शेळी पालन योजना अनुदान योजना sheli palan anudan yojana

महाराष्ट्र शासनाने शेती व्यवसाय करण्यासाठी शेतकरी बांधवांना शेती जोडधंदा मधून आर्थिक मदत मिळाली  पाहिजे म्हणून मेंढी किंवा शेळी पालन हा व्यवसायासाठी जास्तीत जास्त 75 टक्के अनुदान  आपल्या शेतकरी बांधवांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेळी पालन योजना

 माझे सर्व शेतकरी बांधव राज्यात मेंढी पालन शेळी पालन पशुपालन यासारखे शेतीविषयक व्यवसाय शेतकरी मित्र करत आहेत. शेतीसाठी ओळखला जाणारा आपला भारत देश खूप छान प्रकारे प्रगती आपले शेतकरी बांधव करत आहेत. शेतीमधून मशागत करून कष्ट करून उत्पन्न मिळवतात वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेतात आणि छान प्रकारे उत्पन्न मिळवतात. शेती उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपला भारत देशाचा खूप मोठा वाटा आहे. शेळीपालन,  मेंढी पालन,  पशुपालन,  यासारखे व्यवसाय शेतकरी मित्र वाढवत आहेत.

      शेळीपालना सारखे व्यवसाय करणाऱ्यांना शेतकऱ्यांना शेळी पालन योजना अंतर्गत  75% पेक्षा जास्त प्रमाणामध्ये अनुदान मिळत आहे. माझ्या शेतकरी बांधवांना शेळीपालनाचा व्यवसाय  केल्याने चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत आहे. या व्यवसायामध्ये कमी खर्चामध्ये आपण जास्त उत्पादन मिळवता येते. शेळीपालन हा व्यवसाय प्रत्येक ग्रामीण भागामध्ये सर्व शेतकरी अतिशय आनंदाने करत आहेत. कमी वेळात आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्यामुळे आपल्या शेतकरी बांधव शेळीपालनाच्या व्यवसाय करण्यासाठी खूप भर देतात. सर्व युवा शेतकरी बांधव विविध जातीच्या शेळ्या मेंढ्या आणून वेळोवेळी चांगले उत्पादन काढून शेळीपालन व्यवसाय हा करत आहेत. त्यापासून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत. आपण शेती करून जसे गाय बैल म्हैस यांच्या शेणखताचा उपयोग करतो. शेतीसाठी तसेच आपण शेळी पालन व्यवसाय करून लेढी खताचा उत्पन्नासाठी चांगल्या प्रकारे उपयोग करत आहेत. लेंडी खत शेतीला वापरुन खूप छान त्यातून उत्पन्न मिळत आहे. अगदी कमी खर्चात कमी वेळात चांगले उत्पन्न निघत आहे. यामध्ये शेतीला देखील जास्त खर्च येत आहे. शेतकरी शेळीपालनाचा व्यवसाय करत आहेत तेच व्यावसायिक सांगत आहेत. प्रत्येक युवा शेतकऱ्या बांधवांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी जे बेरोजगारी युवक आहेत त्यांच्यासाठी व्यवसाय सुरू करून देण्याची संधी सरकारने शेळीपालन व्यवसायासाठी अनुदान स्वरूपात शेतकरी बांधवांना आर्थिक मदत करत आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

     आता आपले शेतकरी बांधव पैसे जरी नसले तरी मेंढी शेळी घेऊ शकतात  यांच्यामध्ये जे लाभार्थी आहेत त्यांना 75 टक्के अनुदान सरकार देत आहे. यामुळे बेरोजगार तरुण शेतकरी बांधव मेंढी पालन शेळी पालनाचा व्यवसाय करू पाहणाऱ्या शेतकरी बांधवांना अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. या योजनेचा लाभ प्रामुख्याने दारिद्र रेषेखालील अल्पभूधारक, व्यक्ती, एक दोन हेक्टर पर्यंत शेती असलेले शेतकरी बांधव बेरोजगार युवक याचबरोबर महिला बचत गटात असणाऱ्या महिलांना सुद्धा या योजनेचा खूप मोठा फायदा होत आहे. महिला बचत गटाच्या महिलांनी ग्रामीण भागात शेळीपालनाचे प्रशिक्षण देखील चांगल्या प्रकारे घेतलेले आहेत. शेळीपालनाच्या व्यवसायासाठी कसल्याच प्रकारचे उत्पन्नाची अट ठेवलेली नाही. या लेखात आपण शेळी पालन अनुदान साठी लागणारी सर्व प्रक्रिया कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया या विषयी सर्व माहिती आपण पाहणार आहोत.

