आपण सरकारच्या नवनवीन योजना पाहत आहोत सरकार हे खूप साऱ्या नवीन नवीन योजना आखत आहे. काही योजना मुलींसाठी आहेत तर महिलांसाठी आहे ,वयोवृद्ध माणसांसाठी , शेतकऱ्यांसाठी आहे. तर आपण या लेखाद्वारे जी योजना पाहणार आहोत ती योजना शेतकऱ्यांसाठी आहे . शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी ही सरकारकडून योजना राबविण्यात येत आहे . सरकार हे शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करीत आहे .पंचायत समिती विहीर योजना ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अमलात आणलेली आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत होईल .व सरकारची एक आर्थिक मदत मिळेल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा ) मधून पंचायत समिती विहीर योजना राबविण्यात येत आहे.
पंचायत समिती विहीर योजना खोदण्यासाठी चार लाख रुपये शेतकऱ्यांना सरकार अनुदान देत आहे. हे अनुदान शेतकऱ्यापर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाद्वारे शेतकऱ्यांना दिले जाते. महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वक्षणानुसार राज्यात अजून 3,87,500 नवीन विहिरी खोदण्याची शक्य आहे. पंचायत समिती विहीर योजनेअंतर्गत लवकरात लवकर खोदून त्या ठिबक सिंचन लावून पाण्याचा योग्य वापर शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याचा या योजनेचा उद्देश आहे जेणेकरून शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळेल सरकारची एक आर्थिक मदत त्यांना होईल. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या पार्श्वभूमीवर दिनांक 28 ऑगस्ट 2020 चा शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन सिंचन विहिरीचे काम मंजूर करण्याचे निदर्शक देण्यात आले आहे. पंचायत समिती विहीर योजना अंतर्गत 4 लाख रुपये एवढे अनुदान दिले जाते . आपण या लेखामध्ये अर्ज कोठे करायचा ,पात्रता , आवश्यक लागणारे कागदपत्रे या सर्वांची माहिती या लेखाद्वारे पाहणार आहोत हा लेख संपूर्ण वाचावा
योजनेचे नाव | पंचायत समिती विहीर योजना |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | कृषि विभाग महाराष्ट्र राज्य |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन / ऑफलाइन |
अधिकृत संकेतस्थळ | https://nrega.nic.in/ |
लाभ | 4 लाख रुपये अनुदान |
लाभार्थी | महाराष्ट्रातील शेतकरी |
योजनेचा उद्देश | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. |
पंचायत समिती विहीर योजना उद्देश
- पंचायत समिती विहीर ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे आहे.
- या योजनेद्वारेशेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल.
- या योजनेद्वारे लवकरात लवकर विहीर खोदून त्या पाण्याचा एक चांगल्या प्रकारे उपयोग करून शेतकऱ्यांना मदत होईल.
- महाराष्ट्रातीलशेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
- या योजनेद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लखपती बनवणे हा शासनाचा उद्देश आहे.
- मनरेगा महात्मा गांधी रोजगार हमी योजना रोजगार देणारीच नसून विकासात भर घालणारी योजना आहे.
- कृषी क्षेत्रातील उत्पन्न वाढवून राज्यात कृषी क्षेत्र अहवाल ठेवणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
पंचायत समिती विहीर योजना वैशिष्ट्ये
- एका गावात कितीही शेतकरी विहिरी घेऊ शकतात
- लाभार्थी व्यक्तीकडे किमान 0.60 हेक्टर क्षेत्र सलग असावे
- प्रस्तावित विहिरीपासून पाच पोलच्या आत मध्ये विद्यु पुरवठा उपलब्ध असावा
- दोन विहिरी मधील 150 मीटर अंतर केले आहे
- जॉब कार्ड धारकांना लाभ दिला जाईल
- वीहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान प्रदान केले जाते
- दोन किंवा अधिक लाभार्थी मिळून सलग 0.60 हे क्षेत्रावर लाभ घेऊ शकतात
पंचायत समिती विहीर योजना पात्रता
- लाभार्थी जॉब कार्ड धारक असला पाहिजे
- लाभार्थी कडे कमीत कमी 0.60 हे (एक एकर) जमीन असावी
- पेजल स्त्रोत पासून 500 मीटर अंतरावर नवीन विहिरीची जागा असावी
- लाभार्थ्याचे 7/12 वर आधीच विहिरीची नोंद नसाव.
- लाभार्थी व्यक्तीचे नाव 7/12 व 8 अ सावा.
