post matric scholarship : पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती. पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
आपण या योजनेमध्ये पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना विषयी माहिती पाहणार आहोत. ही योजना केंद्र सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकार महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी निरंतर प्रयत्नशील असते. राज्य सरकार नेहमी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी या राज्यामध्ये वेगवेगळ्या योजना राबवत असते.
post matric scholarship योजना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा अशा उद्देशाने राज्य सरकारने या योजनेची सुरुवात केलेली आहे. आपण आज या लेखांमध्ये भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
post matric scholarship : पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती. पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना या योजनेचा लाभ हा अनुसूचित जाती प्रवर्गातील मुला मुलींना उच्च शिक्षण घेणे, त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे असे या योजनेचे उद्देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा आदर्श घेऊन उच्च दर्जाचे शिक्षण घेणे असा उद्देश ठेवून अनुसूचित जाती (नवबौद्धासह) विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना सन 1959-60 पासून राबविण्यात येत आहे.
योजनेचे नाव | post matric scholarship पोस्ट -मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना |
राज्य | महाराष्ट्र |
उद्देश | शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे |
लाभ | या योजनेअंतर्गत शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क आणि देखभालभक्ता उपलब्ध करून देणे. |
लाभार्थी | अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना उद्दिष्टे
- या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे.
- विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
- शिक्षणाची गळती कमी करणे.
- गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना कुटुंबातील परिस्थितीवरील असल्यामुळे शिक्षण सोडण्याची वेळ येऊ नये.
- विद्यार्थ्यांच्या मनात उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करणे.
पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना वैशिष्ट्ये
- या योजनेची सुरुवात केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या एकत्रिकरणाने झालेले आहे.
- या योजनेअंतर्गत केंद्र सरकारचा हिस्सा 60 टक्के तर राज्य सरकारचा हिस्सा 40% आहे.
- भारत सरकार सरकार मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे.
- या योजनेअंतर्गत दिले जाणारे लाभाची रक्कम ही लाभार्थी व्यक्तीच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा करण्यात येत.
पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना लाभार्थी
- या योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती जमाती किंवा नवबौद्ध विद्यार्थी या योजनेची लाभार्थी राहतील.
पोस्ट - मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिला जाणार लाभ
post matric scholarship या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत म्हणजे (दहा महिने) देखभाल भत्ता दिला जातो.
डे स्कॉलर :(दरमहा रुपयांमध्ये)
गट | दरमहा रुपयांमध्ये |
गट 1 | 150/-रुपये |
गट 2 | 150/-रुपये |
गट 3 | 100/-रुपये |
गट 4 | 100/-रुपये |
होस्टेलर: (दरमहा रुपयांमध्ये)
गट | दरमहा रुपयांमध्ये |
गट 1 | 1200/-रुपये |
गट 2 | 820/-रुपये |
गट 3 | 570/-रुपये |
गट 4 | 380/- रुपये |
दिव्यांग (अपंगत्व प्रकार) असलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त भत्ता
अपंग तत्त्वाचे प्रकार: अंधत्व/कमी दृष्टी
गट | दरमहा रुपयांमध्ये |
गट 1 | 150/-रुपये |
गट 2 | 150/-रुपये |
गट 3 | 100/-रुपये |
गट 4 | 100/-रुपये |
अपंगतत्वाचा प्रकार: कुष्ठरोग निवारण झालेल्या सर्व गटांसाठी
गट | दरमहा रुपयांमध्ये |
गट 1 | 100/-रुपये वाहतूक भत्ता (वस्तीगृहा बाहेर राहणारे विद्यार्थी ) |
गट 2 | 100/-रुपये एस्कोर्ट भत्ता |
गट 3 | 100/-(वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता) |
गट 4 | 100/-रुपये (अतिरिक्त परीक्षण भत्ता) |
कर्णबधीर सर्व गटांसाठी
गट | दरमहा रुपयांमध्ये |
गट 1 | 100/-रुपये वाहतूक भत्ता (वस्तीगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी) |
गट 2 | 100/- रुपये वाहतूक भत्ता (वस्ती गृह बाहेर राहणारे विद्यार्थी) |
गट 3 | 100/- रुपये वाहतूक भत्ता (वस्तीगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी) |
गट 4 | 100/- रुपये वाहतूक भत्ता (वस्तीगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी) |
