राष्ट्रीय फलोत्पादन अभियान
मागील काही वर्षापासून सरकार शेती व शेती पूरक व्यवसाय करणाऱ्या साठी खूप मोठ्या प्रमाणावर अर्थ सहाय्य करत आहे. शेतकऱ्यांना विविध योजनेच्या माध्यमातून मदत करून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवत आहे. आज आपण अशीच योजना जी तंत्रज्ञानाच्या आधारे शेती उत्पन्नात शेतकऱ्यांना अर्थीक सहाय्य करते ती म्हणजे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना.
प्रगत शील शेती साठी शेतकऱ्यांना सरकार कडून विविध घटकाला अनुदान प्रदान केले जाते. रोपवाटिका तयार करणे, हळद लागवड , स्ट्रॉबेरी लागवड , फलबाग लागवड ,कंपोस्ट युनिट , शेततळे, शीतगृह, शेडणेतट इत्यादि असे अनेक घटक या योजनेच्या माध्यमातून उभारणी करण्यात येत आहे.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकावर प्रक्रिया करून त्यांचे पीक अंतराष्ट्रीय बाजारात पाठवण्यास मदत मिळते. शेतकऱ्यांचा माल अंतराष्ट्रीय बाजारात पाठवल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे मूल्य जास्त मिळते व शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात आर्थिक फायदा होतो.
योजनेचे नाव | राष्ट्रीय फलोत्पादन अभियान |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | कृषि विभाग महाराष्ट्र राज्य |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत संकेतस्थळ | |
लाभ | 55 टक्के पर्यंत अनुदान |
लाभार्थी | महाराष्ट्रातील शेतकरी |
योजनेचा उद्देश | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. |
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान उद्देश
- विविध कृषी हवामानानुसार प्रादेशीक अनुकूलता व गरजा लक्षात आल्या त्या त्या प्रादेशीक फलोत्पादन क्षेत्राचा तंत्रज्ञान प्रसार, काढणी तंत्रज्ञान, प्रक्रिया व पवन सुविधा यांच्या माध्यमातून समूह पद्धतीने सर्वांगीण विकास करणे.
- शेतकय्रांचे दैनदीन आर्थीक राहणीमान उंचावणे व आहारविषयक पोषण वाढविणे.
- फलोत्पादन विषयी विविध योजनांमध्ये समन्वय साधुन एकता आणण्यास मदत करणे.
- पारंपारीक उत्पादन पद्धतीची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालुन तंत्रज्ञानाचा विकास, प्रचार व प्रसार करणे.
- बेरोजगार तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून,नवीन रोजगार उपलब्ध करण्यास मदत करणे .
- अभियान अखेरीस शेती फलोत्पादन क्षेत्राचे उत्पादन आजच्या उत्पन्ना पेक्षा दुप्पट प्रमाणात करण्याचा प्रयत्न करणे.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान वैशिष्ट
- राष्ट्रीय फलोत्पादन अभियान बाजार भाव नियंत्रीत ठेवण्यास मदत करते.
- प्रत्येक शेतकऱ्याला या योजने मध्ये सहभागी होता येते.
- शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकरी विविध प्रकल्प सुरू करू शकतात.
- अनुदान मिळण्यास विलंब होत नाही.
- मागणी केलेल्या घटकाला आपण पात्र असाल तर लवकरात लवकर मान्यता देण्यात येते.
- स्वायरोजगार उपलब्ध करूनa रोजगार वाढीस मदत मिळते.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत येणारे घटक व अनुदान
घटक | अनुदान (अर्थसहाय्य) |
लहान रोपवाटिका तयार करणे | प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के जास्तीत जास्त 7.50 लाख |
हळद लागवड | प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के जास्तीत जास्त 0.12 लाख |
स्ट्रॉबेरी लागवड | प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के जास्तीत जास्त 1.12 लाख |
आळीबी उत्पादन प्रकल्प | प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के जास्तीत जास्त 8 लाख(प्रती यूनिट) |
आळीबी बीज उत्पादन | प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के जास्तीत जास्त 6 लाख(प्रती यूनिट) |
कंपोस्ट मेकिंग युनिट | प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के जास्तीत जास्त 8 लाख(प्रती यूनिट) |
सामूहिक शेततळे | प्रकल्प खर्चाच्या 80 टक्के |
फलोत्पादन यांत्रिकीकरण | 1 लाख प्रती युनिट (अनुसूचित जाती जमाती महिला ) 0.75 लाख प्रती युनिट (सर्वसाधारण) |
पॉवर ट्रिलर 8 बीएचपी पेक्षा कमी | 0.50 लाख प्रती युनिट (अनुसूचित जाती जमाती महिला ) 0.40 लाख प्रती युनिट (सर्वसाधारण) |
पॉवर ट्रिलर 8 बीएचपी पेक्षा जास्त | 0.75 लाख प्रती युनिट (अनुसूचित जाती जमाती महिला ) 0.60 लाख प्रती युनिट (सर्वसाधारण) |
हरितगृह उभारणी | प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के |
शेडनेट गृह उभारणी | प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के |
हरितगृह उभारणी (फुले/ भाजीपाला) | प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के |
प्लॅस्टिक मलचीग | 16000 प्रती हेक्टर. |
कांदा चाळ | 50 टक्के जास्तीत जास्त 35000 |
मधुमक्षिका पालन | प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के जास्तीत जास्त 4 लाख |
शीतगृह | 35 टक्के |
एकात्मिक शीत साखळी | 35 टक्के |
रेफ्रीजरेटर व्हॅन | 35 टक्के |
फिरते विक्री केंद्र | 50 टक्के |
आवश्यक कागदपत्रे
- बंधपत्र प्रपत्र 2
- अर्ज
- आधार कार्ड
- 7/12
- 8 अ
- बँक पासबूक
- गटाचे प्रमाणपत्र (गटासाठी)
- मोबईल क्रमांक
- ईमेल आयडी
- जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती जमाती साठी)
अर्ज प्रक्रिया
ज्या शेतकऱ्यांना या योजनेतून अर्ज करायचा आहे त्या शेतकऱ्यांनि https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज दाखल करावा.
निष्कर्ष
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेअंतर्गत आपण कोणत्या घटकाचा लाभ घेऊ शकतो. त्यासाठी किती अनुदान आहे. आवश्यक कागदपत्रे. आणि अर्ज प्रक्रिया या विषयी सर्व माहिती आपण आजच्या या लेखात घेतलेली आहे. आपणास या योजनेविषयी काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कमेन्ट करून विचारू शकता. आम्ही आपली नक्कीच मदत करू.
या योजनेच्या माध्यमातून आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना नातेवाईकांना व मित्रांना या विषयी माहिती करून द्या त्यांना या योजनेमद्धे सहभागी होण्यासाठी ही माहिती त्यांच्या पर्यंत पोहचवा.
2 thoughts on “राष्ट्रीय फलोत्पादन अभियान”