- संयुक्त विहिरीसाठी 0.60 हे एक एकर पेक्षा जास्त सलग क्षेत्र असावे
पंचायत समिती विहीर योजना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- 8 अ चा ऑनलाईन उतारा
- मनरेगा जॉब कार्डाची प्रत
- 7/12 ऑनलाइन उतारा
- सामुदायिक वीहीर घ्यायची असल्यास चाळीस गुंठे जमीन सलग असल्याचा पंचनामा समोर पचारान पाणी वापरण्याबाबत सर्वांच करार पत्र.
- जातीचा दाखला.
- लाभार्थ्याची एका वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र.
- सामुदायिक विहीर असल्यास लाभार्थ्यांनी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक जमीन सलग असल्याचा पंचनामा.
पंचायत समिती विहीर योजना अर्ज प्रक्रिया.
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
लाभार्थी व्यक्तीने ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन आवश्यक पत्रासह अर्ज घ्यावा. हा अर्ज ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यालयात देखील उपलब्ध असेल. अर्ज दिल्यानंतर अर्जाची पोच पावती घ्यावी. ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर किंवा ग्रामसेवक यांच्या मदतीने अर्जाची पडताळणी करावी करून मनरेगाच्या आवश्यक बाबी ऑनलाईन भरल्या जातील ही जबाबदारी ग्रामपंचायतची असेल.
ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत
पंचायत समिती विहीर योजनांमध्ये आपण 2024 साठी ऑनलाइन अर्ज महाराष्ट्र शासनाच्या अधिकृती मोबाईल ॲप द्वारे सहजपणे करता येतो.
त्यासाठी ,सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या play storeमध्ये जा.
त्यानंतर ,सर्च बॉक्स मध्ये ‘Maha -Egs Horticulture Well App‘ शोधा आणि तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्या.
App डाउनलोड झाल्यावर त्यामध्ये दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून अर्ज सबमिट करावा. अर्ज संबंधित अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळत राहतात.
पंचायत समिती विहीर योजनेसाठी निवड कशी केली जाते
राष्ट्रीय ग्रामीण योजना हमी योजना अंतर्गत पंचायत समिती विहीर योजना अमलात आणलेली आहे. सिंचन क्षेत्र वाढ व्हावे व शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न वाढावे. आणि शेतकऱ्यांना लखुपती बनाव हा सरकार च विचार आहे. या योजनेमध्ये निवड खालील प्रमाणे दाखवलेली आहे.
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- विमुक्त जाती
- दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
- अपंग असलेले कुटुंब प्रमुख
- जमीन सुधारण्याचे लाभार्थी
- इंदिरा आवास योजनेखाली लाभार्थी
- अल्पभूधारक शेतकरी ( 5 एकर जमीन असणारे लाभार्थी)
- 2.5 एकर पर्यंत जमीन असणारे लाभार्थी
विहीर कोठे खोदावी
- जिथे दोन नाल्याच्या मधील क्षेत्रात व नालायक नाल्याचे संगमाजवळ जिथे मातीचा किमान30से.मी. चा थर व किमान मीटर खोलीपर्यंत मऊ (झिजलेला खडक ) आढळतो तेथे वीहीर खोदावी.
- नदी व नाल्या जवळील उथळ गाळाच्या प्रदेशात
- उंच ठिकाणी जिथे नाल्याचा तीरावर आहे परंतु चोपण किंवा चिकन माती नसावी.
- नदी व नाल्यांचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदी पात्र नसतात
- वाळू गारगोटे थर दिसून येते तेथे विहीर खोदावी.
विहीर कोठे करू नये
- खडक खडक दिसण्याच्या जागेत विहीर खोदू नये
- डोंगराचा कडा आसपासचे 150 मीटरचे अंतर विहिर खोदली जाऊ नये.
- मातीचा थर 30 सेमी पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात विहिरी खोदू नये
- मुरमाची पोळी पाच मीटर पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात विहिरी खोदू नये
निष्कर्ष
पंचायत समिती विहीर योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दिली जाते. आपण या योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता, लाभार्थी ,अवश्य लागणारे, कागदपत्रे या सर्वांची माहिती दिलेली आहे. या योजनेचा लाभ घ्यावा.
विचारले जाणारे प्रश्न
1 पंचायत समिती विहीर योजना मध्ये अनुदान किती दिले जाते?
- पंचायत समिती विहीर योजना मध्ये अनुदान चार लाख रुपये दिले जाते.
2 पंचायत समिती विहीर योजना अर्ज करण्याची पद्धत कशी आहे?
- पंचायत समिती विहीर योजना मध्ये अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.
3 पंचायत समिती विहिरी योजनेचा काय उद्देश आहे?
- पंचायत समिती विहीर योजनेचा असा उद्देश आहे की सिंचन द्वारे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी सुविधा उपलब्ध करून देणे.
1 thought on “नवीन पंचायत समिती विहीर योजना 4 लाख अनुदान”