Ativruahti anudan update: अतिवृष्टी अनुदान 2024 मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना शेवटची संधी.

Ativruahti anudan update: राज्य शासनाने खरीप 2024 मध्ये अतिवृष्टी आणि पूर यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत वाटप करण्याची घोषणा केली होती. याची प्रक्रिया राबवण्यासाठी संबंधित विभागाला सूचना देखील देण्यात आलेल्या होत्या.

विभागाकडून पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या. या तयार करण्यात आलेल्या यादीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे या विशिष्ट क्रमांकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी आपली अनुदान केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले. केवायसी केली तर शेतकऱ्यांना हे अनुदान त्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Ativruahti anudan update ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंत आपल्या अनुदानाची केवायसी केल नाही त्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित केले जाणार नाही. अनुदान वाटपासाठी शासनाकडून 31 मार्च 2025 ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपले केवायसी केली नाही त्या शेतकऱ्यांनी 31 मार्च 2025 पूर्वी आपली केवायसी करून घेणे आवश्यक आहे. केवायसी नाही केल्यास आपल्याला अनुदानाचा लाभ वितरित केला जाणार नाही.

Ativruahti anudan update

हे वाचा: अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 6 कोटीं मदत

केवायसी कशी करावी Ativruahti anudan update

अनुदान मिळवण्यासाठी पात्र असणारे शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक आहे मग आता ही केवायसी नेमकी करायची कोठे हा प्रश्न देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला असेल. ज्या शेतकऱ्याने अनुदानाची केवायसी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा महाऑनलाईन सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपली अनुदान केवायसी पूर्ण करून घ्यावी.

अनुदान कधी होणार जमा.

Ativruahti anudan update ज्या शेतकऱ्यांनी याआधी केवायसी केली आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यात आलेली आहे. परंतु अद्याप पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही त्या शेतकऱ्यांचे रक्कम जमा करण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांनी केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाते. केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढील सात ते आठ दिवसांमध्ये अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर जमा केली जाते.

शेतकरी स्वतः मोबाईल वरून केवायसी करू शकतात का?

खरीप हंगाम 2024 मधील लाभ मिळवण्यासाठी केवायसी करणे बंधनकारक आहे हे आपण पाहिलेच आहे. मग ही केवायसी शेतकरी स्वतः आपल्या मोबाईल मधून करू शकतात का असा प्रश्न देखील बरेच शेतकऱ्यांनी निर्माण केला होता. अनुदान केवायसी करण्यासाठी आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र किंवा महाऑनलाईन चेतू सुविधा केंद्र याच ठिकाणी ही केवायसी पूर्ण करता येते. शेतकरी स्वतः आपल्या मोबाईलवरून आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकत नाहीत.

Ativruahti anudan update शेतकरी स्वतः केवायसी करू शकत नाहीत. यामुळे ज्या शेतकऱ्याने आतापर्यंत आपली केवायसी केली नसेल त्यांनी 31 मार्च 2025 पूर्वी आपल्याजवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा महाऑनलाईन सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी जाऊन आपली केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी.

Leave a comment

Close Visit Batmya360