देशातील बेरोजगारी दिवसेंन दिवस वाढत आहे. या वर पर्याय म्हणून सरकार विविध उपाय योजना आखत आहे. देशातील बेरोजगार तरुणांना नवीन व्यवसाय करण्यासाठी सरकार कडून विविध व्यवसाय कर्ज योजना निर्माण केल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून तरुण वर्गांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.
व्यवसाय कर्ज योजना विविध प्रकारच्या सवलती देते. आपण जर बँके कडे कर्ज घेण्यासाठी गेलो तर नवीन सुरू करणाऱ्या व्यवसायाला बँक कर्ज देत नाही किंवा टाळा टाळ केली जाते. या वर सरकार ने पर्याय म्हणून स्वत: दिलेल्या कर्जाची जबाबदारी घेतलेली आहे. सरकारच्या माध्यमातून नवीन तसेच जुन्या व्यवसायाला कर्ज देण्यासाठी योजना आखण्यात आलेल्या आहेत. आजच्या या लेखात आपण सरकारच्या व्यवसायासाठी असणाऱ्या विविध योजना या विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
व्यवसाय कर्ज योजना साठी केंद्र व राज्य सरकार यांच्या वेगवेगळ्या योजना अमलात आणलेल्या आहेत.
राज्य सरकार व्यवसाय कर्ज योजना
• अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
महाराष्ट्रातील तरुणांना व्यवसायासाठी बिन व्याजी कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून या योजनेची अमलबजावणी करण्यात आली. या योजनेची अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
• मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये आपणास उत्पादन प्रकल्पासाठी 50 लाख व सेवा आधारित प्रकल्पासाठी 10 लाख रुपये पर्यत कर्ज दिले जाते.
- या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शौक्षणिक पत्रात 10 वी आहे.
- या योजनेमध्ये 15% ते 35% पर्यन्त सरकार कडून सबसिडी मिळते.
- लाभार्थी गुंतवणूक 5% ते 10% आहे.
- योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी वयोमार्यादा 18 ते 45 आहे.
- अर्ज करण्यासाठी https://maha-cmegp.gov.in/homepage या संकेतस्थळावर जा.
अधिक माहिती साठी https://maha-cmegp.gov.in/homepage या संकेतस्थळावर जा.
• महाराष्ट्र राज्य औद्योजिक क्लस्टर विकास योजना (MSI CPD)
या योजनेच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकार कडून राबवण्यात येत आहे. ही योजना प्रमुख औद्योगिक दृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यात राबवण्यात येत आहेत. या योजनेमार्फत आत्ता पर्यन्त 5000 गटांना फायदा झालेला आहे. या योजनेअंतर्गत गटांना 70 ते 80 % अनुदान दिले जाते. अधिक माहिती साठी http://di.maharashtra.gov.in/_layouts/15/doistaticsite/English/investors_guide_msi_cdp.html या संकेतस्थळावर भेट द्या.
• उद्योगा साठी सामूहिक प्रोस्थाहण योजना.
या योजनेअंतर्गत औद्योगिक दृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यात उत्पादन करणाऱ्या व्यवसायाला अनुदान वितरित केले जाते. या मधून उद्योग पुरक अनुदान ,व्याजावर अनुदान , वीज वापर दरात अनुदान , मुद्रांक शुल्क अश्या घटकावर अनुदान वितरित केले जाते.
केंद्र सरकार व्यवसाय कर्ज योजना
• एमएसएमई कर्ज (MSME loan)
सुरू असलेल्या व्यवसायाला चालना आणि वाढ मिळण्यासाठी केंद्र सरकारने या योजनेची अमलबजावणी केली आहे. या योजनेमधून नवीन किंवा चालू असलेल्या व्यवसायाला वाढवण्यासाठी वर्किंग कॅपिटल स्वरूपात लोन दिले जाते. सरासरी व्यवसाय कर्ज घेण्यासाठी 10- 15 दिवस कालावधी लागतो. परंतु या योजनेच्या माध्यमातून 59 मिनिटात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. अधिक माहिती साठी https://www.psbloansin59minutes.com/msme-loan या संकेतस्थळावर भेट द्या.
• क्रेडिट ग्यारंटी फंड
सूक्ष्म लघु व्यवसायासाठी क्रेडिट ग्यारंटी फंड मार्फत 10 लाख रुपये पर्यन्त कर्ज उपलब्ध करून दिले जाते. हे कर्ज तारण मुक्त दिले जाते. ही कर्ज खेळते भांडवल स्वरूपात दिले जाते. अधिक माहिती साठी https://www.cgtmse.in/ या संकेतस्थळावर भेट द्या.
