एक शेतकरी एक डिपी योजना अर्ज प्रक्रिया

        महाराष्ट्र राज्य शासनातर्फे  योजना सुरू केली आहे ती म्हणजे एक शेतकरी एक डिपी योजना , शेतकरी बांधवांना अखंडित वीज पुरवठा या योजनेअंतर्गत  उपलब्ध केला जात आहे. शेतकरी एक जगाचा पोशिंदा आहे असं सगळे म्हणतात पण शेतकरी बांधवांना शेती करताना खूप अडचणी येतात. कठीण परिस्थितीतून त्यांना प्रत्येक गोष्टीला सामोरे जावे लागत आहे. मग त्याचबरोबर  नैसर्गिक संकटे समोर येतात त्यामुळे दुष्काळ असेल किंवा जास्त पाऊसही असेल शेतकऱ्याच्या समोर कितीही संकटे आले तरी शेतकरी तशीच शेती पिकवतोच संघर्ष करावाच लागतो. 

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

      पाण्याखालील शेतीला  खूप अडचणी येतात पहाना ग्रामीण भागामध्येच आपले शेतकरी बांधव  दारे धरण्यासाठी कधी दिवसाची तर कधी रात्रीची लाईट असते मग शेतकऱ्याला अर्ध्या रात्री दारे धरायला जावं लागतं कधी कधी सिंगल फेज कधी थ्री फेज तेही गेलं तर अर्ध्या रात्री परत यावं लागतं अशा मध्ये शेतकरी बांधव परेशान होतात. प्रत्येक गोष्टीमध्ये न मागे सरकता शेतकरी खूप संकटांना सामोरे जातो कारण तिथे त्यांना पुरेपूर वीज पुरवठा  नसतो म्हणून तर शेतकरी बांधवांना शेती करायला अवघड जाते आपल्या शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे वीज पुरवठा व्हावा म्हणून  महाराष्ट्र राज्य शासनातर्फे एक शेतकरी एक डिपी योजना राबवण्यात आली आहे. या योजनेमार्फत शेतकरी बांधवांना ट्रांसफार्मर म्हणजे एक डीपी हा उपलब्ध करून दिला जात आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो 2020 पासून ऊर्जा धोरण राबवले जात आहे. त्यापुढेही 2025 ते 26 पर्यंत राबवले जात आहे याच पार्श्वभूमीवर पाहिलं तर दरवर्षी विज जोडणी साठी पंधराशे कोटी रुपयाची तरतूद राज्य शासनातर्फे करण्यात आली आहे.

        एक शेतकरी एक डीपी योजनेमार्फत शेतकरी बांधवांना स्वहिस्सा  भरावा लागत आहे या योजनेमार्फत सर्वसामान्य प्रवर्गातील  महत्त्वाचं म्हणजे ओपन प्रवर्गातील शेतकरी बांधवांना डीपी मिळण्याकरिता फक्त 7000/ रुपये प्रति एचपी  रक्कम भरावी लागत आहे. त्याचबरोबर SC आणि ST कॅटेगरीमध्ये अनुसूचित जाती त्याचबरोबर  अनुसूचित जमाती  या प्रवर्गासाठी5000 रुपये रक्कम प्रति एचपी  इतकी भरावी लागत आहे. ही रक्कम  दोन हेक्टर पेक्षा कमी असलेल्या  अल्पभूधारक शेतकरी बांधवांसाठी लागू आहे. त्याचबरोबर  ज्याची जमीन पाच हेक्टर पेक्षा जास्त आहे त्या शेतकरी बांधवांना प्रति एचपी 11000 इतकी रक्कम भरावी लागत आहे. रक्कम आहे ती शेतकरी बांधवांनी  भरल्यानंतर स्वतंत्र डीपी साठी खास करून  ट्रांसफार्मर साठी लागणारा अतिरिक्त खर्च  तो महाराष्ट्र राज्य शासन भरत आहे.