मागेल त्याला शेततळे योजना 2024 – 2025

शेळी पालन योजना

महात्मा गांधी नरेगा योजना ग्राम पंचायत

योजनेचे नाव

शेळी पालन योजना

योजनेचे राज्य

महाराष्ट

लाभ

लाभ 10 लाख ते 50 लाख रुपये

उद्देश्य

पशुपालनासाठी प्रोत्साहन देणे

लाभार्थी

राज्यातील शेतकरी तसेच पशुपालक व अन्य नागरिक

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन

योजनेचा विभाग

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य.

अधिकृत संकेतस्थळ

https://ahd.maharashtra.gov.in/

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

शेळी पालन योजना स्वरूप

    योजनेमध्ये  अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील मिळणाऱ्या रकमेतील 50% हा वाटा राज्य सरकार भरत असते व 50 टक्के उरलेली रक्कम जो अर्ज करतो त्याला स्वतःला भरावी लागते. नाहीतर तसेच बँकेतून भांडवल उभारणी कर्ज पद्धतीने करून घ्यावी लागेल. अर्जदार हा अनुसूचित जाती जमाती मध्ये असेल तर त्याला भेटत असलेली रक्कम एकूण लाभार्थी रकमेच्या 75%  हा वाटा राज्य सरकारचा असेल उरलेला 25% वाटा हा अर्जदाराला स्वतःच्या रकमेतून किंवा बँकेतून लोन करून भरायचा आहे. त्यावर त्यांनी लक्षपूर्वक काळजीपूर्वक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बँकेचे लोन प्रकरण जरी मंजूर झाले तर बँक तुम्हाला जास्तीत जास्त वीस टक्के कर्ज देणार आहे.

गाय गोठा अनुदान महाराष्ट्र

शेळी पालन योजना वैशिष्ट

  • शेळी पालन योजना लाभ मिळवण्यासाठी आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो.
  • अर्ज करणाऱ्या प्रत्येक पात्र अर्जदारला लाभ देण्याचा सरकार चा हेतु आहे.
  • शेळी पालन शेड योजनेचा फायदा म्हणजे या योजनेमार्फत भेटले जाणारे अनुदान म्हणजे शेळीपालन शेड योजनेसाठी 100% अनुदान दिले जात आहे. जो काही खर्च आहे तो खर्च थेट शेळी पालन साठी दिला जातो या योजनेमार्फत शेतकरी बांधवांना 100% अनुदान भेटत आहे
  • या योनीचे लाभ राज्य सरकार प्रत्येक अर्जदाराला देण्याचा खूप मोठा प्रयत्न करत आहे.
  • आपल्या संबंधात असलेल्या अधिकारी लोकांनी सांगितले गेले आहे की या योजनेचा लाभ घेता वेळेस सगळ्या घटकातील लाभार्थ्यांना अनुदान मिळावे अशी भूमिका राज्य सरकार स्पष्ट करत आहे.
  • बेरोजगार तरुण युवकांना सुद्धा या योजनेचा लाभ प्रामुख्याने घेता येत आहे.
  • एखादी शेतकरी महिला कुटुंबातील प्रमुख असेल त्या महिलांना देखील या योजनेमध्ये प्राधान्य आहे.
  • अल्पभूधारक शेतकरी म्हणजे 1 किंवा 2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र नाव असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.
  • दारिद्र्यादेशी खालील व्यक्तीला सुद्धा या योजनेत प्राधान्य देण्यात येत आहे.
  • महिला बचत गटातील महिलांना सुद्धा या योजनेमार्फत प्रामुख्याने लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अगोदरच बचत गटात असताल तर तुम्ही सुद्धा या योजनेत तुरंत अर्ज करू शकता.

महाडीबीटी शेतकरी योजना अर्ज प्रक्रिया, लाभ , पात्रता.

शेळी पालन योजना उदिष्ट

  • शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीमध्ये सुधारणा होणे त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे मेंढी पालन शेळीपालन ह्या परंपरा चालू ठेवणे.  
  • राज्यातील शेळीपालनासाठी पशुपालनासाठी प्रोत्साहन करून स्वतःचा रोजगार उपलब्ध करून देणे मुख्य उद्देश आहे
  • महाराष्ट्र राज्यामध्ये दूध मास यांच्या उत्पादनात वाढ करणे.
  • शेती व्यवसायाला जोडधंदा देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे.
  • शेतकरी बांधवांना या योजनेमार्फत सक्षम बनवणे आणि आत्मनिर्भर करणे.  

