फक्त लाडकी बहीण योजनाच नाहीतर या तीन आर्थिक योजनेमुळे पण होतो महिलांना फायदा, जाणून घ्या सविस्तर माहिती

लाडकी बहीण योजनाच नाही तर महिलांसाठी महत्वाच्या 4 योजना

  महत्वाच्या 4 योजना केंद्र सरकारने महिलांसाठी वेगवेगळे योजना राबवल्या आहेत. महिलांच्या हितासाठी व त्यांच्या भल्यासाठी या योजना राबवल्या या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करता येऊ शकतो, तर काही महिलांना आपला घर खर्च भागवू शकतात . काही परिवारामध्ये सर्व जिम्मेदारी ही महिलांवरच असते. महिलांसाठी महत्वाच्या 4 योजना  मग त्या महिलांना असा प्रश्न पडतो की आपल्या मुलाचे पालन – पोषण, शिक्षण, रोजच्या जीवनाचा दैनंदिन खर्च कसा भागवावा . अशा महिलांसाठी  फक्त माझी लाडकी बहीण योजनाच नाही तर , दुसऱ्या तीन आर्थिक योजनेमुळे पण महिलांना फायदा होतो, तर जाणून घेऊया या महिलांसाठी महत्वाच्या 4 योजना  कोणत्या. पात्रता काय आहे, योजनेच्या अटी व नियम आणि किती लाभ दिला जातो , पाहा सविस्तर माहिती.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

कोण - कोणत्या योजना आहेत जाणून घ्या

   केंद्र सरकारने महिलांसाठी वेगवेगळे योजना राबवलेल्या आहेत.महिलांसाठी महत्वाच्या 4 योजना  गेल्या वर्षी, अर्थसंकल्पात 2024 मध्ये, महिला गुंतवणूकदार आणि मुलींसाठी महिला सन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे, त्यानंतर 2015 मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ , सुकन्या समृद्धी योजना ही योजना विशेषता मुलींसाठी सुरू करण्यात आली होती. आणि आत्ता सध्या सुरू झालेले योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना , आणि लवकरच सुभद्रा या योजनेस सुरुवात होणार आहे. महिलांसाठी महत्वाच्या 4 योजना 

वरील दिलेल्या सर्व योजनेचे पात्रता, लाभ आणि फायदे पाहूया.

माझी लाडकी बहीण योजना

   माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र राज्यांमध्ये जुलै पासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच घेता येणार आहे. तर लाभ घेण्यासाठी महिलांचे वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असावे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत राज्यामध्ये 1 कोटी  40 लाखाहून जास्त अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत. आणि या योजनेला जुलै महिन्यापासून  सुरुवात झालेली आहे.

लाडकी बहीण योजनेचे पात्रता कोण असणार?

  •  या योजनेचाला फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांना घेता येणार आहे.
  • महिलांचे वय 21 ते 65 दरम्यान असावे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये पेक्षा कमी असावे.
  •  या योजनेसाठी इन्कम टॅक्स भरणारी महिला पात्र असणार नाही.
  •  कुटुंबातील व्यक्ती जर कुणी सरकारी नोकरी करत असेल तर त्या महिलेला लाभ घेता येणार नाही.
  •  तसेच सरकारी योजनेतून महिला मानधन घेणारी असल्यास, त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कोठे करायचा?

  • या योजनेचा अर्ज फक्त अंगणवाडी सेविकेच्या  माध्यमातूनच होणार आहे.
  • या अगोदर या योजनेसाठी हा अर्ज 11 प्राधिकृत व्यक्तींना परवानगी दिलेली होती. परंतु आता परवानगी नाही.
  • त्यासाठी या योजनेचा अर्ज अंगणवाडी सेविकांना कडेच करावे लागेल.

महिलांसाठी महत्वाच्या 4 योजना

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र  ही योजना एक केंद्र सरकारची छोटी बचत योजना आहे. या योजनेची सुरुवात 2023 या वर्षापासून झालेले आहेत. या योजनेचे उद्देश देशातील महिलांमध्ये बचत करण्याची सवय व्हावी यासाठी ही योजना राबविण्यात आलेली आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र अर्ज कसा करायचा

  •  या योजनेचा अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा अर्ज डाऊनलोड करावा लागेल.
  •  अर्जामध्ये दिलेली माहिती सर्व व्यवस्थित भरावी लागेल आणि आवश्यक लागणारी कागदपत्रे अर्जासोबत जोडून घ्या
  •  अर्ज, ठेवीची रक्कम आणि आवश्यक कागदपत्रे बँकेच्या एक्झिक्युटिव्हाकडे सबमिट करा.

