बचत गटातील महिलांसाठी ड्रोन दिदी योजना
ग्रामीण भागातील उद्योग क्षेत्रात अग्रगण्य वाढ करणारे बचत गट. ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी खूप मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसाय सुरू केलेल आहेत. अश्या सर्व महिला बचत गटांना सहकार्य करण्यासाठी शासनाकडून महिला बचत गट योजना राबवण्यात येतात. मागील काही वर्षापासून भारत देशात विविध उद्योजक तयार झालेले आहेत. अश्या नवीन व्यवसाय करणाऱ्या साठी सरकारकडून नेहमीच काही तरी नवीन योजना आणल्या जातात. ज्या मुले नव उद्योजकांना पाठिंबा मिळतो. ग्रामीण भागातील महिला बचत गटांना विविध योजना मार्फत लाभ दिला जातो . महिला बचत गट कर्ज योजना / विविध शासकीय संस्था / रमाई महिला सक्षमिकरण / आदिवासी विकास प्रकल्प या सारख्या प्रमुख योजनेद्वारे महिला बचत गट योजना राबवल्या जातात.
योजनेचे नाव . | महिला बचत गट योजना. |
योजनेचे उदिष्ट . | राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवणे. |
लाभार्थी . | बचत गटातील सर्व महिला. |
लाभ. | विविध व्यवसाय निर्मिती साठी कर्ज उपलब्ध करून सवलत देणे. |
कर्ज रकमेवरील व्याजदर. | वार्षिक ४ टक्के. |
महिला बचत गट योजना उद्देश
- महिलांचे दैनंदिन जीवन जीवन मान सुधरवणे.
- महिला बचत गट योजना महिलांना आर्थिक साक्षर बनवणे.
- महिला बचत गट योजना नवीन व्यवसाय कण्यासाठी सहकार्य करून महिलांना रोजगार निर्मिती करणे.
- महिलांना स्वतः च्या पायावर उभा करण्यास सहकार्य करणे.
- महिलांना लघु उद्योग कण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
- राज्यातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट करणे.
- राज्यातील बचत गटामधील महिलांना नवीन व्यवसाय सुरू करून स्वतच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे.
महिला बचत गट योजना फायदे.
- महिला बचत गट योजना बचत गटाच्या माध्यमातून गावातील महिलांची एकी निर्माण होते.
- गावातील महिलांना दैनंदिन बचत कण्यासाठी मदत होते.
- महिला बचत गट योजना गटाला बँकेकडून कमी व्याजदराणे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- बँकेकडून कर्ज घेऊन महिलांना नवीन व्यवसाय सुरू करण्यास मदत मिळते.
- शासनाकडून विविध उपक्रम राबवले जातात ज्या मध्ये बचत गटातील महिलांना प्राधान्य दिले जाते.
- नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना बचत गटामार्फत कमी व्याजदराणे कर्ज दिले जाते.
- बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा आत्मविश्वास वाढतो.
- बचत गटातील महिलांची सामाजिक व आर्थिक स्थिति सुधारण्यास मदत होते.
- महिलांना राष्ट्रीय कृत बँकेचे व्यवहार माहिती मिळते.
- असे अनेक फायदे आपणास महिला बचत गट योजना माध्यमातून मिळतात.
महिला बचत गट योजना नियम
- महिला बचत गट योजना सर्व नियम व अटी गटातील प्रत्येक सदस्याला मान्य असेल पाहिजे.
- महिला बचत गट योजना गट निर्माण करताना गटात कमीत कमी दहा व जास्तीत जास्त वीस महिला असणे आवश्यक आहे.
- गटातील सर्व महिलांच्या सहमतीने बचत गटाला एक अध्यक्ष नेमण्यात येतो.
- बचत गट स्थापन केल्या नंतर प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करण्यात येते.
- बचत गटातील जमा झालेली रक्कम गटातील ज्या महिलांना आवश्यक आहे त्यांना कर्ज स्वरूपात दिली जाते.
- प्रत्येक महिन्याला अध्यक्षाने नेमलेल्या जागेवर बैठकीसाठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
- बचत गटातील सदस्या शिवाय बाहेरील व्यक्तीला कर्ज देऊ नये.
- गटातील महिलेले पहिले कर्ज जमा केल्या शिवाय दुसरे कर्ज दिले जात नाही.
- बचत गटातील महिलांना सही किंवा अंगठा करता येणे आवश्यक आहे.
- बचत गटात सहभागी होण्यासाठी 18 वर्ष वय पूर्ण असावे.
महिला बचत गट तयार करण्याची प्रक्रिया
- सर्व प्रथम आपणास दहा किंवा दहा पेक्षा जास्त व्यक्तिना एकत्र करावे लागेल.
- सर्व सभासदांचे आधार कार्ड व फोटो जमा करावा लागेल.
- गटाच्या नियम व अटी ठरवाव्या लागतील.
- बचत गटात मासिक किंवा आपण ठरवलेली प्रमाणे रक्कम निश्चित करावी लागेल.
- सर्वांच्या मते गटाला काय नाव द्यायचे ते ठरवावे लागेल.
- बचत गटाची मीटिंग साठी जागा ठरवावी.
महिला बचत गट अंतर्गत कोणते व्यवसाय करता येतात.
- लोणच बनवणे .
- पापड बनवणे.
- सेनिटरी नॅपकिण बनवणे.
- किराणा दुकान.
- हॉटेल .
- विमा सेवा केंद्र.
- Csc केंद्र.
- रसवंती गृह.
- लॉड्री व्यवसाय.
- मोबाइल दुरुस्ती.
- पाळणा घर .
- सोन्याचे दागिने बनवणे.
- कपडे शिवणे.
- शेती उपयोगी वस्तु तयार करणे .
- शेळी – मेंढी पालन.
- मशरूम शेती .
- रेशीम उद्योग .
- कृषि प्रदर्शन उद्योग
- पशू खाद्य निर्मिती.
- गांडूळ खत प्रकल्प.
- रोपवाटिका .
- फूल शेती .
- कृषि सेवा केंद्र .
- फळ प्रक्रिया उद्योग.
- दुग्ध व्यवसाय.
- दुधापासून बनणारे पदार्थ बनवणे.
- बेकरी उद्योग .
- शेवया मशीन
- दाळ मिल.
- मसाले बनवणे.
- चटणी काढणी यंत्र.
- कुक्कुट पालन.
- मत्स्य पालन .
- मेणबत्ती तयार करणे.
- पेपर प्लेट बनवणे.
- अगरबत्ती बनवणे.
- लाकडी खेळणी बनवणे.
- झाडू बनवणे.
- मातीची भांडी बनवणे.
अश्या प्रकारचे अनेक छोटे मोठे व्यवसाय आपण बचत गटाच्या माध्यमातून उभा करू शकतात त्या साठी आपणास शासनाकडून प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य केले जाते.
सर मला शिलाई मशीन प्रशिक्षण घ्यायचे आहे, तरी मला सदरील प्रशिक्षण कुठे आणि कधी मिळेल याची सविस्तर माहिती देण्यात यावी अशी विनंती करीत आहे.
मला माझ्या मोबाईलवर what’s app च्या माध्यमातून माहिती पाठवा.
माझा मोबाईल नंबर **********
हा आहे.