नमस्कार शेतकरी बांधवांनो, केंद्र शासन व राज्य शासन आपला शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना घेऊन येत आहे. या योजनेचे प्रामाणिकपणे अंमलबजावणी राज्य शासन करत आहे. या पूर्ण योजनांचा विचार करता. मागेल त्याला शेततळे ही खूप महत्त्वपूर्ण योजना शेतकरी बांधवांसाठी फायद्याची ठरत आहे.मागेल त्याला शेततळे या योजनेमुळे ज्या जमिनीला पाणी नाही म्हणजे ती जमीन कोरडवाहू जास्त प्रमाणात असल्यामुळे ओलिताखाली येत आहेत.
Table of Contents
Toggleया योजनांचा फायदा तुम्ही स्वतः पण घेऊ शकता. नाहीतर तुम्ही सगळ्यांमध्ये पण म्हणजेच सामुदायिक स्वरूपात पण घेऊ शकता. या योजनाचा लाभ तुम्हाला सगळ्यांमध्ये घ्यायचा असेल, तर शंभर रुपयाचा बॉन्ड पेपर वर अर्ज करावा लागेल. या शेतकरी बांधवांमध्ये दारिद्र रेषेखालील शेतकरी बांधवांना सगळ्यात अगोदर योजनेचा लाभ घेता येणार आहे. जर त्या शेतकऱ्यांना आपले स्वतःचे प्रमाणपत्र घेणे महत्त्वाचे आहे.
जे कोणी लाभार्थी आहेत त्यांनी सगळ्यांनी अगोदर कोणत्याही शेततळ्याचा किंवा इतर योजना चा लाभ घेतलेला नसावा. जर घेतलेला असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. याचबरोबर त्यांची जमिनीची तांत्रिक दृष्ट्या बरोबर असली पाहिजे. गेल्या पाच वर्षांमध्ये 50 टक्के पेक्षा कमी घोषित झालेली पाहिजे. मागेल त्याला शेततळे ही योजना 9 फेब्रुवारी 2016 रोजी सुरू करण्यात आले आहे. मागेल त्याला शेततळे या योजने करिता जे शेतकरी बांधव पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना खोदकाम साठी राज्य सरकार शेतकरी बांधवांना अनुदान देत आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून जवळ जवळ 75 हजार रुपये अनुदान जाते. 75 हजार रुपये दिले जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी 1 लाख 50 हजार पर्यंत अनुदान मिळत आहे.
या योजनेमार्फत राज्य सरकारकडून अजून वाढीव करून वीस कोटी निधी मंजूर करण्यात आले आहेत. कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी बळीराजा आहे या योजनांमध्ये आर्थिक मदत बिकट परिस्थितीमध्ये मोठ्या सुधारणा होणार आहेत. मागेल त्याला शेततळे या योजनेमार्फत आपण अशी माहिती घेणार आहोत. चला तर मग शेतकरी बांधवांनो या योजनेची पूर्णपणे माहिती घेऊयात.
बांधवांनो आपल्याला पीक चांगले येण्यासाठी पिकाची माहिती घेण्यासाठी पिकांचे पोषण करण्यासाठी पिकांची वाढ करण्यासाठी आपल्याला पाण्याची खूप गरज असते पाणी जर नसेल तर आपण पीक वाढू शकत नाही नवीन जी काय गोष्ट करायचे आहे आपल्याला पिकांमध्ये वाढ करायची असेल आपण करू शकत नाही जर पाणी नसेल तर खूप अडचणी असतात पाणी नसल्यावर म्हणूनच शेतकरी बांधवांना आपल्याला पाण्याची खूप गरज आहे. त्यामध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांना जर शेत जमीन पिके घ्यायचे असतील तर पाण्याची खूप अडचण होते. अशा अडचणी आपल्यासमोर खूप येतात. राज्यातील काही टप्प्यांमध्ये शेत जमिनीवर विहीर सुद्धा नाही आहेत. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर मराठवाड्याची व विदर्भाची परिस्थिती वेगळीच दिसून येत आहे.
आपल्या शेतकरी बांधवांनो आपल्याला शेती करायची असेल तर आपल्याला शेतीसाठी खूप कष्ट घ्यावा लागतात त्याच ठिकाणी शेती करायची म्हटले तर. आपल्याला पाण्याची खूप गरज भासते. पण हे पाणी आताच्या काळामध्ये जास्त वापरण्यात येत आहे. म्हणजेच विहिरी मधून आणि बोर मधून. विहिरीला आणि बोरला पाणी लागत नाही. त्यावेळेस या योजनेतील या शेततळ्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो. शेतकऱ्यांना कोणतीही पाण्याची अडचण येणार नाही. शेती पिकाची जमीन असून सुद्धा जमिन ओलिताखाली येत आहे.यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना या योजनेमधील शेततळ्याचा खूप छान प्रकारे फायदा होणार आहे.