 

योजनेचे पात्रता

  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाही देशातील असावी, वयाचे कुठलेही बंधन नाही.
  •  अल्पवयीन मुलीसाठी तिच्या वतीने तिच्या कायदेशीर पालकाकडून खाते उघडले जाऊ शकतात.
  •  या योजनेवर वार्षिक व्याजदर 7.5% इतका आहे.
  • व्याज त्रैमासिक चक्रवाढ आणि खात्यात जमा केली जाईल.
  •  व्याज खाते बंद केल्यावर/बंद करण्या अगोदर/पैसे काढण्याची वेळ दिली जाईल.

 

मॅच्युरिटी कधी होते

  • या योजनेतील ठेव, ठेवीच्या तारखेपासून दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर रक्कम काढता येते.

सुकन्या समृद्धी योजना

केंद्र सरकारने ही योजना मुलींच्या उज्वल भविष्यासाठी अमलात आणलेले आहे. या योजनेची सुरुवात 2015 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलीचे शिक्षण, आरोग्य तसेच मुलीचे लग्न यासाठी ही योजना खूप फायदेशीर ठरणार आहे. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या पालकांना विविध प्रकारात गुंतवणूक करता येते, ज्याचा लाभ मुलीच्या उज्वल भविष्यासाठी होऊ शकतो .

योजनेचे पात्रता

  •  या योजनेचा लाभ 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना घेता येईल.
  •  या योजनेसाठी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन हे खाते कायदेशीर पालकाद्वारे उघडले जाऊ शकते.
  • या योजनेच्या नियमांतर्गत ठेवीदार मुलीच्या नावावर फक्त एकच खाते उघडू शकतो आणि चालू शकतो.
  •  मुलीच्या कायदेशीर पालकांना फक्त दोन मुलीसाठी खाते उघडण्याची परवानगी दिलेली आहे.

फायदे

खातेदार हा एक आर्थिक वर्षात कमीत कमी 250 रुपये आणि कमाल1500 रुपये गुंतवू शकतात. कोणत्याही आर्थिक वर्षात कमीत कमी 250 रुपये जमा न केल्यास त्यांना पन्नास रुपये इतका दंड आकारण्यात आलेला आहे.

 खाते उघडल्यापासून 14 वर्षापर्यंत ठेवी (Deposit) ठेवता येतात. खाते ज्या तारखेपासून उघडले आहे त्या तारखेपासून 21 वर्षांनी मॅच्युअर होईल, पण खातेधारकांनी 21 वर्षे पूर्ण होण्याअगोदरच मुलीचा विवाह केला असेल, तर तिच्या लग्नानंतर हे खाते वापरता येणार नाहीत.

सुकन्या समृद्धी योजना अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

सुभद्रा योजना

   सुभद्रा ही योजना ओडिशा सरकारने मार्गदर्शक तत्वे जारी केली, ज्यामुळे ओडिशाच्या राज्यात महिलांसाठी सुभद्रा योजनेस मान्यता दिलेली आहे. आणि ही योजना लवकर सुरू होणार आहे.

  • परंतु भारतात सरकारने महिलांसाठी चार आर्थिक आणि गुंतवणूक योजना सुरू केलेल्या आहेत.
  • जे योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना दोन समान हप्त्यामध्ये प्रति वर्ष 10,000 रुपये मिळतील. तसेच पाच वर्षांमध्ये, प्रत्येक पात्र महिलांना एकूण 50,000 रुपये मिळतील.
  • ही दिली जाणारी मदत थेट लाभार्थ्याच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. आणि त्यांना सुभद्रा डेबिट कार्ड देखील मिळेल.
  • 21 ते 60 वयोगटातील सर्व पात्र महिलांना सुभद्रा योजनेचा लाभ मिळेल. आणि एका कुटुंबामध्ये दोन किंवा तीन पात्र महिला असल्यास त्यांना पण या योजनेचा लाभ मिळेल. तसेच विधवा निवृत्तीवेतन आणि सरकारकडून शिष्यवृत्ती मिळणाऱ्या महिला सर्व पात्र महिलांना ही मदत मिळेल असे उपमुख्यमंत्री  म्हणाले.

महिलांसाठी महत्वाच्या 4 योजना निष्कर्ष

   केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने राज्यांमध्ये महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत यांच्या  अंतर्गत आपण आर्थिक लाभ घेऊ शकतो. जेणेकरून हा आर्थिक लाभ घेऊन महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करता येऊ शकतो, किंवा ज्या कुटुंबाची सर्व जिम्मेदारी महिलांवर आहे त्या महिलांसाठी या योजनेचा खूप फायदा होणार आहे , तसेच या योजनेपासून मुलींना, किंवा त्यांच्या भविष्यासाठी पण भरपूर सुविधा उपलब्ध होणार आहे. आजच्या या लेखात आपण महिलांसाठी महत्वाच्या 4 योजना  या बद्दल सविस्तर माहिती घेतली आहे. 

Leave a comment