एक शेतकरी एक डिपी योजना

योजनेचे नाव

एक शेतकरी एक डीपी योजना

राज्य

महाराष्ट्र

विभाग

महाराष्ट्र राज्य

अर्ज प्रक्रिया

 ऑफलाइन / ऑनलाइन   

अधिकृत संकेतस्थळ

https://www.mahadiscom.in/

लाभ

शेतकऱ्याला शेती साठी वीज पुरवठा उपलब्ध करणे.

लाभार्थी

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी

योजनेचा उद्देश

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.

      शेतकरी बांधवांना वाहिनींची लांबी  भरपूर वाढल्यामुळे ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा खूप होत आहे. त्याचबरोबर विद्युत पुरवठ्यामध्ये  सारखं सारखं बिघाड होणे अशा खूप अडचणी  संकटे उभा राहत आहेत त्याचबरोबर तांत्रिकवीज हानी होणे डीपी मध्ये बिघाड होणे जास्त प्रमाणामध्ये होणारी वाढ विद्युत अपघात  त्याचबरोबर आकडा टाकून वीज तसेच  वीज चोरी करणे या सर्व  शेतकरी बांधवांच्या अडचणींचे या योजनेमार्फत निवारण होत आहे. या योजनेसाठी  शेतकरी बांधव पात्र झालेले आहेत आपल्या शेतकरी बांधवांनी  योजनेमार्फत अर्ज दाखल केले आहेत. राज्यांमध्ये भरपूर ठिकाणी  योजनेचा सर्वे देखील झालेला आहे. या सर्व शेतकरी बांधवांना  पहिला निधी नव्हता  पण आता शासनाने 800 कोटी रुपये निधी   महावितरणाला केला आहे. एक शेतकरी एक डीपी योजना  या सर्व शेतकरी बांधवांना  या योजनेचा लाभ दिला जाईल.

एक शेतकरी एक डीपी योजनाउद्दिष्टे

           या योजनेचे मुख्य उद्दिष्ट प्रत्येक  शेतकरी बांधवांना स्वतंत्र वीज पुरवठा उपलब्ध करून देणे त्याचबरोबर शेतीसाठी अखंड वीज प्राप्त करून देणे हे आहे. लघुदाब वहिनीची लांबी  वाढल्यामुळे ग्राहकांना वीज पुरवठा कमी दाबाने होत आहे त्यामुळे वीज पुरवठ्यात सारखे बिघाड होऊन शेतकरी बांधवांना वीज पुरवठा खंडित होत आहे. तांत्रिक वीज आणि वाढणे, विद्युत अपघात इत्यादी.

एक शेतकरी एक डीपी योजना पात्रता व अटी

  1. या योजनेचा लाभ पुरुष आणि महिलांना दिला जाणार आहे.
  2. अर्जदार अपंग महिला असल्यास, या महिलांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडणे महत्त्वाचे आहे.
  3. महाराष्ट्राच्या राज्यबाहेरील शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  4. अर्जदार शेतकऱ्याकडे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असावी.5. फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांनाच एक शेतकरी एक डीपी योजना महाराष्ट्र राज्य ला जाणार आहे.
  5. या योजनेमार्फत लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना कसली वयाची अट नाही.
  6. या योजनेचा लाभ फक्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल / घरी प्रवर्गातील शेतकरी बांधव घेऊ शकतात.
  7. लाभार्थी शेतकरी बांधवांना प्रति hp 7000 रु. इतकी रक्कम महावितरणाला आता करावी लागेल.
  8. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांना 5000 रु इतकी रक्कम अदा करावी लागेल.
  9. अर्जदार विधवा महिला असल्यास महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्यू प्रमाणपत्र  जोडणी महत्वाचे आहे.

एक शेतकरी एक डीपी योजना साठी महत्त्वाचे कागदपत्र

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • 100 रुपये स्टॅम्प
  • जातीचा दाखला
  • जवळच्या शेतकऱ्याचे लाईट बिल
  • 8अ उतारा
  • 7/12 उतारा

अर्ज प्रक्रिया

या योजनेचा लाभ घेण्यासाठी  ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

  1. https://mahadiscom.in/ या पेजवर गेल्यानंतर  ग्राहक पोर्टल वर क्लिक करा.
  2. त्यावर नवीन कनेक्शन साठी अर्ज भराया पर्यावर क्लिक करा.
  3. त्यानंतर एग्रीकल्चर (agriculture) क्लिक करा.
  4. पुढे हॉर्स पावर म्हणजे एचपी निवडा. दिलेला बॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट करा.
  5. तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही तुमची पूर्णपणे व्यवस्थित माहिती भरा आणि सबमिट करा.
  6. त्याचबरोबर  मेल आयडी मोबाईल नंबर आणि कागदपत्रे  सबमिट करा 
  7.  शेवटी पैसे भरल्यानंतर पावती डाऊनलोड करा किंवा पावतीची प्रिंट काढा.
एक शेतकरी एक डिपी योजना

योजनेचे स्वरूप

    या योजनेमार्फत शेतकरी बांधवांना  स्वहिस्सा  भरावा लागतो, सर्वसामान्य प्रवर्गातील  म्हणजेच ओपन प्रवर्गातील  शेतकरी बांधवांना सात हजार  प्रति एचपी रुपये भरावे लागते. त्याचबरोबर एससी आणि एसटी  कॅटेगिरी म्हणजेच  अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी पाच प्रति एचपी  हजार रुपये भरावी लागते.

योजना चे निष्कर्ष

         5 एकर पेक्षा जास्त जमीन  असलेल्या शेतकरी बांधवांना 11000 रु द्यावे लागतील. तर उर्वरित रक्कम कंपनीला अनुदान म्हणून सरकार देईल. या योजनेमार्फत दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेल्या सामान्य वर्गाच्या  शेतकरी बांधवांना 3 HP कायमचा कनेक्शन मिळाल्यास त्यांना  प्रति HP 7  हजार रुपये दराने  असे 21000 रुपये भरावे लागणार आहे..

FAQ

            1. एक शेतकरी एक डिपी योजना कधीपासून सुरू झाली?

उत्तर :  14 एप्रिल  2024  पासून एक शेतकरी एक डीपी योजना सुरू झाली.

  1. एक शेतकरी एक ट्रांसफार्मर कोणत्या राज्यासाठी लागू आहे.?

उत्तर : महाराष्ट्र राज्यासाठी  एक शेतकरी एक डीपी योजना लागू आहे.

  1. अनुसूचित जाती जमातीतील प्रवर्गातील शेतकरी बांधवांना किती रक्कम भरावी लागेल?

उत्तर : 5000 रु रक्कम  अनुसूचित जातीतील जमातीतील शेतकरी बांधवांना अदा करावी लागेल.

  1. एक शेतकरी एक डीपी योजना काय आहे?

उत्तर : एक शेतकरी एक डीपी योजना  शेतकरी बांधवांसाठी  एक महत्वकांक्षा योजना असून योजनेमार्फत शेतकरी बांधवांना अखंडित उच्च दाब  विद्युत प्रवाह उपलब्ध करून दिला जातो. म्हणजेच एक शेतकरी एक डीपी योजना.

         चला तर मग शेतकरी बांधवानो  तुमच्यासाठी मराठी माहिती तंत्रज्ञान माझ्या शेतकरी मित्रांसाठी खूप महत्त्वाचा ठरला आहे. आम्ही मराठी माहिती तंत्रज्ञानावरून  आपल्या शेतकरी मित्रांसाठी नवनवीन योजनांची माहिती या लेखाद्वारे  शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचत आहोत. सर्व शेतकरी बांधव  मराठी माहिती तंत्रज्ञानामार्फत  वेगवेगळ्या योजनांचा अतिशय उत्कृष्टपणे लाभ घेत आहेत. अधिक माहितीसाठी https://marathitantradnyanmahiti.com/page/2/ या संकेतस्थळाला आवश्यक भेट द्या.

2 thoughts on “एक शेतकरी एक डिपी योजना अर्ज प्रक्रिया”

Leave a comment

Close Visit Batmya360