लोको मोटर अपंगत्व सर्व गटांसाठी
गट | दरमहा रुपयांमध्ये |
गट 1 | 100/- रुपये वाहतूक भत्ता (वस्तीगृह बाहेर राहणारे विद्यार्थी) |
गट 2 | 100/- रुपये वाहतूक भत्ता (वस्तीगृह बाहेर राहणारे विद्यार्थी) |
गट 3 | 100/- रुपये वाहतूक भत्ता (वस्तीगृह बाहेर राहणारे विद्यार्थी) |
गट 4 | 100/- रुपये वाहतूक भत्ता (वस्तीगृह बाहेर राहणारे विद्यार्थी) |
मानसिक दुर्बलता/मानसिक आजार सर्व गटांसाठी
गट | दरमहा रुपयांमध्ये |
गट 1 | 100/- रुपये वाहतूक भत्ता (वस्तीगृहा बाहेर राहणारे विद्यार्थी) |
गट 2 | 100/- रुपये एस्कॉर्ट भत्ता |
गट 3 | 100/-रुपये (वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता) |
गट 4 | 150/-रुपये (अतिरिक्त प्रशिक्षण भत्ता) |
ऑर्थोपेडिक अपंगतत्व सर्व घटकांसाठी
गट | दरमहा रुपयांमध्ये |
गट 1 | 100/- रुपये वाहतूक भत्ता (वस्तीगृहा बाहेर राहणारे विद्यार्थी) |
गट 2 | 100/- रुपये एस्कॉर्ट भत्ता |
गट 3 | 100/-रुपये (वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता) |
गट 4 | 150/-रुपये (अतिरिक्त प्रशिक्षण भत्ता) |
वरील दिलेला रखाना विद्यार्थ्यामार्फत संस्थांना दिले जाणारे देखभाल भत्ता विकिरिक्त सर्व अनिवार्य शुल्क/अनिवार्य देय शुल्क अर्थात वित्त पुरवठा (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क) इत्यादी या योजनेखाली समाविष्ट केले आहे. post matric scholarship : पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती. पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
post matric scholarship पोस्ट - मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्रता
- या योजनेसाठी पात्रता विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी असायला हवेत.
- विद्यार्थी शालांत परीक्षा किंवा इतर समक्ष मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावा.
post matric scholarship पोस्ट - मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा फायदा
- या योजनेअंतर्गत शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता याचा लाभ दिला जातो.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण होईल तसेच पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित होतील.
- विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिक्षणाचा मुख्य प्रवाहात जाण्याची संधी मिळेल
पोस्ट - मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेच्या अटी व शर्ती
- या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना दिला जाईल.
- या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्य बाहेरील विद्यार्थ्यांना दिला जाणार नाही .
- या योजनेसाठी फक्त अनुसूचित जाती जमाती विद्यार्थी पात्र राहतील.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता याचा लाभ दिला जाईल.
- या योजनेअंतर्गत अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000/-पेक्षा जास्त नसावे.
- महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा भारत सरकारच्या नियमानुसार समान नियम अनुज्ञेय राहतील
- या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र किंवा राज्य शासनाच्या एखाद्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत असल्यास त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- फक्त दोन व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ दिला जाईल.
- या योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे.
- जर अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी नोकरी करीत असल्यास त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
पोस्ट - मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना आवश्यक लागणारी कागदपत्रे
- विद्यार्थ्याचे आधार कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- उत्पन्न प्रमाणपत्र
- ई -मेल आयडी
- गत वर्षाच्या परीक्षेची गुणपत्रिका
- इयत्ता दहावी किंवा बारावी परीक्षेची गुणपत्रिका
- वडीलाचे मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- वस्तीगृह प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- शिक्षणातील खंड बाबतीचे आणि स्व:घोषणापत्र(आवश्यक असल्यास)
post matric scholarship अर्ज करण्याची पद्धत
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदार विद्यार्थ्यांना शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- होम पेजवर गेल्यावर नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारले सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यावी लागेल.
- सर्व माहिती भरून झाल्यावर Register वर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकाल.
1 thought on “post matric scholarship : पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना”