नवीन उद्योग करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी पीएमईजीपी योजना

          देशातील उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी सरकार नेहमी कटिबद्ध पद्धतीने कार्य करते. देशात बेरोजगारी प्रमाण कमी करण्याच्या हेतूने सरकार कडून पीएमईजीपी योजना (Prime Minister Employment Generation Program) सुरू करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना नवीन व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

      पीएमईजीपी योजना अंतर्गत विविध व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण वर्गाला सरकार कडून व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली जात आहे. ज्या मध्ये 3 टक्के पर्यन्त अनुदान वितरित करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून 1000 पेक्षा अधिक व्यवसायासाठी कर्ज देण्यात येत आहे. आणि त्यावर सरकार कडून अनुदान देखील देण्यात येत आहे. आजच्या या लेखात आपण पीएमईजीपी योजना बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. आवश्यक कागदपत्रे , पात्रता , अर्ज प्रक्रिया , नियम अटी सर्व माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

   भारत हा विकसनशील देश आहे. भारतात तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर आहे. भारतातील तरुणांना बेरोजगारी पासून मुक्त करण्यासाठी व रोजगार निर्माण करण्यासाठी सरकार कडून ही योजना आखण्यात आली आहे. तरुणांना नवीन व्यवसाय करायचा म्हणल तर सर्वात मोठी अडचण असते ती भांडवल . सहसा बँक नवीन व्यवसाय करणाऱ्यांना कर्ज देणे टाळते.  ही अडचण लक्षात घेऊनच केंद्र सरकार ने स्वत: हमी घेऊन नवीन उद्योजकांना कर्ज देण्यास सुरवात केली आहे. ज्या मुळे भारतात नव नवीन उद्योजक तयार होऊन त्यांच्या मार्फत अजून काही रोजगार निर्माण केला जाईल. व भारतातील बेरोजगारी पूर्ण पणे संपुष्टात येईल.

पीएमईजीपी योजना

योजनेचे नाव

            पीएमईजीपी योजना

कोणी सुरू केली

केंद्र सरकार

योजनेचा विभाग

एमएसएमई मंत्रालय भारत सरकार

योजनेचे उद्दिष्ट

भारतातील बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण करून देणे

अधिकृत संकेतस्थळ

https://www.kviconline.gov.in/

लाभार्थी

भारतातील व्यक्ति

लाभ

20 लाख ते 50 लाख रुपये

अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन / ऑफलाइन

पीएमईजीपी योजना उद्दिष्ट

  • देशातील बेरोजगारी संपुष्टात आणणे.
  • देशातील औद्योगिक क्षेत्र वाढवणे.
  • औद्योगिक क्षेत्र वाढून देशातील उत्पन्न वाढवणे
  • देशातील बेरोजगार तरुणांचा व त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक विकास करणे.
  • पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला आधुनिक पद्धतीने व्यवसाय करण्यास सहकार्य करणे.
  • स्वय रोजगार संधि उपलब्ध करून देणे.

वैशिष्ट

  • अगदी सोप्या पद्धतीने व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे.
  • कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची गाहान खत करण्याची गरज नाही.
  • कमी वेळेत आणि कमी कागदपत्रांच्या सहाय्याने कर्ज उपलब्ध केले जाते.
  • सरकार स्वत या कर्जाची जोखीम घेत आहे.
  • सरकार स्वत जोखीम घेत असल्यामुळे बँक लवकरात लवकर कर्ज मंजून करून वितरित करते.
  • नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे अर्ज करणे अत्यंत सोपे झाले आहे.
  • ऑनलाइन पद्धतीने आपल्या अर्जाचे स्टेटस पाहता येते.

पात्रता

  • अर्जदार भारतीय रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीचे वय 18 वर्ष पेक्षा जास्त असावे.
  • 10 लाख रुपये पेक्षा जास्त रक्कम असल्यास अर्जदाराचे शिक्षण कमीत कमी 8 वि असावे.
  • अर्जदारांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराणे किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने आधी या योजनेचा लाभ घेतलेले नसावा.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड.
  • पान कार्ड.
  • पासपोर्ट साइज फोटो.
  • प्रोजेक्ट रीपोर्ट.
  • बँक खाते झेरॉक्स.
  • बँक खाते स्टेटमेंट.
  • मोबाइल क्रमांक.
  • ईमेल आयडी.
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास).
  • शौक्षणिक पुरावा.
  • व्यवसाय न हरकत प्रमाणपत्र.
  • ग्रामीण भागातील असल्यास प्रमाणपत्र.

अर्ज प्रक्रिया

पीएमईजीपी योजना
  • पीएमईजीपी योजना (Prime Minister Employment Generation Program) मध्ये अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जा अधिकृत संकेतस्थळ
  • संकेतस्थळावर गेल्यानंतर आपणास अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल .
  • आपल्या समोर एक नवीन फॉर्म उघडेल.

 

पीएमईजीपी योजना
  1. अर्जदाराचा आधार क्रमांक भरा
  2. अर्जदाराचे नाव भरा
  3. प्रायोजित एजन्सी निवड करा
  4. आपले राज्य निवडा
  5. आपला जिल्हा निवडा
  6. आपल्या जिल्ह्यात असलेली प्रायोजित एजन्सी निवडा
  7. अर्जदाराचे लिंग निवड करा
  8. जन्म तारीख भरा
  9. आपली जात निवडा
  10. आपले शौक्षणिक माहिती निवडा
  11. आपला पूर्ण पत्ता भरून घ्या
  12. आपल्या व्यवसाय ठिकाण निवड (ग्रामीण / शहरी)
  13. आपल्या व्यवसाय चा पत्ता भरा
  14. व्यवसाय चा प्रकार निवडा
  15. व्यवसाय चे नाव भरा
  16. ईडीपी ट्रेनिंग माहिती भरा
  17. आपल्या व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी रक्कम भरा
  18. आपल्या बँक ची सर्व डीटेल भरा
  19. दुसरी एक बँक निवड करा
  20. आपल्याला या योजनेची माहिती कोठून मिळाली ही निवडा.

सर्व माहिती भरल्यानंतर परत एकदा भरलेली माहिती बरोबर आहे का ते चेक करून घ्या. आणि अर्ज सेव करा

 

पीएमईजीपी योजना
  • अर्ज सेव केल्यानंतर आपल्या समोर आपले कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पर्याय दिसेल.
  • आपले सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्या.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आपल्या मोबाइल / ईमेल वर आपला यूजर आयडी पासवर्ड मिळेल
  • आपण भरलेल्या अर्जाची प्रिंट कडून घ्या.
  • आपली प्रिंट जवळील कार्यालयात सादर करा.
  • कार्यालयाने अर्ज तपासणी केल्या नंतर आपला अर्ज आपल्या बँकेकडे जाईल.
  • आपला अर्ज बँके कडे गेल्यानंतर आपण बँक ने मागितलेले सर्व कागदपत्रे बँकेत जमा करावीत.

ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर बँक कडून आपल्याला कर्ज मंजूर केले जाईल.

पीएमईजीपी योजना अंतर्गत येणारे व्यवसाय

  • कृषि आधारित अन्न प्रक्रिया
  • वन आधारित उत्पादण
  • कागद तयार करणे
  • फायबर तयार करणे
  • खनिज आधारित उत्पादन
  • केमिकल आधारित व्यवसाय
  • ग्रामीण बायो टेक
  • सेवा आणि वस्त्र

सर्व 1056  व्यवसायाची यादी pdf स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.pmegp buissness list

कर्ज परत फेड करण्याचा कालावधी

  • या योजनेच्या माध्यमातून कर्ज परतफेड करण्यासाठी 3 ते 7 वर्ष कालावधी दिला जातो.

पीएमईजीपी योजना अंतर्गत किती अनुदान मिळते

लाभार्थी श्रेणी

लाभार्थी हिस्सा

(प्रकल्प खर्चाच्या )

अनुदान शहरी

अनुदान ग्रामीण

सामान्य श्रेणी

10 टक्के

15 टक्के

25 टक्के

विशेष (ओबीसी/एसी/एसटी/अल्पसंख्याक/महिला/माजी सैनिक /अपंग)

5 टक्के

25 टक्के

35 टक्के

निष्कर्ष

     पीएमईजीपी योजना अंतर्गत जवळ जवळ सर्व व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांना या योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. कर्ज उपलब्ध करून आपण कर्जाचे हप्ते व्यवस्थित भरल्यास आपणास सबसिडी सुद्धा वितरित केली जाते.ज्या मुळे नवीन उद्योजकांना एक उत्तम संधि मिळत आहे. या संधि चा फायदा घेऊन अनेक तरुणांनी आपले व्यवसाय क्षेत्रात खूप यशस्वी झेप घेतलेली आहे.

या योजनेच्या माध्यमातून आपणास देखील काही लाभ घ्यायचा असेल तर आपण सर्व माहिती घेऊन या योजनेच्या माध्यमातून एक नवी सुरवात करू शकतात. आपल्या देशात या अश्या योजनेच्या माध्यमातून बरेच नवं नवीन उद्योजक तयार झाले आहेत.

आपल्याला किंवा आपल्या जवळील मित्र नातेवाईक यांना या योजनेची गरज असेल तर आपण त्यांच्या पर्यन्त ही माहिती पोहोच करा. जेणे करून त्यांना या योजनेचा लाभ घेत येईल व त्यांचे उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

अर्ज करतांना किंवा कागद पत्रा संबंधी काही अडचण आल्यास आम्हाला संपर्क सध्या आम्ही आपणास नक्कीच आपणास मदत करू .

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  1. पीएमईजीपी योजना साठी पात्रता काय आहे?
  • ज्या भारतीय व्यक्तीचे वय 18 वर्ष पूर्ण आहे असा प्रत्येक व्यक्ति या योजनेसाठी पात्र आहे.
  1. पीएमईजीपी योजना अंतर्गत किती कर्ज मिळते ?
  • 20 लाख ते 50 लाख रुपये पर्यन्त कर्ज मिळते.
  1. डीआयसी (DIC) म्हणजे काय ?
  • डीआयसी district industries centres जिल्हा उद्योग केंद्र
  1. पीएमईजीपी कर्ज साठी सीबील किती असावे?
  • आस काही ठराविक नाही परंतु सीबील स्कोर 600 च्या पुढे हा चांगला असणे आवश्यक आहे.
  1. पीएमईजीपी अर्जाची स्थिति कशी तपासावी?
  • अधिकृत संकेतस्थळ https://www.kviconline.gov.in/ या वर जाऊन लॉगिन रजिस्टर अॅप्लिकेशन या पर्यायाचा वापर करून आपले स्टेट्स चेक करू शकतात.

2 thoughts on “नवीन उद्योग करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी पीएमईजीपी योजना”

Leave a comment