आपण जे काही शेत जमिनीतून उत्पन्न काढणार आहोत. आपले जी काही उत्पन्नाची वाढ होईल. उत्पन्नाची वाढ झाल्यामुळे शेतकरी बांधवांची परिस्थिती बिकट आणि हालकीची आहे. त्या परिस्थितीमध्ये खूप मोठी सुधारणा होईल. ज्या शेतकरी बांधवांवर कर्जाचा मोठा भार आहे. तो भार कमी होईल. आणि जे काही शेतकरी आत्महत्या करतात. कर्जाला बळी न पडता आत्महतेचा विचार न करता आपण शेततळ्याचा चांगला अशा प्रकारे फायदा होणार आहे. आत्महतेचे प्रकार खूप कमी होईल.
कोरडवाहू शेतीला पाणी जर असते तर. राज्यातील बऱ्याच जमिनी ओलिताखाली येतील. यामुळे राज्याच्या परिस्थितीमध्ये खूप सुधारणा होईल. जर महाराष्ट्र राज्याचा बऱ्याचपैकी विकास झाला तर देशाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होत जाईल. देशामध्ये आर्थिक विकासामध्ये बदल होईल. यास मुळे ही योजना मागेल त्याला शेततळे शेतकरी बांधवांना खूप फायद्याची ठरत आहे.या योजनेची पडताळणी करत असताना सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. यामुळे राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांना खूपच फायदा होणार आहे.
योजनेसाठी महत्त्वाची लागणारी कागदपत्रे
चला तर मग शेतकरी बांधवांनो मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तर तुम्हाला खालीलपैकी महत्त्वाची कागदपत्रे शासनाकडे जमा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- लाभार्थ्याला आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
- स्वतःच्या सहीने अर्जदाराने भरलेला अर्ज अत्यंत आवश्यक आहे.
- लाभार्थी हात जर आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असेल तर, कुटुंब वारसा दाखला आवश्यक आहे.
- लाभार्थ्याचा जातीचा दाखला
- लाभार्थ्याच्या 7/12 उतारा
- शेतकऱ्याकडे स्वतःचा 8 अ असणे आवश्यक आहे.
मागेल त्याला शेततळे या योजनेच्या अटी
- शेतकरी बांधवांनो शासनाने नेमून केलेले कृषी सेवक व कृषी सहाय्यक यांनी ही जागा राखीव किंवा शेततळ्यासाठी ठरवलेली असते तुम्हाला शेततळे बांधण्यासाठी बंधनकारक असते.
- या योजनेमार्फत तुम्हाला तुमचे काम पूर्ण होणे अगोदर शासन तुम्हाला कसल्याच प्रकारची रक्कम देणार नाही.
- बांधावर किंवा शेततळ्याच्या जमिनीवर ज्या ठिकाणाहून शेततळ्यात पाणी आणणार आहेत पाण्याच्या प्रवाच्या ठिकाणीकाही स्थानिक वनस्पतींची लागवड करणे महत्त्वाचे आहे.
- जे शेततळे नवीन तयार केले आहे शेततळ्याच्याच मालकाकडे स्वच्छतेची व दुरुस्तीची जबाबदारी दिली जाणार आहे.
- सातबारा उताऱ्यावर लाभार्थ्याने शेततळे नोंद घेणे बंधनकारक आहे.
- पाऊस काळ असताना तळ्यामध्ये गाळ येणार नाही किंवा तळ्यामध्ये गाळ साचून राहणार नाही याची पूर्णपणे सुविधा लाभार्थ्यालाच करावी लागणार आहे.
- ज्या आकारमानाने शेत तळे मंजूर करण्यात आले आहे. त्याचबरोबर बनवणे लाभार्थ्यास बंधनकारक आहे.