• प्रधान मंत्री मुद्रा योजना
केंद्र सरकार कडून नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुणांना प्रधान मंत्री मुद्रा योजने अंतर्गत 10 लाख रुपये पर्यन्त कर्ज दिले जाते. या योजने मध्ये 3 प्रकार आहेत
- शिशु मुद्रा योजना : या योजनेमधून पात्र व्यक्तीला 50000 रुपये पर्यन्त कर्ज दिले जाते. व्याजदर 1% ते 2% अश्या स्वरूपात आहे.
- किशोर मुद्रा योजना : या योजनेअंतर्गत 5 लाख रुपये पर्यन्त कर्ज दिले जाते. व्याजदर 8 % ते 12 % अश्या स्वरूपात आहे.
- तरुण मुद्रा योजना : या योजने अंतर्गत 10 लाख रुपये पर्यन्त कर्ज दिले जाते. व्याजदर 12% ते 20 % अश्या स्वरूपात आहे.
या विषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
• सिडबी कर्ज योजना (SIDBI LOAN SCHAME)
सिडबी ही सर्वात जुनी कर्ज देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत msme कर्ज वाटप केले जाते. या योजनेमार्फत 10 लाख रुपये ते 25 करोंड रुपये पर्यन्त व्यवसाय लोन दिले जाते. या योजनेमध्ये 9% ते 10.50% वार्षिक व्याजदर अकरण्यात येते. अधिक माहिती साठी https://www.sidbi.in/en/ या संकेतस्थळावर भेट द्या.
• पीएमईजीपी कर्ज योजना (PMEGP LOAN)
केंद्र सरकार कडून पीएमईजीपी कर्ज योजने मार्फत व्यवसाय कर्ज दिले जाते. या योजनेतून 35 % पर्यन्त सबसिडी दिली जाते. पीएमईजीपी लोन अंतर्गत 50 लाख रुपये पर्यन्त विना तारण कर्ज दिले जाते. या साठी आपणास पीएमईजीपी च्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल. अधिक माहिती साठी https://www.kviconline.gov.in/pmegpeportal/pmegphome/index.jsp या संकेतस्थळावर जाऊन माहिती घ्यावी व अर्ज करावा
सविस्तर माहिती साठी येथे क्लिक करा.
निष्कर्ष
व्यवसाय सुरू करायचा म्हणजे पहिलं प्रश्न असतो तो म्हणजे आर्थिक नियोजन. व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणास आवश्यक असणाऱ्या आर्थिक गरजे साठी आपण विविध माध्यम शोधत असतो. आपल्याला योग्य मार्ग दर्शन मिळाल्यास आपणास व्यवसाय करण्यासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येतो. आपणास आम्ही अश्या काही योजनांची माहिती दिलेले आहे. ज्या योजनेच्या माध्यमातून आपणास व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाऊ शकते.
आपण किंवा आपल्या जवळील मित्र/ नातेवाईक यांना जर या योजनेची आवश्यकता असली तर त्यांना ही माहिती नक्की पाठवा. आपणास जर या योजनेमध्ये अर्ज करण्यास किंवा योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क सध्या आम्ही आपणास नक्कीच मदत करू.
व्यवसाय कर्ज योजना नेहमी विचारले जाणारे प्रश्न
- पीमईजिपी कर्जा साठी कोण पात्र आहे?
- ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण आहे आणि जे भारतीय रहिवासी आहेत ते या योजनेसाठी पात्र आहेत.
- महिलांसाठी कोणत्या व्यवसाय कर्ज योजना आहेत ?
- महिलांसाठी महिला व्यवसाय उद्योग निधी योजना आहे.
- व्यवसाय कर्ज योजना सबसिडी मिळते का?
- PMEGP/ CMEGP अंतर्गत कर्जदाराला सबसिडी मिळते.
- सरकार कडून व्यवसाय कर्ज मिळू शकते का ?
- होय सरकारच्या विविध योजनेच्या माध्यमातून आपणास व्यवसाय कर्ज उपलब्ध होऊ शकते.
- सरकारी योजनेअंतर्गत किती कर्ज मिळू शकते?
- सरकारी योजनेअंतर्गत आपणास 50 लाख रुपये पर्यन्त कर्ज मिळू शकते.
5 thoughts on “नव उद्योग सुरू करण्यासाठी व्यवसाय कर्ज योजना: business-loan scheme”