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

शेळी पालन योजना लागणारी महत्त्वाची कागदपत्रे

  1. अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला
  2. अर्जदाराची पासबुक झेरॉक्स स्पष्टपणे
  3. अर्जदाराचे आधार कार्ड कंपल्सरी
  4. जमिनीचा7/12 व 8अ उतारा
  5. जातीचा दाखला पाहिजे असेल तर
  6. पशुपालन प्रशिक्षण घेतलेली प्रमाणपत्र
  7. पासपोर्ट साईज फोटो
  8. अर्जदाराचा रहिवासी प्रमाणपत्र
  9. अर्जदार अपंगत्व असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र

महिला बचत गट योजना

अर्ज प्रक्रिया

   आपल्या शेतकरी बांधवांना जर अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी सर्व लागणारी कागदपत्रे घेऊन आपल्या जवळील सी एस सी केंद्रावर जाऊन पूर्ण माहिती घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे फॉर्म भरायचा आहे.अर्ज करताना खाली दिलेली माहिती पूर्ण वाचून घ्या :

  • सुरुवातीला अर्ज दाखल करताना तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर व चालू असलेला ईमेल आयडी द्यावा.
  • पूर्णपणे अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत एक आपल्याकडे काढून ठेवावे
  • आपली कागदपत्रे अपलोड करण्यापूर्वी अगोदर तपासून घ्यावी.
  • अर्जामध्ये अचूक  अर्धवट माहिती लिहिल्यास तुमचा अर्ज रिजेक्ट केला जाऊ शकतो
  • फॉर्म भरताना आपली माहिती व्यवस्थित भरून घ्यावी.

नाबार्ड पशुधन लोन योजना मराठी

योजनेची पात्रता

  • लाभार्थी शेतकरी बांधवांकडे सगळ्या कागदपत्रांची पूर्तता असावी
  • लाभार्थी बेरोजगार शेतकरी असला पाहिजे
  • लाभार्थ्याचे शेतकरी उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असले पाहिजे
  • या योजनेसाठी लाभार्थी महाराष्ट्राचा नागरिक असावा

नमो शेतकरी योजना

निष्कर्ष

    आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्गाला नेहमीच प्रमाणे जोड जोड धंदा करणे खूप आवश्यक असते यामध्ये मेंढी पालन शेळी पालन पशुपालन चालू असलेल्या व्यवसायामुळेया शेतीसाठी सुद्धा भांडवल मिळत आहे.त्यामुळे तरुण पिढी सुद्धा व्यवसाय मध्ये उतरत आहे. वेगवेगळे व्यवसायापासून उत्पन्न काढणाऱ्या शेतकरी बांधवांना किंवा तरुण पिढींना तेवढेच महत्त्व देत असल्याचे दिसून येत आहे. आपले शेतकरी बांधव अगदी कमी खर्चात कमी वेळेमध्ये खूप जास्त उत्पन्न काढत आहेत शेळीपालन   या योजनेचा चांगला लाभ भेटत आहे म्हणून शेतकरी मी पण हा व्यवसाय करत आहेत हा व्यवसाय खूप फास्ट गती वाढत आहे.

     या योजनेमार्फत दहा शेळ्यांसाठी शेड बांधण्यासाठी 49 हजार 284 इतकी अनुदान दिले जाते. तर 20 शेळ्या साठी दुप्पट  अनुदान दिले जात आहे.  तर 30 शेळ्यांसाठी तिप्पट अनुदान दिले जात आहे. हा पूर्णपणे लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्याची वैयक्तिक स्वतःची जमीन लाभ मिळण्याचे निकषानुसार इतर महत्त्वाची असलेली कागदपत्रे लाभार्थी पात्र ठरतात या योजनेमध्ये भूमिहीन असलेल्या कुटुंबातील शेतकरी बांधवांना प्राधान्य देण्यात येत आहे.

    शेळी पालन योजना माध्यमातून अर्ज प्रक्रिया तसेच पात्रता या विषयी आपण सर्व माहिती घेतलेली आहे. आपले मित्र किंवा नातेवाईक यांना जर या योजनेचा लाभ घेयचा असेल तर त्यांच्या पर्यन्त ही माहिती शेयर करा. अर्ज करताना किंवा कागदपत्रा बद्दल काही शंका असल्यास आम्हाला संपर्क साधा आम्ही आपणास नक्कीच मदत करू.

मागेल त्याला विहीर योजना 2024

FAQ

Que : शेतकरी व्यतिरिक्त दुसरा कोणी फॉर्म भरू शकतो का?

Ans- शेळी पालन योजना ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांच्याकडे 7/12 आणि 8अ असणे आवश्यक आहे.

Que : शेळीपालन या योजनेमध्ये अनुदान किती मिळते?

Ans- महाराष्ट्र राज्य सरकारने योजनेसाठी अनुदान वाढून 75 टक्के पर्यंत नेलेले आहे.

Que: शेळी पालन योजना अंतर्गत महाराष्ट्र 2025 या योजने करण्याकरिता आपण कधी अर्ज करू शकतो?

Ans:- या योजनेचे अर्ज प्रत्येक वेळी चालूच असतात तुम्हाला मिळेल त्यावेळी तुम्ही अर्ज करू शकता.

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन योजना 2024

1 thought on “शेळी पालन योजना अनुदान योजना sheli palan anudan yojana”

Leave a comment