख्या अनेक बाबींना अडचणी निर्माण होतात. यामुळे शेतजमीन मालकांनी आपली सातबारा वारंवार तपासणी करून यामध्ये काही त्रुटी निर्माण झाली आहे का ?किंवा यामध्ये काही चूक आहे का? याची तपासणी करणे देखील आवश्यक असते. जर यामध्ये काही तफावत आढळत असेल तर तात्काळ अर्ज सादर करून दुरुस्ती प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:
apatya pramanpatra in marathi apatya pramanpatra in marathi अपत्य स्वयं घोषणा पत्र

सातबारा दुरूस्ती झाली सोपी

महाराष्ट्र राज्य सरकारने ई हक्क प्रणाली ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध केल्यामुळे शेतकऱ्यांच्या सातबारे वरील झालेल्या चुका दुरुस्त करणे अत्यंत सोयीचे झाले आहे. जुन्या पद्धतीमध्ये या प्रक्रियेला खूप विलंब लागत होता. आता नवीन ऑनलाईन पद्धती नुसार शेतकऱ्यांची सातबारा दुरुस्ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाते. ऑनलाइन प्रक्रियेमध्ये अर्ज सादर करताना कागदपत्रांचे सर्व पुरावे व्यवस्थित सादर करणे आवश्यक आहे. कागदपत्रामधील पुराव्यामध्ये स्पष्टता नमूद नसल्यास सादर केलेला अर्ज रिजेक्ट देखील केला जाऊ शकतो.

ऑफलाइन पद्धतीने देखील करता येते दुरुस्ती

बरेच शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे सोयीचे वाटत नाही किंवा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आणि प्रक्रियेचे ज्ञान नसल्यामुळे शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने देखील सातबारा चूक दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. आपल्या सातबारावर झालेली चूक अर्जामध्ये नमूद करून अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे तलाठी कार्यालयात किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे जमा करावे लागतात.

तलाठी कार्यालयाकडून किंवा मंडळाधिकारी यांच्याकडून आपल्या अर्जाची दखल घेऊन आपला अर्ज हक्क प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने सादर केला जातो. आपण ऑफलाइन पद्धतीने सादर केलेला अर्ज पुढे ऑनलाइन प्रक्रिया मध्ये समाविष्ट करून घेतला जातो. आपण ऑफलाईन सादर केलेला अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन अर्जाच्या प्रत्येक प्रमाणेच पुढील कार्यवाही पात्र ठरते.

हे पण वाचा:
ना हरकत प्रमाणपत्र नमुना pdf ना हरकत प्रमाणपत्र नमुना pdf

सातबारा चूक दुरुस्ती महत्त्व

सातबारा चूक दुरुस्ती करण्याची प्रक्रिया पूर्ण आपण समजून घेतली आहे. सातबारा दुरुस्ती करणे का आवश्यक आहे याची देखील माहिती आपण पाहिली आहे. मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांना पिक विमा अर्ज सादर करताना शेतकऱ्यांचे सातबारा वरील नाव आणि आधार कार्ड वरील नाव सारखे असणे आवश्यक आहे. जर शेतकऱ्याच्या सातबारा वरील नाव आणि आदर वरील नाव यामध्ये तफावत असेल तर शेतकऱ्याचा पिक विमा अर्ज पिक विमा कंपनीकडून रद्द केला जातो. यामुळे शेतकऱ्यांचे सातबारा वरील नाव आणि आधार वरील नाव सारखे असणे अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे.

पिक विमा योजनेसोबतच शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र यासाठी देखील आपल्या सातबारावरील नाव आणि आपल्या आधारवरील नाव सारखे असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार वरील नाव आणि सातबारे वरील नाव यांची टक्केवारी 90 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. जर नावामध्ये जास्त तपावर दिसून येत असेल तर अशा शेतकऱ्यांना शासकीय योजनेअंतर्गत लाभ देण्यास शासनाकडून अडचणी निर्माण केल्या जातात.

यावरील महत्त्वाच्या दोन मुद्द्यासोबतच शेतकऱ्यांना पीक कर्ज घ्यायचे असेल किंवा अन्य कोणते शेती कर्ज मिळवायचे असेल तरीदेखील शेतकऱ्याचे आधारवरील नाव आणि सातबारा वरील नाव सारखे असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर चूक झाल्याची पाहायला मिळते. यामध्ये पोट खराब क्षेत्र मोठ्या प्रमाणावर जोडण्यात येणे. जुन्या सातबारे वर जास्त क्षेत्र नोंद असून नवीन सातबारावर क्षेत्राची कमी नोंद होणे. या व अशा अनेक चुका शेतकऱ्यांच्या सातबारावर आपल्याला पाहायला मिळतात. आता शासनाच्या डिजिटल धोरणानुसार या चुका ग्राह्य धरल्या जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या सातबारेवर झालेल्या चुका लवकरात लवकर दुरुस्त करून घ्याव्यात.

हे पण वाचा:
Public Road Ownership Public Road Ownership :शिवरस्त्यावर मालकी हक्क मिळवणे शक्य आहे का? काय आहे नियम आणि कायदा? पहा सविस्तर

satbara durusti सातबारा चूक दुरुस्ती प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येते. आपल्याला सोपी वाटणाऱ्या पद्धतीनुसार आपण आपल्या सातबारावरील नावाची चूक दुरुस्त करून घेऊ शकता. यासंबंधी अधिक माहितीसाठी आपण आपल्या तलाठी कार्यालय किंवा मंडळ अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता.

हे पण वाचा:
Satbara Utara Satbara Utara : सातबाऱ्यावर ‘या’ शब्दाचा उल्लेख नसेल तर…तुमचा जमिनीवरील मालकी हक्क ठरू शकतो बेकायदेशीर

Leave a comment