मागील त्याला शेततळे या योजनेचा अर्ज कसा करावा
आपल्या शेतकरी बांधवांनो राज्य सरकारच्या वतीने मान्यता येणाऱ्या योजनांचा पूर्णपणे लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला महाबीटी या पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. मागील त्याला शेततळे या योजनेचे जे लक्ष आहे. त्यापेक्षा अर्जदार जास्त प्रमाणात प्राप्त झाले तर. सरकार लॉटरी या पद्धतीने लाभार्थ्याची निवड करणार आहे. या योजनेमध्ये जो लाभार्थी निवडला जाईल त्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाईलवर एसएमएस( sms) आल्यावर त्यांना त्यांचे पत्र देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शासनाचे अधिकारी कर्मचारी तुमच्या शेततळ्याची अतिशय उत्कृष्टपणे पाहणी करणार आहेत. जे काही शासनाच्या वतीने अधिकारी कर्मचारी आलेले आहेत तेच तुम्हाला शासनाच्या वतीने जी काही अनुदान रक्कम असेल ती लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाणार आहे. शासनाकडून मागेल त्याला शेततळे या योजनेमार्फत शेततळे बांधण्यासाठी अजून रक्कम वाढवली जाऊ शकते.
तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही खालील वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरू शकता:
https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login:
ही योजना राज्यातील शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. ही योजना चालू झाल्यापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू चे प्रमाण कमी होत गेलेले आहे. ज्या भागांमध्ये पावसाचे प्रमाण सर्वात कमी आहे त्या भागांमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना या योजनेचा मोठा फायदा होत आहे.
त्याचबरोबर कोरडवाहू जमिनी बऱ्याचशा ओलिताखाली येत आहेत. हो जे काय शेतकरी उत्पन्न काढतात त्यांच्याही उत्पन्नात बरीचशी वाढ होत आहे. कोरडवाहू शेती असल्यामुळे तिथे शेतकरी शेततळे होऊ शकत नाही. या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा दिला जात आहे. ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधवांना या योजनेचा पूर्णपणे लाभ प्राप्त होत आहे.
प्लास्टिक अनुदान स्वरुप कशाप्रकारे मिळते
- 20×20×3मी 50% अनुदानानुसार 41219 रु मिळतील.
- 20×25×3मी 50% अनुदानानुसार 31599 रु मिळतील.
- 15×15×3मी 50% अनुदानानुसार 28276 रु मिळतील
मागेल त्याला शेततळे योजना अनुदान निष्कर्ष.
राज्यामध्ये कोणत्या ना कोणत्या टप्प्यामध्ये दुष्काळ पडतोच त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना पाण्याची कमतरता भासतेच ज्या टप्प्यामध्ये दुष्काळ पडतो त्या टप्प्यामधील शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी पुरेसे भेटत नाही त्यामुळे त्यांची पिकं जळून जातात.
शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकावर खूप मेहनत केलेले असते आणि पाणी उपलब्ध नसल्यामुळे पिकांचा अपघात होतो. त्यामुळे आपले शेतकरी बांधव आत्महत्येस बळी पडतात त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना राज्य सरकारने आपल्यासाठी राज्य सरकारच्या मार्फत शेततळ्याची उभारणी करण्यासाठी राज्य सरकारकडून आपल्याला 75000 अनुदान दिले जाते. या अनुदानातून आपल्या शेतकरी बांधव अतिशय उत्कृष्टपणेने आनंदाने व्यवस्थित रित्या पिकाला पाणी देऊ शकतात.
FAQ'S
1). मागील मागेल त्याला शेततळे या योजनेमार्फत शेतकरी बांधवांना शेततळे बांधण्यासाठी किती अनुदान मिळते?
उत्तर : शेततळे बांधण्यासाठी सरकारकडून शेतकरी बांधवांना 75 हजार इतके अनुदान दिले जाते.
2). शेततळ्याच्या 75 हजार अनुदान हे किती आकारमानासाठी दिले जाते?
उत्तर :34×34×3 या आकारमानासाठी
75000 इतके अनुदान दिले जाते.
3). मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आहे?
उत्तर : शेततळे अनुदानासाठी शेतकरी बांधव शासनाच्या वेबसाईट वरती ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4). शेततळ्यासाठी अनुदान अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या मालकीची जमीन दीड एकर असली पाहिजे.
5). शेतकरी बांधवांना किती टप्प्यात अनुदान रक्कम मिळू शकते?
उत्तर : दोन टप्प्यांमध्ये अनुदानाची संपूर्ण रक्कम शेतकरी बांधवांना मिळते.
चला तर शेतकरी बांधवांनो वेगवेगळ्या योजनांची माहिती राज्यातील चालू घडामोडी शासनाचे अनुदान प्रकल्प कृषी विषयी आलेले नवीन जीआर प्रत्येक हंगामातल्या पिकांविषयी माहिती योजनांविषयी माहिती आपण मराठी माहिती तंत्रज्ञान या विषयावर आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत आहोत. योजनांच्या अधिक माहितीसाठी या संकेतस्थळावर जाऊ शकता. https://marathitantradnyanmahiti.com/
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
3 thoughts on “मागेल त्याला शेततळे योजना 2024 – 2025”