Damini App
नमस्कार बांधवांनो आपण नेहमीच आपल्या आजूबाजूला वीज पडून घडलेल्या घटना पाहिल्या आहेत कधी मनुष्यहानी तर कधी पाळीव प्राणी अशा बातम्या आपण नेहमीच ऐकतो खरंच जर अशी हानी होण्याआधीच आपल्याला समजले तर किती छान होईल. अशीच माहिती मी आपणास या लेखातून देण्यात प्रयत्न करत आहे.
मान्सून सुरू झाला की जून व जुलै या महिन्यात वीज पडून जीवित हानी होत असते ही जीवित हानी टाळता यावी म्हणून केंद्र सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने एक ॲप विकसित केले आहे हे ॲप आपणास वीज पडण्याची पूर्व सूचना आपल्या मोबाईलवर देते ह्या ॲपमुळे नागरिकांचा वीज पडून होणाऱ्या हनींपासून संरक्षण करता येईल.
भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने हे ॲप तयार करून त्या ॲपला (Damini App) दामिनी असे नाव दिले आहे. हे दामिनी ॲप आपल्या भोवताली चाळीस किलमीटर पर्यंत च्या अंतरावर कोठे वीज पडू शकते याची माहिती आपणास देते.
सरासरी भारतात दरवर्षी 1500 ते 2000 नागरिकांचा मृत्यू वीज पडून झाल्याचे आढळते. या सर्व बाबी विचारात घेऊन केंद्र सरकारने Damini App विकसित केले आहे. हे ॲप शेतकऱ्यांना खूपच मदतीचे ठरणार आहे. हे Damini App आपल्या भोवताली चाळीस किलमीटर पर्यंत कोठे वीज पडू शकते याची माहिती आपणास 15 मिनिट अगोदरच देते. या मुळे होनाऱ्या हानिपासून आपले व आपल्या कुटुंबाचे व आपल्या पाळीव प्राण्याचे संरक्षण करणे आपणास सोयीस्कर झाले आहे. हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
Damini App डाऊनकरण्यासाठी येथे क्लीक करा ⇒ https://play.google.com/store/apps/details?⇒id=com.weather.live.forecast.amwidget
Damini App डाऊनलोड केल्यानंतर पहिल्यांदा आपणास भाषा निवडा असा पर्याय दिसेल आपण आपणास हवी असणारी भाषा निवडावी. त्या नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये GPS पर्याय चालू करण्यासाठी परवानगी मागेल.
त्या नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये GPS पर्याय चालू करण्यासाठी परवानगी मागेल.
नंतर आपली नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी करताना सर्वप्रथम आपले नाव, आपला मोबाईल नंबर, आपला पत्ता, आपला पिनकोड, आपला व्यवसाय अशी सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यावी. नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करा. त्या नंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल.
Damini App दामिनी ॲप संदर्भात शासनाने आपल्या स्तरावर सर्व अधिकारी कामगार शेतकरी इत्यादी लोकांना आवाहन करून याबद्दल माहिती देण्याचे काम चालू केले. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी सर्व व्यक्तींना याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या ॲप च्या माध्यमातून मिळणारी माहिती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
विज कशी तयार होऊन पडते
जमिनीलगत वाहणारी हवा गरम झाल्यावर हलकी होऊन वर जाऊ लागते. ती हवा वर जात असताना हळूहळू थंड होत जातो त्यामुळे हवेत असलेले बाष्प थंड होऊन त्याचे ढगात रूपांतर होते. नंतर ते ढग जास्त प्रमाणात थंड होतात व हिम कण तयार होतात. हिमकण तयार झाल्यानंतर त्याचे वजन जास्त होतं वजन जास्त झाल्यामुळे हिमकण खालच्या दिशेने येण्यास चालू होतात हे कण व खालून वर जाणारे बाष्प यांच्या मध्ये घर्षण होते या घर्षणामुळे खूप मोठ्या प्रमाणात वीज तयार होते आणि त्यातून जास्त प्रमाणात प्रकाश तयार होतो. आणि जमिनीच्या दिशेने वीज आकर्षित होते.
crop insurance – शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपया मध्ये पिक विमा
नाबार्ड पशुधन लोन योजना मराठी
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.