महात्मा फुले जन आरोग्य योजना
महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे त्या योजनेचे नाव आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना ही योजना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याकरिता राबविण्यात येणार आहे. ही योजना 2 जुलै 2012 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना एक लाखापर्यंत वार्षिक आरोग्य विमा संरक्षण देते. या योजनेअंतर्गत कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाला मोफत दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचा उद्देश आहे या योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत प्रति वर्ष 1,50,000 रुपये वैद्यकीय सेवेसाठी विमा रक्कम या योजनेअंतर्गत दिली जाईल
महाराष्ट्र सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही जुलै 2012 मध्ये सुरू केली होती. त्यानंतर एक एप्रिल 2017 रोजी तीजे नामकरण महात्मा फुले जन आरोग्य योजना (MPJAY)असे करण्यात आले
महात्मा फुले जन आरोग्य योजना ही वंचित आणि असुरक्षित घटकांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आले या योजनेअंतर्गत समाजाच्या गंभीर परिस्थितीत हॉस्पिटलयझेशनची आवश्यकता असते .
योजनेचे नाव | महात्मा फुले जन आरोग्य योजना |
कोणामार्फत राबवली जाते | महराष्ट्र सरकार |
विभाग | महाराष्ट्र आरोग्य मंत्रालय |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन / ऑनलाइन |
योजनेची सुरुवात | 2 जुलै 2012 मध्ये |
लाभ | प्रति वर्ष 1,50,000 रुपये वैद्यकीय सेवेसाठी |
उद्देश | महाराष्ट्र राज्यातील गरीब नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे.
|
अधिकृत संकेतस्थळ |
महात्मा फुले जन आरोग्य योजना उद्देश
- महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि गरजू लाभार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे.
- या योजनेअंतर्गत आरोग्य सेवेतील खर्चामुळे होणारे आर्थिक बोध कमी करणे.
- महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सुविधांमध्ये प्रवेश वाढवणे
महात्मा फुले जन आरोग्य योजना लाभ
- महात्मा फुले जन आरोग्य योजनेमार्फत एक लाख वार्षिक आरोग्य विमा संरक्षण.
- या योजनेमार्फत उपचारांसाठी सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये विमा संरक्षण.
- महात्मा फुले जन आरोग्य योजनेमार्फत हॉस्पिटलमध्ये दाखल, औषधे, डायग्रोस्टीक चाचण्या आणि इतर आरोग्य सेवांसाठी विमा संरक्षण.
- 1,570 पेक्षा जास्त योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या आजारांसाठी विमा संरक्षण
महात्मा फुले जन आरोग्य योजना पात्रता
- महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- या योजनेचा लाभ ( बीपीएल) आणि गरीब दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याकडे पिवळे/ पांढरे/ केशरी/ राशन कार्ड आणि अन्नपूर्णा कार्ड असणारेच लाभार्थी या योजनेसाठी पात्रता असतील.
- औरंगाबाद ,अमरावती, बुलढाणा, अकोला, हिंगोली जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद ,नांदेड ,परभणी, वर्धा ,यवतमाळ, आणि वाशिम यासारख्या अनेक अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील
महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी नोंदणी
- या योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी लाभार्थी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र(PHC) किंवा सामुदायिक आरोग्य केंद्रावर (CHC )जाऊ शकतात.
- नोंदणीसाठी आवश्यक अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे जमा करा.
- या योजनेचा अर्ज स्वीकारल्यानंतर, योजना क्रमांक लाभार्थ्याला दिला जाईल.
महात्मा फुले जन आरोग्य योजना फायदे आणि वैशिष्ट्ये
- महाराष्ट्र राज्य सरकार आरोग्य विमा संरक्षण आणि प्रीमियमचे शुलक उचलते.
- या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब वर्ष 1,50,000 विम्याची रक्कम लाभार्थ्याला देण्यात येईल.
- या योजनेमध्ये निदान, शास्त्रक्रिया, औषधे आणि पाठपुरवठा सल् ल आणि उपचाराचा समावेश आहे.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला आधीपासून अस्तित्वात असलेले सर्व आजार पहिल्या दिवसापासून कव्हर केले जातात.
- महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सरकारी पॅनल मधील रुग्णालयाच्या व्यतिरिक्त, अनेक खाजगी रुग्णालयाचा समावेश आहे.
- महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये लाभार्थ्यांना 121 फॉलोअप प्रक्रियेस 996 वैद्यकीय शास्त्रक्रिया प्रक्रिया चा लाभ मिळेल.
या योजनेमध्ये 1,570 पेक्षा जास्त आजारांसाठी विमा संरक्षण आहे यामध्ये सामान्य आजार, शास्त्री क्रिया, तीव्र आजार आणि दीर्घकालीन आजाराचा समावेश आहे. थोडक्यात योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या आजारांची नावे खालील प्रमाणे आपण पाहू
- कर्करोग
- मधुमेह
- हृदयरोग
- मूत्रपिंड निकामी होणे
- तीव्र श्रसन संसर्ग
- उच्च रक्तदाब
- मेंदू पक्षाघात
- क्षयरोग
- अपघात
- मानसिक आजार
- कॅन्सर
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा वापर कसा करावा
- लाभार्थ्याला कोणत्याही योजना मान्यता प्राप्त हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकतात.
- हॉस्पिटलमध्ये जाण्या अगोदर, लाभार्थ्यांनी योजना क्रमांक हॉस्पिटल मधल्याला कळवावा.
- हॉस्पिटल वाल्याने उपचाराचा खर्च विमा कंपनीला पाठवला पाहिजे.
- विमा कंपनी हॉस्पिटल वाल्याला थेट खर्च भरेल.
महात्मा फुले जन आरोग्य योजना हॉस्पिटल लिस्ट
महाराष्ट्रातील सर्व जिल्हया मध्ये या योजनेचे हॉस्पिटल उपलब्ध आहेत. आपणास आपल्या जिल्ह्यातील हॉस्पिटल लिस्ट पाहायची असल्यास येथे क्लिक करा. mahatma jyotiba phule hospital list
योजनेअंतर्गत महत्त्वाचे मुद्दे
* ही योजना फक्त महाराष्ट्रातील
रहिवाशांसाठीच उपलब्ध आहे.
* या योजनेचा लाभार्थी हा गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातला सदस्य असणे आवश्यक आहे.
* या योजनेमध्ये 1,570 पेक्षा जास्त आजारांसाठी समाविष्ट विमा संरक्षण उपलब्ध आहे.
* या योजनेअंतर्गत लाभार्थी कोणत्याही योजना मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेऊ शकतो.
महात्मा फुले जन आरोग्य योजना आवश्यक लागणारे कागदपत्रे कागदपत्रे
* आधार कार्ड
* मतदान ओळखपत्र
* बँक पासबुक
* शाळा /महाविद्यालय ओळखपत्र
* स्वतंत्र सैनिक ओळखपत्र
* अपंगत्व प्रमाणपत्र
* पासपोर्ट आकाराचे फोटो
* आरजीजेएवाय/एमजेपी जेवायएचे आरोग्य कार्ड
* केंद्र सरकार किंवा राज्य सरकार जारी केलेले ज्येष्ठ नागरिक कार्ड.
* सैनिक मंडळ जारी केलेले संरक्षणात्मक सेवांतील निवृत्ती सैनिकाचे कार्ड
महात्मा फुले जन आरोग्य योजना अर्ज करण्याची पद्धत
महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे
या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराला जवळच्या जिल्हा/सामान्य /नेटवर्क/महिला रुग्णालयात आरोग्यमित्र यांना भेटू शकतात.
विचारले जाणारे प्रश्न
- महात्मा फुले जन आरोग्य योजना कधी सुरू करण्यात आली?
- महात्मा फुले जन आरोग्य योजना दोन जुलै 2012 मध्ये सुरू करण्यात आली.
- या योजनेअंतर्गत किती विमा रक्कम दिले जाणार आहे?
- या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 1,50,000 रुपये वैद्यकीय सेवेसाठी विमा रक्कम दिले जाणार आहे.
- महात्मा फुले जन आरोग्य योजना या अगोदर या योजनेचे नाव काय होत?
- या अगोदर या योजनेचे नाव राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना हे होते.
- या योजनेमध्ये किती आजारासाठी विमा संरक्षण आहे?
- 1,570 पेक्षा जास्त योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या आजारांसाठी विमा संरक्षण आहे.
1 thought on “राशन कार्ड धारकांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना”