अण्णासाहेब पाटील कर्ज योजना : annasaheb patil loan scheme

  अण्णासाहेब पाटील कर्ज योजना : annasaheb patil loan scheme

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

   भारत देशाला तरुणांचा देश म्हणून ओळखण्यात येते. भारतातील एकूण लोकसंखेपैकी 55 टक्के लोकसंख्या ही वय वर्ष 25 च्या आत आहे. तरुणांचा देश आहे मणल्यावर तरुणांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी सरकार कडून विविध योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ नवीन व्यवसाय निर्मिती साठी तरुणांना बिनव्याजी कर्ज पुरवते. बरेच तरुण व्यवसाय करण्यासाठी पात्र असतात परंतु आर्थिक परिस्थिति नसल्यामुळे ते व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. अश्या तरुणांना मदत मिळावी म्हणून अण्णासाहेब पाटील बिनव्याजी कर्ज योजना अमलात आणण्यात आली.

    annasaheb patil mahamandal loan scheme details अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मध्ये नवीन व्यवसाय किंवा चालू असलेल्या व्यवसायाला  10 लाख ते 50 लाख रुपये पर्यन्त बिनव्याजी कर्ज दिले जाते. आज आपण या बिनव्याजी कर्ज योजने विषयी सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण व्हावा व उद्योग क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करता यावे या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली. या लेखात आपण या योजनेच्या नियम अटी , पात्रता , आवश्यक कागदपत्रे या विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

महत्वाची माहिती 

   अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ही फक्त मराठा व कुणबी मराठा समाजासाठी नसून या मध्ये सर्व जातीचे लोक अर्ज करू शकतात. यात फक्त एक अट आहे आपण ज्या ज्या प्रवर्गातून अर्ज करत आहात त्या प्रवर्गासाठी सरकार कडून महामंडळ स्थापन केलेले नसावे. जर त्या प्रवर्गासाठी एखादे महामंडळ स्थापन केलेले असेल तर आपणास अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत अर्ज करता येणार नाही. 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

योजनेचे नाव

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना : annasaheb patil loan scheme

 योजनेचा विभाग

कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभाग महाराष्ट्र.

योजनेचे राज्य

महाराष्ट्र.

योजनेतील लाभार्थी

महाराष्ट्रातील नागरिक. 

योजनेचा लाभ

50 लाख रुपये पर्यन्त बिनव्याजी कर्ज.

योजनेचा उद्देश

नवीन व्यवसाय सुरू करण्यास सहकार्य करणे.

योजना अर्ज पद्धती

ऑनलाइन पद्धत

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना थोडक्यात माहिती

   अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ही एक महाराष्ट्र राज्य शासनाने मराठा व कुणबी मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज परत देण्यासाठी निर्माण केलेली योजना आहे. या योजनेंचा लाभ देण्यासाठी सरकार कडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आहे. annasaheb patil mahamandal loan scheme details

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना : annasaheb patil loan scheme

 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा मार्फत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात. अर्ज केल्यानंतर अर्जात भरलेली सर्व माहिती व कागदपत्रांची तपासणी केली जाते. सर्व बाबी बरोबर असतील  तर आपणास LOI LETTER मंजूरी पत्र दिले जाते. ही मंजूरी पत्राच्या आधारे आपणास बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. 

बँकेकडून कर्ज   घेतल्यानंतर अर्जदाराला बँकेकडून sanction letter घेऊन ते sanction letter अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ऑनलाइन पद्धतीने सादर करावे लागते. 

      बँक ने दिलेले sanction letter अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कडून तपासले जाते. ती सर्व माहिती बरोबर असल्यास आपणास पुढील प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली जाते. 

      आपले बँक कर्जाचे हप्ते नियमित भरल्या नंतर आपले प्रत्येक महिन्याचे बँक स्टेटमेंट अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कडे सादर करावे लागते. आपल्या नियमित कर्ज हप्ते भरत असलेले स्टेटमेंट सादर केल्या नंतर आपले स्टेटमेंट तपासले जाते. आपले स्टेटमेंट बरोबर असल्यास आपणास आपण भरलेल्या हप्त्या वरील व्याजची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा केली जाते. 

      वरील प्रक्रिया नुसार अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ अर्जदाराला लाभ देते. या मध्ये लागणारे कागदपत्रे तसेच अर्ज कसा करावा व याच्या नियम व अटी बद्दल ची सर्व माहिती आपणास खाली दिलेली आहे . annasaheb patil mahamandal loan scheme details

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना उद्देश

  • महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय उभा करण्यास मदत करणे.
  • रोजगार निर्मिती करणे.
  • आर्थिक परिस्थिति नसणाऱ्या तरुणांना बँके मार्फत कर्ज देऊन त्यावरील व्याज महामंडळ भरते.
  • महाराष्ट्रातील तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करणे.
  • सर्व सामान्य कुटुंबाचे जीवनमान सुधारवणे व सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुणांना व्याजातुण सूट देणे.
  • राज्यातील बेरोजगारी संपुष्टात आणणे.
  • नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजने अंतर्गत सहज कर्ज उपलब्ध करून देणे.
  • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या मराठा  व कुणबी मराठा समाजातील तरुणांना व्यवसाय क्षेत्रात सक्षम बनवणे. 
  • राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधि उपलब्ध करून त्यांना आत्मनिर्भर व स्वयं रोजगार कौशल्य प्रदान करणे. 
  • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या मराठा  तसेच कुणबी मराठा समाजातील तरुणांना तसेच त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक व सामाजिक विकास घडवून आणणे. 

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत दिले जाणारे कर्ज व प्रकार

व्ययक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I)

अर्जदार लाभार्थी पात्रता: 

  1. अर्जदार लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवाशी असणे आवश्यक आहे. 
  2. अर्जदार उमेदवाराचे वय पुरुषासाठी जास्तीत जास्त 50 वर्ष आणि महिलांसाठी जास्तीत जास्त 55 वर्ष. 
  3. वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये च्या आत असावे. 
  4. या आधी अर्जदार व्यक्तीने अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ अंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 
  5. एक व्यक्ति फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेऊ शकतो. 
  6. अर्जदार अपंग किंवा दिव्यांग असल्यास त्या बाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-Il)

अर्जदार लाभार्थी पात्रता: 

  1. अर्जदार व्यक्ति महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी राहिवाशी असणे आवश्यक आहे. 
  2. गटाची अधिकृत नोंदणी असणे आवश्यक आहे. 
  3. गटातील सर्व सदस्य याची सहमति असणे आवश्यक आहे. 
  4. अर्जदार व्यक्तीचे बँक खाते त्याचा आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे. 
  5. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये च्या आत असणे आवश्यक आहे. 
  6. अर्जदार व्यक्तिचे वय पुरुषा साठी जास्तीत जास्त 50 तर महिला अर्जदारांसाठी जास्तीत जास्त वय 55 वर्ष असणे आवश्यक आहे. 
  7. ज्या गटासाठी कर्ज घेत आहेत तो गट कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा. 
  8. या आधी गटाने किंवा गटातील सदस्याने अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लाभ घेतलेला नसावा. 
  9. दिव्यांग तथा अपंग अर्जदार असल्यास त्या संबंधी प्रमापत्र असणे आवश्यक आहे. 

गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना (GL-l)

अर्जदार लाभार्थी पात्रता: 

  1. अर्जदार व्यक्ति महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी राहिवाशी असणे आवश्यक आहे. 
  2. गटाची अधिकृत नोंदणी असणे आवश्यक आहे. 
  3. गटातील सर्व सदस्य यांनी गटातील एका व्यक्तीस अधिकार देणे बाबतचे प्रमापत्र असणे आवश्यक आहे. (हे प्रमाणपत्र लेटर पॅड वरती असणे आवश्यक आहे. )
  4. गटातील भागीदारी ची नोंदणीकृत प्रमाणपत्र आवश्यक आहे. 
  5.  
  6. गटातील सर्व सदस्य याची सहमति असणे आवश्यक आहे. 
  7. अर्जदार व्यक्तीचे बँक खाते त्याचा आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे. 
  8. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये च्या आत असणे आवश्यक आहे. 
  9. अर्जदार व्यक्तिचे वय पुरुषा साठी जास्तीत जास्त 50 तर महिला अर्जदारांसाठी जास्तीत जास्त वय 55 वर्ष असणे आवश्यक आहे. 
  10. ज्या गटासाठी कर्ज घेत आहेत तो गट कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा. 
  11. या आधी गटाने किंवा गटातील सदस्याने अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लाभ घेतलेला नसावा. 
  12. दिव्यांग तथा अपंग अर्जदार असल्यास त्या संबंधी प्रमापत्र असणे आवश्यक आहे. annasaheb patil mahamandal loan scheme details

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना वैशिष्ट

  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना सुरवात महाराष्ट्र सरकारने केली आहे.
  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना मध्ये महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ति अर्ज करू शकतो.
  • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया असल्यामुळे अर्ज करणे अत्यंत सोपे आहे.
  • या योजनेमध्ये अर्ज केल्या पासून कर्ज मिळेपर्यंत सर्व माहिती आपणास ऑनलाइन पद्धतीने तपासता येते.
  • योजने मध्ये अर्ज पद्धती ऑनलाइन असल्यामुळे या योजनेमध्ये पारदर्शक पणा आला आहे.
  • दर तीन महिन्याला व्याज परतावा देण्यात येतो.
  • योग्य गरजू व्यक्तिपर्यन्त लाभ देण्यात येतो.

अर्ज पात्रता

  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्जदार या योजनेचा एकदाच लाभ घेऊ शकतो.
  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्जदार 18 वर्ष वय पूर्ण केलेले आहे.
  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्जदाराचे वय 50 वर्ष पर्यन्त असावे, महिलासाठी 55 वर्ष.
  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्जदाराचे वर्षीक उत्पन्न 8 लाख रुपये पेक्षा कमी असावे.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना मार्गदर्शक सूचना

  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत किंवा त्या समान कोणत्याही योजनेतून या आधी लाभ घेतलेला नसावा. 
  • अश्या सर्व जाती चे व्यक्ति  या मध्ये अर्ज करू शकतात ज्या जातीसाठी कोणतेही विशेष महामंडळ निर्माण केलेले नाही. 
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये च्या आत असावे तसे प्रमाणपत्र तहसीलदार किंवा तत्सम अधिकारी यांनी जारी केलेले असावे. 
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मध्ये अर्ज करण्यासाठी पुरुषाचे जास्तीत जास्त वय 50 वर्ष च्या आत असणे आवश्यक आहे. महिला अर्जदार असेल तर जास्तीत जास्त 55 वर्ष च्या आत वय असणे आवश्यक आहे. 
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कडे ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर 7 दिवसाच्या आत आपल्या अर्जावर मंजूरी किंवा त्रुटि असल्यास दुरुस्ती साठी आपला अर्ज पाठवला जातो. (7 दिवस शासकीय सुट्या वगळून)
  • योजनेअंतर्गत अर्जदाराच्या रहिवाशी क्षेत्रातील राष्ट्रीय कृत बँकेकडून कर्ज घेणे आवश्यक आहे. ( उपलब्ध बँकाची नवे खाली देण्यात आली आहेत)
  • दिव्यांग व्यक्ति हा स्वतः व्यवसाय करण्यासाठी सक्षम असावा. 
  • दिव्यांग अर्जदारांसाठी एकूण निधी च्या चार टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. 
  •  महामंडळ कडून कर्जावरील व्याज जास्तीत जास्त पाच वर्ष किंवा बँकेकडून घेतलेल्या प्रत्यक्ष कर्ज कालावधी यामध्ये जो कालावधी कमी असेल तो पर्यंत व्याज परतावा दिला जातो. 
  • जास्तीत जास्त पंधरा लाख रुपये पर्यंत व्याज परतावा दिला जातो. 
  • बँकेकडून मंजूर करून घेतलेले कर्ज हे जास्तीत जास्त वार्षीक 12 टक्के असणे आवश्यक आहे. 
  • वैयक्तिक अर्जदार याला जास्तीत जास्त तीन लाख रुपये रकमेपर्यंत व्याज परतावा दिला जातो. 
  • अर्जदाराचे वार्षिक कर्ज जर 25 लाख रुपये पेक्षा जास्त असेल तर त्या अर्जदाराला या योजनेअंतर्गत लाभ दिला जात नाही. 
  • या योजनेअंतर्गत अर्जदाराणे कर्ज हे फक्त महामंडळ व शासनाने निर्गमित केलेल्या बँकेकडूनच घेणे आवश्यक आहे. 
  • ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमी असेल अश्याच कुटुंबाला या मध्ये प्राधान्य देण्यात येते. 

बँक कर्ज प्रकिया व व्याजदर बद्दल

    बँक कडून कर्ज घेण्यासाठी व मंजूर करण्यासाठी महामंडळ कसल्याही प्रकारची मदत करत नाही ही सर्व प्रक्रिया अर्जदार यांना स्वतः करावी लागते. 

   बँक त्याच्या नियमानुसार त्यांना आवश्यक असणारे कागदपत्रे अर्जदार व्यक्तीला माघू शकते. 

    महामंडळा कडून आपणास व्याज परतावा मिळवण्यासाठी बँक कडून तुम्ही जास्तीत जास्त वार्षिक 12 टक्के व्याज दराने कर्ज घेतलेले असावे. म्हणजे बँक कर्ज वरील व्याज तुम्ही 12 च्या आत असणे आवश्यक आहे. 

   जर तुमचे कर्ज बँक कडून नाकारले गेले तर त्यास महामंडळ कसल्याही प्रकारे जबाबदारी घेत नाही. 

    आपण कर्ज घेत असलेली बँक शासनाने तसेच महामंडळाने त्या बँकेस मंजूरी दिलेली असणे  आवश्यक आहे.

   महामंडळ कडून वेळो वेळी मागणी केलेली कागदपत्रे   आपल्याला बँक  कडून घेऊन महामंडळाला जमा करावे लागतील. ही पूर्ण प्रक्रिया अर्जदार व्यक्ति याला पूर्ण करावी लागेल. annasaheb patil mahamandal loan scheme details

नियम व अटी

  • अर्जदार व्यक्तीने या आधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • दिव्यांग व्यक्ति अर्ज करत असल्यास त्याच्याकडे प्रमाण पत्र असणे आवश्यक आहे.
  • कर्ज फेडीचा हप्ता मासिक असावा.
  • कर्जाचा व्याजदर हा वार्षिक 12 टक्के किंवा त्या पेक्षा कमी असावा. 
  • जर आपण कर्ज हप्ता भरला नाही तर आपणास व्याज परतावा दिल जाणार नाही.
  • अर्जदारा कडे कोणत्याही बँकेची थकबाकी नसावी.
  • अर्जदारच्या आधार ला बँक खाते लिंक असने आवश्यक आहे.
  • गट कर्ज असल्यास गटातील एक तरी व्यक्ति 10 वी उतीर्ण असणे आवश्यक आहे.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजने लाभ

  • नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या बेरोजगार तरुणांना 15 लाख रुपये पर्यन्त बिनव्याजी कर्ज दिले जाते.
  • आपण गाटामार्फत कर्ज घेत असाल तर आपणास 50 लाख रुपये पर्यन्त बिनव्याजी कर्ज दिले जाते.
  • आपण घेतलेल्या कर्जावरील व्याज आपणास महामंडळा कडून परत केले जाते.
  • लाभार्थ्याने नियमित हप्ते भरल्यास दरमहा व्याज परतावा दिला जातो.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • राशन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र (8 लाख रुपये च्या आत तहसीलदार किंवा तत्सम अधिकारी यांनी दिलेले)
  • जात प्रमाणपत्र (शाळा सोडलेला दाखल असेल तरी देखील चालतो)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • मोबाइल क्रमांक
  • ईमेल आयडी
  • प्रकल्प अहवाल (Project Report)
  • सीबील रीपोर्ट
  • बँक अकाऊंट स्टेटमेंट .
  • व्यवसाय सुरू करण्या बाबतचा परवाना.

बँकेचे कर्ज घेताना लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • मोबाइल क्रमांक
  • ईमेल आयडी
  • प्रकल्प अहवाल (Project Report)
  • सीबील रीपोर्ट
  • बँक अकाऊंट स्टेटमेंट .
  • व्यवसाय सुरू करण्या बाबतचा परवाना.
  • व्यवसाय प्रशिक्षण प्रमापत्र. 
  • या व्यतिरेख बँक त्यांच्या सोयीनुसार आणखी कागदपत्रे घेऊ शकते. 

व्याज परतावा घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • बँकेने कर्ज मंजूर केलेल पत्र 
  • बँक खाते स्टेटमेंट 
  • उद्योग सुरू करण्याबाबतचा परवाना. 
  • सुरू करत असलेल्या व्यवसायाचा प्रकल्प अहवाल (Project Report )
  • व्यवसाय सुरू केलेला फोटो. (लाभार्थी स्वतः त्या फोटो मध्ये असणे आवश्यक आहे. ) 

अर्ज प्रक्रिया

  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आपणास महामंडळाच्या संकेतस्थळावर जावे लागेल.
  • संकेत स्थळावर नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
  • आपले नाव , आपले आडनाव , मधले नाव , जन्म तारीख , आधार नंबर , मोबाइल नंबर सर्व माहिती व्यवस्थित भरा.
  • आपणास विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून आपला अर्ज सादर करा.
  • अर्ज सादर केल्यानंतर आपणास आपले सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • आपणास LOI लेटर मिळेल.
  • LOI लेटर सोबत घेऊन बँक मध्ये आपली फाइल जमा करा.
  • LOI लेटर सोबत वरील कागदपत्रे जोडून द्यावीत.

   सविस्तर माहिती साठी खालील पद्धतीचा वापर करा. 

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना : annasaheb patil loan scheme

अर्ज करतांना कोणते कागदपत्रे अपलोड करावी लागतात

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना मध्ये नोंदणी करण्यासाठी आपणास सर्व प्रक्रिया या लेखा मध्ये देण्यात आलेली आहे. परंतु अर्ज करतांना कोणते कागदपत्रे अपलोड करावी लागणार ते खालील प्रमाणे. 

  1. अर्जदाराचे आधार कार्ड 
  2. महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी पुरावा. 
  3. उत्पन्न प्रमापत्र किंवा इन्कम टॅक्स भरलेली प्रमाणपत्र 
  4. जातीचा पुरावा 
  5. पॅन कार्ड 

नवीन अर्जदार नोंदणी करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा

8
  1. महामंडळ च्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्या समोर वरील प्रमाणे दृश दिसेल. 
  2. त्या ठिकाणी नवीन नोंदणी साठी नोंदणी या पर्यायावर क्लिक करा. 
10
  1. आता तुमच्या समोर एक नवीन फॉर्म उघडेल 
  2. त्यात विचारलेली पहिले नाव (स्वतः चे नाव) आडनाव, मधले नाव , जन्म तारीख , लिंग आधार कार्ड नंबर , आधार लिंक असणारा मोबाइल क्रमांक भरा. 
  3. खाली दिलेल्या चौकटीत समोर दिसणारा कॅप्चर कोड भरा. 
  4. सर्व माहीती भरल्यानंतर पुढे या पर्यायावर क्लिक करा.
  5. पुढे गेल्यानंतर आपला युजर नेम व पासवर्ड तयार करा. 
  6. शेवटी सबमीट या पर्यायावर क्लिक करा. 
1
  1. वैयक्तिक व्याज परतावा योजना IR-I या पर्यायावर क्लिक करा. 
2
  1. अर्ज करण्यासाठी या पर्यायावर क्लिक करा. 
  2. आपला जिल्हा निवडा. (आपण ज्या जिल्ह्यातून अर्ज करणार आहात तो जिल्हा निवडा)
3
  1. त्या नंतर आपला वैयक्तिक तपशील भरा. 
  2. आपले नाव , आडनाव , आधार कार्ड क्रमांक , मोबाइल क्रमांक , आपली जन्म तारीख सर्व माहिती भरा आणि पुढे या पर्यायावर क्लिक करा. 
4
  1. आपला निवसी पत्ता भरा. 
  2. ज्या मध्ये राष्ट्रीयत्व ,अधिवास राज्य (हे फक्त महाराष्ट्र निवडावे लागेल अन्य निवडल्यास महामंडळ मंजूरी देणार नाही)
  3. दिव्यांग प्रकार असाल तर होय करा नसेल तर नाही करा. 
  4. तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का. (महामंडळ कडे कर्ज मागणी करण्यासाठी आपल्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे)
  5. आपला पॅन कार्ड क्रमांक भरा (पॅन कार्ड क्रमांक चुकवू नका) 
  6. कायमचा पत्ता मध्ये आपल्या आधार कार्ड वरील पत्ता जसा आहे तसाच भरा.
5
  1. पुढील पर्यायावर क्लिक केल्यानंतर  आपणास कर्ज तपशील विचारला जाईल. 
  2. व्यवसायाचे नाव (जे नाव आपण प्रोजेक्ट रीपोर्ट तसेच उद्योग आधार आणि शॉप अॅक्ट वर दिले आहे तेच नाव भरा)
  3. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न (वार्षिक उत्पन्न अहवाल नुसार या मध्ये निव्वळ नफा होणारी रक्कम भरावी)
  4. आपल्याला किती कर्ज हवे आहे ती रक्कम भरा (प्रोजेक्ट रीपोर्ट नुसार)
  5. शेवटी सबमीट करा पर्यायावर क्लिक करा. 
6
  1. शेवटी तुमचे कागदपत्रे उपलोड करा . 
  2. सर्व प्रथम तुमचे आधार कार्ड अपलोड करा (आधार कार्ड च्या दोन्ही बाजू स्पष्ट दिसतील अश्या अपलोड करा -फाइल ची साइज 10 mb च्या आत असावी फाइल स्वरूप jpg/ png/ jpeg/pdf मध्ये असावे ) 
  3. दुसऱ्या ठिकाणी आपणास उत्पन्नाचा दाखला किंवा कुटुंबाचे सदस्य यांचे इन्कम टॅक्स भरलेला पुरावा अपलोड करा. (
  4. फाइल ची साइज 10 mb च्या आत असावी फाइल स्वरूप jpg/ png/ jpeg/pdf मध्ये असावे ) 
  5. ) शेवटी इतर कागदपत्रे मध्ये आपले पॅन कार्ड अपलोड करावे. 
  6. त्या नंतर आपला अर्ज सबमीट करा या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. 

    अश्या पद्धततिने आपला अर्ज अण्णासाहेब पाटील कर्ज योजना मध्ये यशस्वी रित्या सबमीट झाला आहे. अर्ज सबमीट झाल्यानंतर आपणास महामंडळ कडून एक एसएमएस पाठवण्यात येईल. 

आपला अर्ज सादर केल्यानंतर आपणास कामकाजाच्या सात दिवसात अर्ज मंजूरी किंवा त्रुटि बद्दलची कल्पना देण्यात येईल. 

   अर्ज मंजूर झाल्यानंतर 90 दिवसाच्या आत आपणास आपल्या बँक कर्ज प्रकिया पूर्ण करणे आवश्यक आहे. कर्ज मंजूर झाल्यानंतर आपले बँक लोण मंजूरी पत्र आपणास महामंडळा कडे ऑनलाइन पद्धतीने सादर करावे लागेल. 

अर्जाचे स्टेट्स कसे पहावे

   अण्णासाहेब पाटील कर्ज योजना मध्ये आपण अर्ज केल्यानंतर आपणास आपल्या अर्जाचे स्टेट्स कसे पाहता येते या बद्दल बऱ्याच जणाच्या मनात शंका येत आहे. 

   अर्जाचे स्टेट्स पाहण्यासाठी आपणास महामंडळ च्या अधिकृत संकेतस्थळ https://udyog.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळार जावे लागेल. संकेतस्थळावर गेल्यानंतर आपण आपला युसार आयडी व पास वर्ड टाकून त्या ठिकाणी आपल्या समोर दिसणारा कॅप्चर कोड भरून लॉगिन करू शकता. लॉगिन केल्यानंतर आपल्या समोर सद्य अर्ज स्थिति हा पर्याय दिसेल त्या ठिकाणी आपल्या अर्जाची सद्य स्थिति दिसेल. 

अर्ज करतांना काही समस्या निर्माण झाल्यास काय करावे

    बऱ्याच वेळा नवीन अर्ज करतानं आपणास विविध प्रकारच्या अडचणी येतात. आपल्याला तांत्रिक किंवा आपल्या कागदपत्र निगडीत विविध अडचणी निर्माण होतात. 

ऑफलाइन पद्धतीने समस्या सोडवण्याचा पर्याय. 

आपल्याला काही अडचण निर्माण झाल्यास आपण आपल्या जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून आपली अडचण दूर करू शकतात. प्रत्येक जिल्हा व्यवस्थापक यांचे नाव व कार्यालयाचा पत्ता आपणास खाली देण्यात आला आहे. आपण आपल्या विभागातील कार्यालयाशी संपर्क साधू शकता. 

ऑनलाइन  पद्धतीने समस्या सोडवण्याचा पर्याय.

15

    आपल्याला वर दिसत असलेल्या पर्याययावर क्लिक करावे लागेल त्या नंतर  आपणास आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून आपणास उद्भवत असणारी समस्या त्या ठिकाणी मांडू शकता आपली अडचण लवकरात लवकर सोडवण्यात येईल. 

   या शिवाय तुम्ही महामंडळाच्या मदत कक्ष क्रमांक 022-22657662 / 
022-22658017 / 1800-120-8040 या फोन नंबर वर संपर्क करून देखील आपली अडचण सांगून त्यावर मदत मिळवू  शकतात. 

मुख्य कार्यालय पत्ता व संपर्क तपशील

पत्ता

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित.
जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड,
बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग,
जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे,
सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई 400001

Email

apamvmmm[at]gmail[dot]com

Contact Number

022-22657662
022-22658017

24 x 7 नागरी संपर्क केंद्र

1800-120-8040

जिल्हा कार्यालय पत्ता

संभाजीनगर विभाग कार्यालय पत्ता यादी

SAMBHAJI NAGAR VIBHAGH

पुणे विभाग कार्यालय पत्ता यादी

PUNE VIBHAGH

मुंबई विभाग कार्यालय पत्ता यादी

MUMBAI VIBHAGH

नाशिक विभाग कार्यालय पत्ता यादी

NASHIK VIBHAG

अमरावती विभाग कार्यालय पत्ता यादी

AMRAWATI VIBHAG

नागपूर विभाग कार्यालय पत्ता यादी

NAGPUR VIBHAG

निष्कर्ष

    अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ नव उद्योजक घडवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कर्जा वरील व्याज भरते. याची सर्व आवश्यक माहिती आम्ही आपणास दिलेली आहे. आपणास अजून काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या जिल्ह्यातील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ च्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून माहिती मिळवू शकता. आपणास खाली जिल्हा कार्यालयाची माहिती देण्यात आलेली आहे.

    आपणास या योजने मध्ये काही शंका असेल तर आपण आम्हाला संपर्क साधून विचारू शकता. जर आपल्या जवळील व्यक्ति, मित्र , नातेवाईक यांना या योजनेची आवश्यकता असेल आणि ते या योजनेसाठी पात्र असतील तर त्यांना या योजनेविषयी अर्ज करण्यास मदत करा. ज्यामुळे ते ही या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

13 thoughts on “अण्णासाहेब पाटील कर्ज योजना : annasaheb patil loan scheme”

Leave a comment