सुकन्या समृद्धि योजना

     बचत करणे ही सर्व कुटुंबासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. बचत केल्याने प्रत्येक व्यक्तीने ठरवलेले स्वप्न सत्यात उतरवण्यास मदत मिळते. केंद्र सरकार व राज्य सरकार मुलींच्या हितासाठी व कुटुंबाची बचत व्हावी म्हणून काही ना काही नवीन योजना अमलात आणण्याचा प्रयत्न करत असते आज आपण अशीच एक योजना ज्या योजनेचे नाव आहे सुकन्या समृद्धि योजना या योजेनेविषयी सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

    सुकन्या समृद्धि योजना केंद्र सरकार कडून 2015 मध्ये सुरू करण्यात आली. देशातील मुलींसाठी ही एक अत्यंत महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून कुटुंबातील मुलींसाठी शिक्षण, आरोग्य तसेच मुलींचे लग्न यासाठी या योजनेच्या माध्यमातून बचत करून मुलींच्या भवितव्यासाठी खूप फायदेशीर योजना आहे.

    सुकन्या समृद्धि योजना अंतर्गत पालकांना विविध प्रमाणात गुंतूनवणूक करता येते. या योजने मध्ये आपणास कमीत कमी  250 रुपये पासून गुंतवणूक करता येते. आपण गुंतवणूक केलेल्या रकमेवर 7.7  टक्के वार्षिक व्याज दिले जाते. या योजनेमध्ये चक्र वाढ व्याज देण्यात येते ज्या मुळे मुलींना जास्त प्रमाणात लाभ देण्यात येतो. आजच्या या लेखात आपण या योजने विषयी सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सुकन्या समृद्धि योजना

योजनेचे नाव

सुकन्या समृद्धि योजना

कोणी सुरू केली

केंद्र सरकार

लाभार्थी

देशातील 21 वर्षा खालील मुली

लाभ

आपल्या गुंतवणूक रकमेवर आधारित

योजना कधी सुरू करण्यात आली

2015 साली

योजनेचे उद्दिष्ट

देशातील मुलींचे भविष्य उज्ज्वल करणे

अर्ज प्रक्रिया

ऑफलाइन

अधिकृत संकेतस्थळ 

https://www.nsiindia.gov.in/

सुकन्या समृद्धि योजना उद्देश

  • मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • देशातील मुलींना आत्मनिर्भर बनवणे.
  • मुलींचे भविष्य सुरक्षित करणे.
  • मुलीनं समाजात सन्मानाने वावरता यावे.
  • देशातील मुलींचा सामाजिक तसेच आर्थिक सर्वांगीण विकास करणे.
  • मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोस्थाहण देणे.
  • मुलींना मुला समान सामाजिक वागणूक प्रदान करणे.
  • मुलींना भविष्यात स्वता च्या पायावर उभे करण्यास पाठिंबा देणे.

सुकन्या समृद्धी योजनेचे वैशिष्ट

  • मुलींच्या भविष्यातील आर्थिक संकटावर मात करण्यास मदत करणे.
  • अनाथ मुलीला दत्तक घेतल्यास सुद्धा या योजनेचा लाभ दिला जातो.
  • योजनेचा कालावधी मुलीचे वय वर्ष 21 पूर्ण होई पर्यन्त निर्धारित करण्यात आलेला आहे.
  • फक्त पहिले 15 वर्ष रक्कम जमा करावी लागते.
  • मुलीचा विवाह मुलीचे वय 21 वर्ष पूर्ण होण्या आधी करण्यात आला तर या योजनेचा लाभ मुलीला किंवा मुलींच्या पालकांना दिला जात नाही.
  • जमा केलेल्या रकमेवर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही.
  • मुलीचे वय 21 पूर्ण झाल्या नंतर जर रक्कम नाही काढली तरी त्या रकमेवर व्याज दिले जाते.
  • मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीला शिक्षणासाठी किंवा तिच्या आरोग्या साठी एकूण जमा रकमेच्या 50 टक्के रक्कम काढता येते.
  • या योजनेत कमीत कमी 250 रुपये भरण्याची मुभा देण्यात आलेली आहे.
  • ही योजना 100 टक्के सुरक्षित करण्यात आलेले आहे.
  • काही कारणास्तव मुलीचा मृत्यू झाला तर जमा केलेली रक्कम व्याजा सकट मुलीच्या कुटुंबाला देण्यात येते.

सुकन्या समृद्धि योजना फायदे

  • जमा केलेल्या रकमेवर चांगला व्याजदर दिला जातो.
  • कमीत कमी रकम जमा करण्यास सवलत देण्यात येते.
  • अत्यंत सुरक्षित योजना असल्याने लाभ मिळण्यास कोणताही धोका नाही.
  • योजनेतील रकमेची सरकार हमी घेते.
  • मुलीच्या शिक्षण आरोग्य तसेच लग्नासाठी अत्यंत महत्वाची बचत योजना आहे.
  • कुटुंबातील प्रत्येक मुलीला योजनेचा लाभ देण्यात येतो.
  • जमा केलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याज मिळते.
  • योजने अंतर्गत फक्त 15 वर्ष रक्कम भरावी लागते.
  • प्रती वर्ष 100 रुपये प्रमाणे पालकांचा विमा उतरवला जातो.
  • घरातील कामावत्या पुरुषाचा किंवा महिलेचा अपघात / मृत्यू झाल्यास कुटुंबातील वारसाला 30000 ते 75000 रुपये पर्यन्त आर्थिक मदत केली जाते.
download

सुकन्या समृद्धि योजना पात्रता

  • अर्जदार मुलगी मुळ भारतीय रहिवाशी असावी.
  • अर्जदार मुलीचे दुसरे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते नसावे.
  • कुटुंबातील फक्त मुलींनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल.
  • मुलांच्या नावाने या योजनेत बचत करता येणार नाही.
  • मुलीचे वय ही 21 वर्ष पेक्षा कमी असावे.

सुकन्या समृद्धि योजना आवश्यक कागदपत्रे.

  • मुलीचे जन्म प्रमाणपत्र
  • मुलीचे रहिवाशी प्रमाणपत्र
  • मुलीच्या पालकांचे आधार कार्ड
  • मुलीच्या पालकांचे पॅन कार्ड
  • राशन कार्ड
  • लाइट बिल
  • मुलीच्या पालकांचे मतदान कार्ड
  • सुकन्या समृद्धी योजना अर्ज
  • बँक किंवा पोस्ट ऑफिस ने मागणी केलेले इतर कागदपत्र

सुकन्या समृद्धी योजना अर्ज प्रक्रिया

  • तुम्हाला ज्या बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडायचे आहे त्या बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जा
  • त्या बँकेतून किंवा पोस्ट ऑफिस मधून सुकन्या समृद्धी योजना अर्ज घ्या.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • सुरवातीला जमा करणारी रक्कम पावती भरा किंवा धनादेश जोडा.
  • अर्ज बँक मध्ये जमा करा.
  • अर्ज दाखल केल्यानंतर बँक किंवा पोस्ट ऑफिस त्या वर प्रक्रिया करेल.
  • बँक किंवा पोस्ट ऑफिस ने प्रक्रिया केल्यानंतर आपणास पासबूक दिले जाईल.

सुकन्या समृद्धि योजना खाते बंद कधी करता येईल.

  • सुकन्या समृद्धी योजना उघडल्या पासून 5 वर्षानी खाते बंद करता येते.
  • लाभ घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास खाते बंद करता येईल.
  • लाभार्थी मुलीच्या पालकाचा मृत्यू झाल्यास खाते बंद करता येईल.
  • लाभार्थी व्यक्ति एकाद्या आजाराने त्रस्त झाल्यास त्याला खाते बंद करता येईल.

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत दिल जाणारा व्याजदर

    सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत जमा रकमेवर 7.7 टक्के व्याजदर देण्यात येतो. हा व्याजदर कमी जास्त प्रमाणात होत राहतो.

सुकन्या समृद्धि योजना अंतर्गत येणाऱ्या बँका

  • इंडियन पोस्ट पेमेंट बँक
  • इंडियन बँक
  • पंजाब अँड सिंध बँक
  • सिटीकेट बँक
  • युको बँक
  • यूनियन बँक ऑफ इंडिया
  • आंध्रा बँक
  • युनायटेड बँक ऑफ इंडिया
  • वीजया बँक
  • स्टेट बँक ऑफ इंडिया
  • एक्सीस बँक
  • बँक ऑफ बडोदा
  • बँक ऑफ इंडिया
  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • केनरा बँक
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  • देना बँक
  • आयसीआयसीआय बँक
  • आयडीबीआय बँक
  • एचडीएफसी बँक

      या व्यतिरेक आणखी बऱ्याच बँका च्या मध्यमातून आपण सुकन्या समृद्धी योजना चा लाभ घेऊ शकतात. लक्षात ठेवा आपण ज्या बँक मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडणार आहोत ती बँक राष्ट्रीय कृत बँक असणे आवश्यक आहे.

निष्कर्ष

   सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून मुलींच्या सर्वांगीण विकास करण्याचा सरकार ने निर्धार केलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार कडून या योजनेला प्रोस्थाहण दिले जात आहे. मुलींच्या उज्ज्वल  भविष्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून कुटुंबाला मुलीचे शिक्षण आरोग्य व लग्न या साठी बचत करता येणार आहे. ज्या बचती मुले मुलीचा सर्वांगीण विकास साधता येणार आहे.

   या योजनेमध्ये लाभ घेण्याची प्रक्रिया आपणास सांगितली आहे. आपल्या जवळील व्यक्ति नातेवाईक मित्र हे जर ह्या योजनेसाठी पात्र असतील तर त्यानं या योजनेबद्दल माहिती पाठवा. या योजनेबद्दल अर्ज करण्यास किंवा कागदपत्रा विषयी आपणास काही अडचण असेल तर आपण आम्हाला संपर्क करू शकतात. आम्ही आपणास नक्कीच मदत करू.

FAQ

  1. सुकन्या योजना किती वर्षा पर्यन्त आहे ?
  • या योजनची वय मर्यादा 21 वर्ष आहे.
  1. सुकन्या योजना काय आहे ?
  • ही एक मुलीच्या भविष्यासाठी बचत योजना आहे.
  1. सुकन्या समृद्धी योजना खाते कसे उघडावे?
  • आपल्या जवळील पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीय कृत बँक मध्ये जाऊन आपण या योजने अंतर्गत खाते उघडू शकतात.
  1. सुकन्या समृद्धी योजने मध्ये किती वर्ष रक्कम भरावी लागते?
  • सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते सुरू केल्या पासून 15 वर्ष रक्कम भरावी लागते.
  1. सुकन्या समृद्धि योजनामध्ये पालक बदलू शकतो का?

  • पालकाचा मृत्यू झाला असेल तर आपण पालक बदलू शकतो.

2 thoughts on “सुकन्या समृद्धि योजना”

Leave a comment